SBI ने दिला इशारा! सर्च करून बँकेच्या साइटला भेट देऊ नका

नवी दिल्ली । देशात बँकिंग फ्रॉडची (Banking Fraud) प्रकरणे वाढतच आहेत. हे फ्रॉड नवीन मार्गांनी लोकांना त्यांच्या फसवणूकीला बळी पाडत आहेत. अशी फसवणूक टाळण्यासाठी देशातील सर्वात मोठी बँक असलेली स्टेट बँक ऑफ इंडिया लोकांना याबाबत सतत इशारा देत आहे. या अनुक्रमे एसबीआयने बुधवारी आणखी एक ट्विट जारी केले असून आपल्या लाखो ग्राहकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

सर्व सर्च रिझल्ट्स योग्य माहिती देतील, हे जरुरी नाही
बँकेचे युझर्स सहसा कोणत्याही माहितीसाठी गूगलचा वापर करतात आणि ते सर्चमध्ये दिसणाऱ्या रिझल्ट्सवर अवलंबून असतात. एसबीआयने म्हटले आहे की, सर्व सर्च रिझल्ट्सनी योग्य माहिती द्यावी, हे जरुरी नाही. आपल्या ग्राहकांना अशा प्रकारच्या समस्येपासून वाचविण्यासाठी बँकेने काही हेल्पलाइन क्रमांक आणि वेबसाइट जारी केल्या आहेत.

https://twitter.com/TheOfficialSBI/status/1334036827431346177?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1334036827431346177%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fhindi.news18.com%2Fnews%2Fbusiness%2Fsbi-customers-alert-not-every-search-result-is-authentic-nodvkj-3364265.html

बँक संबंधित अपडेट्ससाठी https://bank.sbi ला भेट द्या
गुगलवर सर्च करत अनेक लोकं चुकून बनावट वेबसाइटवर जातात. याबाबत एसबीआयने म्हटले आहे की, बँक संबंधित अपडेट्ससाठी https://bank.sbi या वेबसाइटला भेट द्या. या वेबसाइटवर एसबीआय बँकेसंदर्भातील माहिती मिळेल.

टोल फ्री नंबरवरुन खरी माहिती मिळवा
बर्‍याच वेळेला ग्राहक Google वर सर्च करून कस्टमर केअरचा नंबर शोधण्याचा प्रयत्न करतात. या संदर्भात एसबीआयने सर्व ग्राहकांना सतर्क करणारे काही क्रमांकही जारी केले आहेत. एसबीआयच्या ग्राहक सेवा क्रमांक 1800 11 2211, 1800 425 3800 किंवा 080 26599990 वर संपर्क साधून कोणीही बँकेची माहिती मिळवू शकतो.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

You might also like