हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आतापर्यंत जगभरात कोरोनाव्हायरसच्या १८,००,००० प्रकरणांची नोंद झाली आहे. भारतासह बर्याच देशांमध्ये या विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी लॉकडाउन करण्यात आले आहे. फ्लाइट, गाड्या धावत नाही आहेत. भारतातही २१ दिवसांचा लॉकडाउन सुरु आहे ज्या अंतर्गत सर्व प्रकारच्या गाड्या बंद आहेत. दरम्यान, कॉंग्रेसचे खासदार शशी थरूर यांनी या परिस्थितीला प्रसिद्ध स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा यांच्या प्रवासावरील बंदीशी जोडले आहे.
केरळमधील तिरुअनंतपुरमचे खासदार असलेले शशी थरूर यांनी कुणाल कामरावरील प्रवासी बंदी आणि कोविड -१९ च्या उद्रेकाच्या वेळेबाबत भाष्य केले आहे. त्यांनी ट्विट केले की, ‘कोविड -१९ कुणाल कामराचा मित्र असल्याचे दिसून आले. कोणतीही एअरलाइन्स त्यावर बंदी कशी घालू शकेल? या विषाणूने आता अशी स्थिती निर्माण केली आहे की सर्व उड्डाणे जमिनीवरच आहेत.
खरं तर अनेक एअरलाइन्सने सुप्रसिद्ध स्टॅम्पअप कॉमेडियन्सवर ६ महिन्यांच्या प्रवासावर बंदी घातली आहे. जानेवारीत कुणाल कामराचा इंडिगोच्या विमानातला एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. या व्हिडिओमध्ये तो प्रसिद्ध टीव्ही अँकर अर्णव गोस्वामीशी वाद घालताना दिसला होता. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर कुणाल कामराच्या गैरवर्तनावर प्रवासी बंदी लागू करण्यात आली.
इंडिगो एअरलाइन्सने ट्विटरवर लिहिले होते कि- मुंबईहून लखनौला जाणाऱ्या फ्लाइट 6E 5317 मधील घडामोडी लक्षात घेता आम्ही कुणाल कामरा यांच्यवर सहा महिन्यांसाठी बंदी घातली आहे कारण विमानातील त्याचे वागणे आक्षेपार्ह होते. याशिवाय एअर इंडिया, गोएअर आणि स्पाइसजेटनेही कामरावर बंदी घातली आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.
हे पण वाचा –
बाॅलिवुडच्या या अभिनेत्रीने चक्क पायमोज्यापासून बनवला मास्क, पहा व्हिडिओ#HelloMaharashtra #coronavirus https://t.co/w2drJ78soW
— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) April 13, 2020
नरेंद्र मोदी अन् अडवाणींसोबत रामायणातील सीताचा 'हा' फोटो होतोय व्हायरल@narendramodi #HelloMaharashtra #COVID2019 https://t.co/B2Fxy20PkV
— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) April 13, 2020
गेंदा फूल गाण्यावर 'या' तरुण मुलीचे ठुमके पाहुन प्रेक्षक होतायत घायाळ#HelloMaharashtrahttps://t.co/TDekIKq1VV
— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) April 13, 2020
www.hellomaharashtra.in