महाराष्ट्रात सध्या अलकायद्याचा अजेंठा राबविली जात आहे; संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | गेल्या अनेक दिवसापासून शिवसेना नेते व भाजप नेत्यांच्यामध्ये टीका टिपण्णी होत आहे. दररोज भाजप नेत्यांकडून केल्या जात असलेल्या राजकारणावरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज निशाणा साधला. आताप्र्यत्न अशा पद्धतीचे राजकारण कधी पहायला मिळाले नाही. महाराष्ट्रात नीच पातळीचं राजकारण कधी झालं नव्हतं. इसाक बागवान यांना महाराष्ट्र ओळखतो. तुम्ही कुणावरही काहीही आरोप करून पोलीस दलाचं मनोबल खच्ची करू नका. लोकांच्या घरात शिरू नका. तुम्हालाही घरं आहेत. पाकिस्तानने सुपारी दिली आहे की हे सगळं खच्चीकरण करा. अल कायदाचा अजेंडाच हा होता. काही राजकीय लोकांना हाताशी धरायचं, त्यांना सुपारी द्यायची आणि देशाचं, राज्याचं प्रशासन, व्यवस्था याला सुरुंग लावायचा हा अल कायदाचा अजेंडा होता. तोच सध्या राबविली जात आहे, असे राऊत यांनी म्हंटले.

संजय राऊत यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, ज्या पद्धतीने महाराष्ट्रात व देशात केंद्रीय तपास यंत्रणेंच्या कारवाया सुरु आहेत. तपास यंत्रणा आणि महाराष्ट्रातील विरोधी पक्ष यांची जी हातमिळवणी आहे. त्यातून त्यांना महाराष्ट्रातील हे सरकार चालू द्यायचे नाही. असे त्यांनी ठरवले आहे. याला तुरुंगात टाकू त्याला तुरुंगात टाकू असे जे ते बोलत आहेत. एकवेळ त्यांनी आमच्यावर नक्की कोणते आरोप आहेत. हे माहिती नाही. पण हे आरोपपत्र तेच परस्पर तयार करतात. असे करण्यापेक्षा ज्यांना ज्यांना तुरुंगात टाकायचे आहे त्यांची यादी तयार करावी, आणि केंद्रीय तपास यंत्रणेला सांगा कि पंचवीस जणांना तुरुंगात टाकायचे आहे.

मात्र, अगोदर तुरुंगात टाकावे नंतर आमच्यावर आरोप करावेत. महाराष्ट्र द्रोहीचा आत्मा शांत करावा. महाराष्ट्रात आतापर्यंत नीच पातळीवरचे राजकारण आतापर्यंत कधीच झाले नव्हते. छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याच्या शत्रूशी सन्मानाने वागण्याचा सल्ला दिला होता. मात्र, आज वेगळेच राजकारण केले जात आहे. आम्ही काय पाकिस्तानातून आलो आहोत का? उलट तुमचे संबंध आहेत. यांच्या घरात रोज पेनड्राईव्ह बाळंत होतात का? बघावं लागेल. आम्ही एकच कव्हर ड्राईव्ह मारू खाटकन. जे करायचंय ते करा,  तुमच्या १०० पेनड्राईव्हवर आमचा एक कव्हर ड्राईव्ह भारी पडेल”, असे राऊत म्हणाले.

Leave a Comment