हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशात कोरोनाचा संसर्ग पसरल्यामुळे सर्वसामान्यांच्या अडचणी सतत वाढतच आहेत. अशातच आंतरराष्ट्रीय स्तरावर क्रूड तेलाच्या किंमती घसरल्या असल्या तरीही त्याचा फायदा लोकांना मिळत नाही आहे. शनिवारी, देशातील सरकारी ऑईल मार्केटिंग कंपनी एचपीसीएल, बीपीसीएल, आयओसीने सलग 14 व्या दिवशी पुन्हा पेट्रोल-डिझेलचे दर वाढविले आहेत. यावेळी पेट्रोल 7.60 रुपये प्रति लीटर आणि डिझेल 8.28 रुपये प्रतिलिटर महागले आहे.
देशाची राजधानी असलेल्या दिल्लीत शनिवारी पेट्रोलचे नवे दर हे 78.88 रुपये प्रतिलिटर झालेले आहेत, जे गेल्या शुक्रवारी 78.37 रुपये प्रतिलिटर होते. दिल्लीत डिझेलच्या किंमतीही 61 पैशांनी वाढल्या असून नवे दर प्रति लिटर 77.67 रुपये केली आहे. त्याचबरोबर या काळात पेट्रोलच्या किंमतीतही 51 पैशांची वाढ झालेली आहे.
Petrol and diesel prices at Rs 78.88/litre (increase by Re 0.51) and Rs 77.67/litre (increase by Re 0.61), respectively in Delhi today. Price of petrol & diesel has increased by Rs 5.88/litre & Rs 6.50/litre respectively since 9th June in the national capital. pic.twitter.com/H8EsN02msX
— ANI (@ANI) June 20, 2020
पेट्रोल-डिझेलच्या नव्या किंमती (19 जून 2020 रोजी पेट्रोल डिझेल किंमत) –
दिल्ली
पेट्रोलची किंमत प्रति लिटर 78.88 रुपये आहे
तर डिझेलची किंमत प्रति लिटर 77.67 रुपये आहे
नोएडा
पेट्रोलची किंमत प्रति लिटर 79.90 रुपये आहे
डिझेलची किंमत प्रति लिटर 70.33 रुपये आहे
लखनौ
पेट्रोलची किंमत प्रति लिटर 79.79 रुपये आहे
डिझेलची किंमत प्रति लिटर 70.25 रुपये आहे
गुरुग्राम
पेट्रोलची किंमत प्रतिलिटर 77.14 रुपये आहे
डिझेलची किंमत प्रति लिटर 70.20 रुपये आहे
मुंबई
पेट्रोलची किंमत प्रति लिटर 85.70 रुपये आहे
डिझेलची किंमत प्रतिलिटर 76.11 रुपये आहे
कोलकाता
पेट्रोलची किंमत प्रति लिटर 80.62 रुपये आहे
डिझेलची किंमत प्रतिलिटर 73.07 रुपये आहे
चेन्नई
पेट्रोलची किंमत प्रतिलिटर 82.27 रुपये आहे
डिझेलची किंमत प्रति लिटर 75.29 रुपये आहे
अशा प्रकारे आपल्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलची किंमत तपासा
पेट्रोल-डिझेलचे दर दररोज बदलत असतात आणि ते रोज सकाळी 6 वाजता अपडेट केले जातात. तुम्हाला एसएमएसद्वारे पेट्रोल आणि डिझेलचे दररोजचे दर देखील कळू शकतात (How to check diesel petrol price daily). खरं तर, आपल्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलची किंमत तपासण्यासाठीचे तीन मार्ग आहेत: ऑईल मार्केटिंग कंपन्यांच्या पंप लोकेटरच्या मदतीने आपण किंमत शोधू शकता. फ्युल @ आयओसी अॅप डाउनलोड करा किंवा 92249 92249 वर एसएमएस पाठवून किंमत शोधा.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.