हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे वकील सतीश उके यांना काल ईडीनं अटक केली. उके यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात याचिका दाखल केली होती. शिवाय नाना पटोले यांच्याकडून ते खटला लढत होते. यावरून शिवसेना संजय राऊत यांनी केंद्र सरकार व भाजप आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर आज निशाणा साधला. “सात वर्षांपासून लोक वाट पाहत आहेत एप्रिल फुल आहे. मात्र, विरोधकांनी एक गोष्ट लक्षात घ्यावे कि सुडाचं राजकारण आम्ही करत नाही,” असा टोला राऊत यांनी लगावला.
सन्जय राऊत यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, या देशातील जनतेला राज्यकर्ते नेहमीच एप्रिल फुल्ल करत असतात. पाच राज्याच्या निवडणुका झाल्या. केंद्र सरकारने एप्रिल फुल्ल करून टाकले. पेट्रोल व डिझेलचे भाव वाढवले. जनतेच्या प्रश्नाच्या व ते सोडवण्याच्या बाबतीत वर्षोनुवर्षे एप्रिल फुल्ल चालू आहे. एप्रिल फुल्ल हा जगण्या मरण्याचा प्रश्न सरकार व राज्यकर्त्यांच्यामध्ये झाला आहे. अर्थात त्यातून मार्ग काढावा लागेल.
उके यांच्यावर कारवाई झाली. ठीक आहे त्याचे काही अपराध असतील. मात्र, एवढ्याच्या अपराधासाठी ईडी यावी. वास्तविक ईडी महाराष्ट्रात येत नसून त्याला आणले जात आहे. केंद्रीय तपास यंत्रणेचा हल्ला हा महाराष्ट्रातील गृहखात्यावरील हल्ला आहे, असे राऊत यांनी म्हंटले.