म्हणुन फडणवीसांनी मानले शिवसेनेचे आभार 

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । संचारबंदीच्या काळात अभिनेता सोनू सूद याने स्थलांतरितांना घरी पोहोचविण्यासाठी गाड्यांची उपलब्धता करून दिली होती. यानंतर माध्यमांमध्ये आणि सोशल मीडियावर त्याचे भरभरून कौतुक झाले होते. मात्र काही दिवसांपूर्वी शिवसेना नेते संजय राऊत यांनी ‘सोनू सूदचा भाजपने प्यादा म्हणून वापर करून त्याला समाजसेवकाचा मुखवटा लावला’ असे विधान केले होते. त्यांच्या या विधानाला उत्तर देत विरोधी पक्षनेते आणि भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेचे आभार मानले आहेत. चांगले काम करणारे भाजपचे असतात हा शिवसेनेला आहे, याचा आम्हाला आनंदच आहे असे ते म्हणाले. निसर्ग चक्रीवादळात नुकसान झालेल्या भागात बचाव साहित्य पाठवीत असताना ते माध्यमांशी बोलत होते.

निसर्ग चक्रीवादळामुळे कोकणात मोठ्या प्रमाणात झालेल्या नुकसानीसाठी त्यांनी हे बचाव साहित्य पाठविले आहे. म्हणून मुंबई, ठाणे, पनवेलमधून पाठविण्यात आलेल्या या साहित्यात अन्नधान्य, तेल, सिमेंटच्या शीट, कौलं आणि सोलारचे कंदील यांचा समावेश आहे. जसजसे हे साहित्य जमा होईल तसा हे पाठविले जाईल अशी माहिती त्यांनी दिली. हे साहित्य पोहोचविण्याची व्यवस्था करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी सोनू सूद यांच्यावरील टीकेचा प्रश्न विचारला असता त्यांनी शिवसेनेचे आभार मानले तसेच सोनू सूद यांच्यावर अन्याय होता काम नये असे ते म्हणाले.

 

‘सोनू सूद यांनी स्वयंप्रेरणेने ही मदत केली आहे. त्यांच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे. एखादा व्यक्ती चांगले काम करत असेल तर त्याला प्रोत्साहन दिले पाहिजे. आमच्या सरकारच्या काळातही आम्ही जेव्हा जलशिवाराचे काम करत होतो तेव्हा नाम फौंडेशन आणि पाणी फौंडेशन च्या माध्यमातून ही काम केले जात होते. मात्र आम्ही त्यांचा हेवा नाही केला. त्यामुळे सोनू सूद वर अन्याय होता काम नये’ असे ते यावेळी म्हणाले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

Leave a Comment