हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनाच्या या साथीच्या काळात, ऑनलाइन फसवणूक, एटीएम आणि बँकिंग घोटाळ्याची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अलीकडेच एटीएम क्लोनिंग फ्रॉडच्या घटनांमध्ये लक्षणीयरीत्या वाढ झाल्याचे निदर्शनात आले आहे. हे लक्षात घेता एसबीआयने आपल्या ग्राहकांना चेतावणी देत एटीएम कार्डधारकांना क्लोनिंग फ्रॉड्स पासून सावध राहण्याचा सल्ला दिला आहे. एसबीआयने एटीएममधून पैसे काढताना क्लोनिंग फ्रॉड ची माहिती कशी द्यावी आणि ते कसे टाळावे तसेच त्याचा रिपोर्ट कसा द्यावा हे सांगितले आहे.
एटीएम कार्ड क्लोनिंग अशा प्रकारे होते
पूर्वी सामान्य कॉलद्वारे फसवणूक केली जात होती, परंतु आता डेटा चोरी करून खात्यातून पैसे काढले जात आहे. आता हे चोर हाय-टेक होऊन त्यांनी कार्ड्सचे क्लोनिंग करणे सुरू केले आहे. अशावेळी एटीएम कार्ड लोकांच्या खिशातच असते आणि हे चोर मात्र खात्यातून एटीएम कार्ड द्वारे पैसे काधून पसार होतात. क्लोनिंगद्वारे आपल्या एटीएम कार्डची संपूर्ण माहिती चोरली जाते आणि त्याचे डुप्लिकेट कार्ड बनविले जाते. म्हणून एटीएम वापरताना दुसर्या हाताने लपवून पिन घाला.
Cases of using cloned #ATMCards have been reported in Delhi.There appears to be a possible compromise at an ATM of another bank. Affected SBI customers are being helped & refunds will be processed as per the procedure. All suspicious transactions to be reported to the Home branch pic.twitter.com/biI8tuq1BE
— State Bank of India (@TheOfficialSBI) May 12, 2020
फसवणूकीबद्दल तक्रार कशी करावी
फसवणूकी नंतरच्या ३ वर्किंग दिवसात आपण रिफंड क्लेम करु शकता. फ्रॉड रिपोर्ट देण्यासाठी आपण Problem असे टाईप करून ९२१२५००८८८ वर पाठवू शकता. याशिवाय आपण कस्टमर केअरवर कॉल करून किंवा @SBICard_Connect हँडलवर ट्विटरवर जाऊनही आपली तक्रार दाखल करू शकता.
बँकेचा दोष असल्यासच पूर्ण रिफंड
एसबीआयच्या चुकांमुळे जर फसवणूक झाली असेल आणि त्याची बँकेकडे नोंद झाली नसेल तरच बँक संपूर्ण रक्कम परत करेल. ग्राहकाचे दुर्लक्षामुळे झालेल्या चुकीचा रिफंड मिळणार नाही.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.