सलमानने लॉन्च केला त्याचा पर्सनल केअर ब्रँड FRSH, करणार सॅनिटायझर्सची विक्री

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बॉलिवूड सुपरस्टार सलमान खानने लॉकडाऊन दरम्यान एक नवीन व्यवसाय सुरू केला आहे. बिझनेस वेंचर येथे सलमान खानने FRSH ब्रँड अंतर्गत सॅनिटायझर्स लॉन्च केले आहेत. त्याने २४ मे रोजी रात्री उशिरा सोशल मीडियावर आपला हा नवीन सौंदर्य आणि पर्सनल केअर ब्रँड FRSH लॉन्च केल्याची माहिती शेअर केली.

सोशल मीडियाद्वारे शेअर केली माहितीः
अभिनेता सलमान खानने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर नुकतीच एक घोषणा केली आहे ज्याच्या एक शेअर करताना त्याने सांगितले की, “मी माझा नवीन ग्रूमिंग आणि पर्सनल केअर ब्रँड एफआरएसएच बाजारात आणतो आहे. हा तुमचा, माझा, आपला ब्रँड आहे जो तुमच्यासाठी सर्वोत्कृष्ट प्रॉडक्ट्स बनवेल. सध्या सॅनिटायझर्स आले आहेत, जे तुम्हांला येथे मिळतील … तेव्हा ट्राय करा. “

 

सलमानने व्हिडिओमध्ये सांगितली ही गोष्ट:
सलमान खानने या व्हिडिओमध्ये सांगितले आहे की,’ याआधी तो डीओडोरंट्स आणण्याचे प्लँनिंग करत होता,मात्र सध्याच्या काळाची गरज लक्षात घेऊन त्यांने सॅनिटायझर्स आणण्याचे ठरविले. सलमानने काही दिवसांनंतर डीओडोरंट्स, बॉडी वाइप्स आणि परफ्यूम सारख्या इतर अनेक उत्पादनांचीही ओळख करून देणार असल्याचे सांगितले. माजी टेनिसपटू महेश भूपतीचा ब्युटी ब्रँड स्केनशियल्स याच्याबरोबर ज्वॉइंट वेंचर म्हणून सलमानने FRSH ची सुरुवात केली आहे.

अशा असतील किमती :
सलमान खानच्या फ्रेश वर्ल्डच्या अहवालानुसार १०० मिली सॅनिटायझरची किंमत रुपये ५०, तर ५०० मिलीची किंमत ही २५० रुपये आहे. त्याच वेळी, १०० मिली कॉम्बोच्या १० बाटल्यांची किंमत ही ४०० रुपये इतकी आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.