हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । उत्तर प्रदेशमधील रामपूर येथे शिवसेनेचे नेते अनुराग शर्मा यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. रात्री उशिरा अज्ञात इसमांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. अनुराग शर्मा यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. अनुराग शर्मा हे शिवसेनेचे माजी जिल्हा संयोजकही होते. त्यांच्या पत्नी या भाजपच्या सदस्या आहेत.
अनुराग शर्मा यांच्या निधनानंतर कुटुंबीयांनी रुग्णालयात एकच गोंधळ माजवला. यावेळी तोडफोड देखील झाली. रामपूर नगरपालिकेच्या प्रभाग ४ मधील नगरसेविका शालिनी शर्मा यांचे पती अनुराग शर्मा यांना ज्वाला नगरमध्ये अज्ञात इसमांनी गोळ्या घालून ठार मारल्याची माहिती समोर आली आहे. अनुराग शर्मा यांच्यावर डझनभराहून अधिक गुन्हे दाखल आहेत.
अनुराग शर्मा यांच्यावर खून आणि दरोड्यासह सुमारे तीन डझन गुन्हे दाखल असल्याचे सांगण्यात येत आहे. हिस्ट्रीशीटर असूनही ते राजकारणात खूप सक्रिय होते. त्यांच्या पत्नी अनेक वेळा त्यांच्या प्रभागातून नगरसेविका म्हणून निवडून आलेल्या आहेत.
मुरादाबाद झोनचे आयजी रमीत शर्मा यांनीही लगेच घटनास्थळ गाठले आणि जिल्हा रुग्णालयात जाऊन कुटुंबियांची पाहणी केली. या खुनाचा लवकरात लवकर खुलासा करण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे. एसपी रामपूर शगुन गौतम यांनी सांगितले कि, ‘अनुराग शर्मा हे आपल्या स्कूटीवरून घरी जात होते,तेव्हा दोन गोळ्या लागून त्यांचा मृत्यू झाला.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.