हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारत आणि चीनमध्ये सीमेवरून सध्या बराच तणाव निर्माण झालेला आहे. गेल्या सोमवारी लडाखच्या गलवान खोऱ्यात भारत आणि चीन यांच्यात झालेल्या चकमकीत भारताच्या 20 सैनिक शहीद झाले त्यामुळे देशभरातील लोकांमध्ये संताप निर्माण झाला आहे तसेच देशभरात चिनी वस्तूंवर बहिष्कार घालण्यासाठी मोठी मोहीम सुरू झाली आहे. मुख्य म्हणजे,बाबा रामदेव यांनी सरकारकडे आता आपण ज्याप्रकारे पाकिस्तानशी वागतो त्याप्रमाणेच चीनबरोबरही वागण्याची विनंती केली आहे .
पतंजली आयुर्वेदचे संस्थापक आणि योगगुरू बाबा रामदेव यांनी चीनविषयी सरकारकडे मोठी विनंती केली आहे. बाबा रामदेव म्हणाले की, चीन कधीही भारताचा मित्र होऊ शकत नाही. तो भारताबरोबर नेहमीच कपटीपणाने वागत होता आणि पुढेही तो तेच करत राहील. एका टीव्ही चॅनेलशी झालेल्या संभाषणात बाबा रामदेव यांनी भारताने कठोर रणनीती अवलंबून चीनविरूद्ध कठोर कारवाई करावी अशीआपली बाजू मांडली आहे.
भारताने चीनला पाकिस्तानप्रमाणेच उत्तर द्यावे
बाबा रामदेव म्हणाले की,’ मी राष्ट्रीय एकात्मतेच्या मुद्द्यावर भारताच्या राजकीय पक्षांना आपले सैन्य आणि सरकारच्या पाठीशी उभे रहावे असे आवाहन करतो. चीनला आता पाकिस्तानप्रमाणे उत्तर द्यावे लागेलआणि यासाठी भारत सरकारने कठोर पावले उचलली पाहिजेत.
आम्ही दोन वर्षांत चिनी उत्पादने हद्दपार करू
बाबा रामदेव पुढे म्हणाले की, भारताने आता चीनला पर्याय शोधला पाहिजे. ते म्हणाले की, येत्या दोन वर्षांत आम्ही चिनी उत्पादनांना भारतातून संपवून टाकू. ते म्हणाले की, स्वावलंबी होण्यासाठी दोन-तीन वर्षे लागतील मात्र आता चीनवर बहिष्कार टाकावाच लागेल.
चीनबरोबर आतापर्यंत केलेले सर्व करार रद्द केले पाहिजेत
योगगुरू पुढे म्हणाले की, चीनने भारताच्या सैनिकांसमवेत हे घृणास्पद कृत्य केले आहे. ते म्हणाले की, चीनला यावेळी उत्तर न दिल्यास तो भारताचा अनादर होईल. रामदेव म्हणाले की, चीनबरोबर आतापर्यंत केलेले सर्व करार रद्द केले पाहिजेत. सीमेवरचा निशस्त्र करार देखील रद्द करावा.’
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.