हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । खासगी क्षेत्रातील मोठी बँक असलेल्या आरबीएल बँकेने ग्राहकांना दिलासा देताना आता आपला व्याज दर कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. बँकेने सर्व कार्यकाळातील कर्जावरील व्याजदरात 0.10 टक्क्यांनी कपात केली आहे. हे नवीन दर 22 जुलैपासून लागू झाले आहेत. 22 मे रोजी रिझर्व्ह बँकेने आपला रेपो दर हा 0.40 टक्क्यांनी कमी करून 4 टक्के केले होते. यानंतर पंजाब नॅशनल बँक, बँक ऑफ इंडिया आणि युको बँक यांनी रेपो आणि एमसीएलआरशी संबंधित त्यांचे रेपो दर आधीच कमी केले आहेत.
RBL Bank reduces lending rates by 10 bps across tenors w.e.f July 22 pic.twitter.com/K6NNPh5B7E
— CNBC-TV18 (@CNBCTV18Live) July 23, 2020
1 ऑगस्टपासून आरबीएल बचत खात्याचे नियम बदलतील
आरबीआयने अलीकडेच आपल्या बचत खात्यातील व्याज दरात बदल केला आहे. हे नवीन दर 1 ऑगस्टपासून लागू होतील. आता तुम्हाला 1 लाख रुपयांपर्यंतच्या बचत खात्यावर वर्षाकाठी 4.75 टक्के व्याज मिळेल. त्याचबरोबर 1-10 लाख रुपयांपर्यंतच्या ठेवींवर 6 टक्के आणि 10 लाख ते 5 कोटी रुपयांच्या ठेवींवर 6.75 टक्के व्याज दिले जाईल.
आरबीएल बँकेने इतर शुल्कामध्येही केले बदल
आता आपले डेबिट कार्ड हरवले किंवा खराब झाले तर आपल्याला 200 रुपये शुल्क भरावे लागेल. त्याच वेळी, आता आपल्याला टायटॅनियम डेबिट कार्डसाठी दरवर्षी 250 रुपये द्यावे लागतील. त्याचबरोबर ग्राहक आता महिन्यातून 5 वेळा एटीएममधून पैसे काढू शकतात.
देशातील सर्वात मोठी सरकारी बँक असलेलं भारतीय स्टेट बँक (एसबीआय-स्टेट बँक ऑफ इनिडा) नेदेखील एमसीएलआरच्या कर्जाचा मुख्य व्याज दर कमी केला आहे, त्यानंतर आता गृह कर्ज हे स्वस्त झाले आहेत.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.