हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । संपूर्ण जगामध्ये कोरोना संसर्गाने विनाश केला आहे. तसेच कोरोनाव्हायरस वरील लस येईपर्यंत जागतिक आरोग्य संघटनेसह (WHO) सर्व संस्थांनी मास्क घालण्याची आणि सोशल डिस्टंसिंग पाळण्याचे नियम बनवले आहेत. मात्र, जगभरात कोट्यवधी नागरिकांचा मृत्यू झालेला असूनही, अनेक लोकं कोरोना विषाणूच्या संसर्गाला गंभीरपणे घेत नाहीत. इंडोनेशियात अशा मास्क न घातलेल्यांना वेगळ्या प्रकारच्या शिक्षेची घोषणा केली आहे.
इंडोनेशियातील पूर्व जावा प्रांताच्या प्रशासनाने कोरोना विषाणूमुळे ठार झालेल्या लोकांचे थडगे खोदण्यासाठी मास्क न घातलेल्या लोकांना पाठवण्याचे आदेश दिलेले आहेत. पूर्व जावा मधील गेर्सिक एजन्सीमधील आठ जणांनी मस्क घालण्यास नकार दिल्यानंतर जवळच्या नोबबेटियन गावात सार्वजनिक दफनभूमीत कबरे खोदण्याची शिक्षा सुनावण्यात आली. कोरोना रूग्णाच्या अंत्यसंस्कारास कोणालाही जाण्याची परवानगी दिली जात नाही आहे. तेव्हापासून थडगे खोदण्यासाठी लोकं सापडणे फार कठीण झाले आहे.
मास्क घालायचे नसल्यास कबर खोदा
कोरम जिल्ह्याचे प्रमुख, सुनेओ म्हणाले की,”आपल्याकडे कबरे खोदणाऱ्या लोकांची कमतरता आहे, त्यामुळे नियम मोडणाऱ्या लोकांना या कबरी खोदण्याचे काम देण्यात येईल.” या शिक्षेमुळे भविष्यात लोक मास्क न घालण्याची चूक करणार नाहीत अशी आशा त्यांनी व्यक्त केली. ते म्हणाले की, “आतापर्यंत दोन लोकांना कबरी खोदण्याचे आदेश देण्यात आले आहेत.” इंडोनेशियामध्ये आतापर्यंत कोरोना विषाणूची 218,382 प्रकरणे नोंदली गेली आहेत. राजधानी जकार्तामध्ये 54,220 लोक संसर्गित झाले आहेत तर पूर्व जावामध्ये 38,088 रुग्ण आढळले आहेत. दुसरीकडे, इंडोनेशियात कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्याही 8,723 वर पोहोचली आहे.
14 दिवस लॉकडाउन
जकार्तामध्ये कोरोना विषाणूच्या संसर्गाचा प्रसार रोखण्यासाठी सोमवारी दोन आठवड्यांपासून लॉकडाउन अंमलात आले. मास्क न घालता फिरणाऱ्या दुचाकीस्वारांवर पोलिस कठोर कारवाई करीत आहेत. जकार्ताचे राज्यपाल एनिस बसवेदन यांनी रविवारी जाहीर केले की,” सोमवारपासून ही बंदी लागू होईल, जी 27 सप्टेंबरपर्यंत चालेल. या कालावधीत सामाजिक, आर्थिक, धार्मिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक क्रियाकार्यक्रमांवर बंदी घातली जाईल तर 50 टक्के कर्मचार्यांसह 11 अत्यावश्यक सेवा या सुरू राहतील.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.