अन्नासाठी 3 हत्तींमध्ये झाली भयंकर लढाई, या जबरदस्त झटापटीचा व्हिडिओ पहा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या सोशल मीडियावर काही हत्तीचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होतो आहे. आपण आतापर्यँत हत्तींच्या पिल्लांचा खोडकरपणा आणि त्यांनी पाण्यात मजा करतानाचे बरेच व्हिडिओ पाहिलेले असतील. यामध्येच हत्तीच्या तीन पिल्लांचा खाण्यासाठी लढण्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर, आपल्या चेहऱ्यावर आनंद आणि हशा दोन्ही एकत्रच येईल. हा व्हिडिओ शेलड्रिक वाइल्ड लाइफने ट्विटरवर शेअर केला आहे.

शेलड्रिकच्या पोस्टनुसार हत्तींच्या या तिन्ही मुलांची नावे म्हणजे मैशा, रोहो आणि लारो अशी असून झाडाच्या फांद्या खाण्यासाठीचा त्यांचा हा संघर्ष आहे. एकाने त्याला खायला फांदी पकडली तर दुसरा त्याला भिडला. आता जेव्हा या दोंघांमध्ये भांडण होत होते तेव्हा तिसरा का शांत बसेल मग तो हि त्यांच्यात सामील झाला, आणि लढाई इतकी धोकादायक बनली की तिघांनी एकमेकांची सोंडच पकडली आणि फांदीला खेचण्यास सुरवात केली. आता शेवटी कोण जिंकले हे व्हिडीओ मध्येच पहा

 

तर या युद्धात विजय झाला तो परस्पर प्रेम आणि ऐक्याचा. एकमेकांशी झुंजल्यानंतर मशो, रोहो आणि लारो यांनी अखेर फांदी तोडली आणि तिला खाल्ले. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर लोक यावर अनेक प्रकारच्या कमेंट्स करत आहेत.

 

 

एका युझरने लिहिले की, ‘प्राणी कोणताही असो, मुले ही मुलेच असतात.’

 

एका युझरने लिहिले, मुलेही कुणीचीही ती एकसारखीच असतात.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.