Saturday, March 25, 2023

आजपासून बदलले एटीएममधून पैसे काढणे आणि बचत खात्यात पैसे ठेवण्याच्या संबंधीचे नियम, घ्या जाणून

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनाव्हायरसच्या पार्श्वभूमीवर, 24 मार्च 2020 रोजी, देशभरातील लॉकडाऊनच्या घोषणेच्या दिवशी केंद्रीय अर्थ मंत्री निर्मला सीतारमण यांनी एटीएम शुल्क आणि बचत खात्यातील किमान शिल्लक ठेवणे हे बंधन 3 महिन्यांसाठी हटवले होते. यानंतर ग्राहकांना कोणत्याही बँकेच्या जवळच्या एटीएममधून कधीही पैसे काढण्याची परवानगी देण्यात आली. तसेच, जास्तीच्या व्यवहारांवर अतिरिक्त शुल्क देण्याची गरजही नव्हती. लोकांना यावेळी असे सांगितले होते की ही सूट देण्यात आली आहे जेणेकरुन लोकांनी पैसे काढण्यासाठी घराबाहेर पडू नये. या दोन्ही सवलती 30 जून 2020 पर्यंत होती म्हणजेच आजपासून आता हे नियम बदलतील.

खात्यात किमान शिल्लक नसेल तर होईल दंड
देशातील प्रत्येक बँक आपल्या बचत खात्यात किमान रक्कम ठेवण्यास सांगते. जर ही किमान शिल्लक नसल्यास ग्राहकांकडून दंड आकारला जातो. केंद्राकडून ही किमान शिल्लक रक्कम शिथिल झाल्यानंतर कोणत्याही बँकेने ती आणखी वाढविण्याची घोषणा केलेली नाही. त्याचबरोबर अर्थ मंत्रालयाकडूनही ती सुरू ठेवण्यासाठी कोणतीही माहिती मिळालेली नाही. म्हणूनच असे मानले जात आहे की अशा परिस्थितीत एटीएम शुल्काची सवलत आणि किमान शिल्लक यांवरील सवलत ही बंद होईल.

- Advertisement -

प्रीमियम खात्यासाठी अधिक किमान शिल्लक
केंद्राने दिलेली सूट शिथिल झाल्यानंतर आता आपल्या बचत खात्यात किमान शिल्लक पाच हजार ते दहा हजार रुपयांपर्यंत ठेवता येईल, असे बोलले जात आहे. हे प्रीमियम खात्यांसाठी देखील अधिक असू शकते. हिताची पेमेंट सर्व्हिसचे एमडी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (कॅश बिझिनेस) रुस्तम इराणी म्हणाले की,’ सरकारने या दोन्ही सवलती देण्याचा सरकारचा निर्णय चांगला होता, मात्र ते पुढे सुरु ठेवायचे कि नाही याचा निर्णय अजूनही घेण्यात आलेला नाही.

‘आता गोष्टी सामान्य होण्यासाठी थोडा वेळ लागेल’
कन्फेडरेशन ऑफ एटीएम इंडस्ट्रीचे डायरेक्टर के श्रीनिवास यांचे असे म्हणणे आहे की एटीएम ट्रांसझॅक्शन लिमिट मध्ये दिलेल्या सवलतीनंतरही लॉकडाऊनमुळे दैनंदिन व्यवहारावर परिणाम झाला आहे. अजूनही लोकं एटीएममधून पैसे काढण्यासाठी येत नाहीत. अनलॉकच्या घोषणेनंतर, सर्व व्यावसायिक क्रिया हळूहळू ट्रॅकवर परत येत आहेत, मात्र एटीएम व्यवहारांची स्थिती कोविड -१९ च्या आधीच्या पातळीवर पोहोचली नाही. आरबीआयच्या सध्याच्या आकडेवारीनुसार एटीएम व्यवहारात कमीतकमी 30 टक्के घट झाली आहे. अशा परिस्थितीत एटीएम व्यवहाराची मर्यादा ही वाढविण्यात यावी. ते म्हणाले की,’ सध्याची परिस्थिती सामान्य होण्यास वेळ लागेल.’

एटीएम ट्रांसझॅक्शन लिमिटशी संबंधित काय नियम आहेत
साधारणत: कोणतीही बँक महिन्यात 5 वेळा फ्री ट्रांसझॅक्शन करण्याची सुविधा देते. इतर बँकांच्या एटीएमसाठी ही लिमिट फक्त 3 आहे. या लिमिटपेक्षा जास्त एटीएम ट्रांसझॅक्शन करण्यासाठी बँका ग्राहकांकडून 8 ते 20 रुपये अतिरिक्त शुल्क आकारतात. हे शुल्क देखील ग्राहकांनी किती रक्कमेच ट्रांसझॅक्शन केले यावर अवलंबून असते. प्रत्यक्षात जेव्हा ग्राहक दुसर्‍या बँकेच्या एटीएमच्या निश्चित संख्येपेक्षा जास्त ट्रांसझॅक्शन करतात तेव्हा त्यांच्या बँकेने एटीएम चालविणार्‍या बँकेला किंवा कंपनीला इंटरचेंज फी द्यावी लागते. मात्र, हे एटीएम शुल्क बरेच कमी आहे. त्यामुळे ग्राहकांनी एटीएममधून पैसे काढण्याच्या चक्करमध्ये कोरोना विषाणूचा धोका पत्करण्याची गरज नाही.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.