हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना नेते तथा खासदार संजय राऊत यांनी दादर येथील शिवसेना भवनमध्ये पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी राज्यातील भाजपच्या नेत्यांवरही गंभीर आरोप केले. यावेळी राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांचे थेट नाव घेत तब्बल 25 हजार कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप केला आहे. “महाराष्ट्रातला आतापर्यंतचा सर्वात मोठा घोटाळा हा तब्बल 25 हजार कोटी रुपयांचा होता. फडणवीसांच्या काळात खूप घोटाळे झाले, पण त्यातला सर्वात मोठा घोटाळा महाआयटीत झाला. या घोटाळ्याशी संबंधित अमोल काळे कोण आहे? विजय ढवंगाळे कोण आहे? त्यंना कुठं लपवलंय ते त्यांनी गावे, असा आरोप राऊत यांनी केला.
संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषद घेत भाजप व देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला. यावेळी राऊत म्हणाले की, आज मी फडणवीस याच्या काळा झालेला महाआयटीतल्या घोटाळ्याशी संबंधित कागदपत्रं, त्यांचे मनी ट्रान्झॅक्शन्स, विना टेंडर कोणाकोणाला कंत्राटे दिली? कोणाला किती रुपये दिले? याची माहिती येत्या दोन दिवसात ईडीकडे दिली जाईल, असे सांगितले.
भाजपचे काही प्रमुख वारंवार मला भेटून तुम्ही या सरकारच्या प्रवाहातून बाहेर पडा. कोणत्याही परिस्थिती आम्हाला हे सरकार घालवायचे आहे. आमची सगळी तयारी झाली आहे. काही आमदार आमच्या हाताला लागले आहेत. तुम्ही बाहेर पडा. आम्हाला मदत करा. आम्ही राष्ट्रपती राजवट आणू. तुम्ही जर मदत केली नाही, तर केंद्रीय तपास यंत्रणा तुम्हाला टाईट करतील, असे राऊत यांनी यावेळी म्हंटले.