कितीही मुंबईत मुक्काम केले तरी निवडणूक आम्हीच जिंकणार; मोदींच्या मुंबई दौऱ्यावर राऊतांची प्रतिक्रिया

Sanjay Raut BMC BJP Narendra Modi
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । “अदानी मुद्द्यावरून मोदी मौन आहेत. ते उत्तरं देत नाहीत. जशी काँग्रेसने आणीबाणी आणली म्हणून भाजपवाले आणणार आहेत का? अदानीच्या मागे मोदी नावाची शक्ती आहे काय? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मुंबई महापालिका निवडणूक जिंकायची आहे. त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दिल्लीतून मुंबईला मुक्कामीही येऊ शकतात. वंदे मातरम एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवणे हे केवळ निमित्त आहे. मुंबई महापालिका निवडणूक जिंकणे हे खरे लक्ष्य आहे. मोदींनी कितीही मुंबईत मुक्काम ठोकले तरी बीएमसी आम्हीच जिंकणार, असे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हंटले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई दौऱ्यावर आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत पंतप्रधान मोदींसह शिदे गट व भाजपवर निशाणा साधला. यावेळी ते म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मुंबई महापालिका निवडणूक जिंकायची आहे. केवळ शिंदे गट व राज्यातील भाजप नेते मुंबई पालिका निवडणुका जिंकून देऊ शकत नाही, याची भाजपला पुर्ण खात्री आहे. त्यामुळेच मोदी यांच्या दौऱ्यांवर वारंवार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव टाकले जात आहे. मात्र, मुंबई महापालिका जिंकण्यासाठी मोदींनी अख्खा देश जरी लावला तरी निवडणूक आम्हीच जिंकणार आहोत.

अदानी घोटाळ्याची संयुक्त संसदीय समितीद्वारे चौकशी व्हावी, अशी आमची मागणी आहे. विरोधकांना त्यांच्या प्रश्नांचे उत्तर मिळायलाच हवे. संसदेत ही मागणी आम्ही लावून धरू. संसदेत विरोधक अदानीविरोधात घोषणा देत असताना भाजप खासदार मोदी-मोदीच्या घोषणा देत होते. अदानींवरुन राहुल गांधींनी मोदींना सवाल केल्यावरही भाजप आमदार मोदी-मोदीचा जयघोष करत होते. यावरुन अदानींच्या मागे कोणती शक्ती आहे, याचा भांडाफोड भाजप खासदारांनीच केला आहे. मोदी हीच अदानींच्या मागे महत्त्वाची शक्ती आहे, असे राऊत यांनी म्हंटले.