ठाकरे सरकारकडून जनतेला दिलासा : पेट्रोल 2 रुपये 8 पैशांनी तर डिझेल 1 रुपये 44 पैशानी स्वस्त

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्र सरकारने शनिवारी पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क अनुक्रमे 8 रुपये आणि 6 रुपये प्रति लिटरने कमी केल्याची घोषणा केली. त्यानंतर आता राज्य सरकारकडूनही पेट्रोल व डिझेलचा दर कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार डिझेल 1 रुपये 44 पैशांनी तर पेट्रोल 2 रुपये 8 पैशांनी प्रति लिटर स्वस्त होणार असल्यामुळे एक प्रकारे ठाकरे सरकारकडून जनतेला दिलासा देण्यात आला आहे.

मागील काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीचा भडका उडाला होता. त्यामुळे जनतेला याचा नाहक त्रास सहन करावा लागत होता. या दरवाढीमुळे वाहनचालकांची होरपळ सुरू होती. इंधन दरवाढ आणि महागाईवरून विरोधकांनी ओरड सुरू केली असल्याने अशातच मोदी सरकारने पेट्रोलवरील उत्पादन शुल्कात प्रतिलिटर 8 रुपये तर डिझेलवर 6 रुपये कपात केली. त्यानंतर आता राज्य सरकारकडूनही पेट्रोल व डिझेलवरील दर कपात करण्याचा निर्णय घेतला आहे.

Petrol Diesel Price : केंद्रानंतर आता ‘या’ राज्यांनीही कमी केले पेट्रोल – डिझेलचे दर, कुठे सर्वात स्वस्त अन कुठे महाग ते जाणून घ्या

पाच राज्यांतील विधानसभा निवडणुका असल्यामुळे पेट्रोल, डिझेलच्या दरवाढीला ब्रेक लागला होता. पण या निवडणुका संपताच सुमारे साडेचार महिन्यांनंतर पेट्रोल, डिझेलच्या दरात 22 मार्चपासून वाढ सुरू झाली होती. त्यावेळी पेट्रोल-डिझेलच्या दरात 16 दिवसांत 14 वेळा वाढ करण्यात आली होती. यामुळे या काळात पेट्रोल, डिझेलचे दर 10 रुपयांनी महागले होते. त्यानंतर 6 एप्रिलनंतर ही दरवाढ थांबली होती. त्यानंतर काळ केंद्र सरकारने तर आज राज्य सरकारने दरवाढ कमी करण्याचा निर्णय घेतला आहे.

भारतातील ‘या’ ठिकाणी पेट्रोल भरण्यासाठी घ्यावी लागते थेट जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी; कांदा, बटाट्याची किंमत ऐकाल तर…

‘इतक्या’ कोटींचा पडणार राज्याच्या तिजोरीवर भार

आज राज्य सरकारने पेट्रोल व डिझेलवरील कर कमी केल्यामुळे जनतेला दिलासा मिळणार आहे. मात्र. याचा भार हा राज्याच्या तिजोरीवर पडणार आहे. यामध्ये वार्षिक सुमारे 2500 कोटी रुपये राज्याच्या तिजोरीवर भार पडणार आहे. मूल्यवर्धित कर कमी केल्याने पेट्रोलकरिता 80 कोटी रुपये महिन्याला आणि 125 कोटी रुपये डिझेलकरिता इतके महसुली उत्पन्न कमी होणार आहे. 16 जून 2020 ते 4 नोव्हेंबर 2021 या कालावधीत केंद्र सरकार पेट्रोल आणि डिझेलवर अनुक्रमे 7 रुपये 69 पैसे आणि 15 रुपये 14 पैसे प्रती लिटर कर आकारात होते. मार्च आणि मे 2020 मध्ये केंद्राने पेट्रोल आणि डिझेलच्या अबकारी दरात अनुक्रमे 13 आणि 16 रुपये अशी वाढ केली होती.

आतापासूनचे ‘या’ ठिकाणी ‘असे’ असतील पेट्रोलचे नवे दर

मुंबई 109.45
पुणे 108.87
नाशिक 109.75
नागपूर 109.35
औरंगाबाद 110.95
परभणी 111.9
रत्नागिरी 110.77