चाहत्यांच्या चेहऱ्यावर हसू आलं हेच आमच्यासाठी मोठं बक्षीस ; रहाणेच दमदार ट्विट व्हायरल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | कर्णधार अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने ऑस्ट्रेलिया विरुद्ध दुसऱ्या कसोटी सामन्यात दमदार विजय मिळवला. अजिंक्य रहाणेची झुंजार शतकी खेळी आणि कल्पक नेतृत्वाने भारताने ऑस्ट्रेलियाला चारी मुंड्या चित केलं. भारताने ४ कसोटी सामन्यांच्या मालिकेत १-१ ने बरोबरी साधली. दरम्यान, चाहत्यांच्या चेहऱ्यावर आलेलं हसू हेच आमच्यासाठी बक्षीस आहे असं भावनिक ट्विट कर्णधार अजिंक्य … Read more

चुकला तरी सांभाळून घेतो तो खरा कर्णधार ; अजिंक्य रहाणेच्या कृतीने पुन्हा जिंकली चाहत्यांची मने

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | ऑस्ट्रेलिया विरुध्दच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात कर्णधार अजिंक्य रहाणेने झुंजार खेळी करत शतक झळकावले. शतकानंतर अजिंक्य आणखी मोठी खेळी करून टीम इंडियाला मजबूत आघाडी मिळवून देण्याच्या निर्धारानेच मैदानावर उतरला होता, परंतु दुर्दैवानं तो बाद झाला. त्याच्या सुंदर खेळीचा असा शेवट होईल, याची कल्पनाच कुणी केली नव्हती. रवींद्र जडेजाने एका धावेसाठी घाई केली … Read more

अजिंक्य रहाणे चेन्नईकडून सलामीला खेळणार ?? ; जाणून घ्या कसं

rahane and dhoni

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आयपीएल मध्ये आत्तापर्यंत चेन्नई सुपर किंग्स ची कामगिरी म्हणावी तशी समाधानकारक राहिली नाही.तीन वेळच्या आयपीएल विजेत्या चेन्नईला अजूनही सलामीच्या जोडी डोकेदुखी ठरत आहे. भरवशाचा मुरली विजय सलग अपयशी ठरला.परंतु अशातच चेन्नईसाठी एक मोठी संधी देखील चालून आली आहे. त्यांनी जर ही संधी साधली तर भारताचा फलंदाज अजिंक्य रहाणे चेन्नई कडून सलामीला … Read more

धोनीच्या ‘या’ मास्टर प्लॅनमुळे २०१५ वर्ल्ड कपमध्ये भारताने पाकिस्तानला धूळ चारली- सुरेश रैना

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आयसीसी विश्वचषकातील इतिहासाबद्दल बोलताना भारतीय संघाने आजपर्यंत या स्पर्धेत पाकिस्तानला पराभूत केले आहे. वर्ल्ड कपच्या इतिहासात हे दोन्ही संघ ७ वेळा आमने सामने आले असून यामध्ये टीम इंडियाने सातही वेळा विजय मिळविला आहे. २०१५ साली आयसीसी वर्ल्ड कप हा ऑस्ट्रेलियामध्ये खेळला जात होता. ज्यामध्ये ग्रुप स्टेजच्या सामन्यात अ‍ॅडलेड मैदानावर भारत आणि … Read more

न्यूझीलंडच्या काईल जेमीसनने भारतीय फलंदाजीला पाडले खिंडार,भारत ५ बाद १२२…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । न्यूझीलंड विरुद्ध भारत, पहिली कसोटी: पावसामुळे भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिल्या क्रिकेट कसोटी सामन्याचे शेवटचे सत्र वाया गेले. वेलिंग्टनमध्ये आज पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारताने पाच विकेट्सगमावून १२२ धावा केल्या. चहापानानंतरच पाऊस सुरू झाल्यामुळे शेवटच्या सत्रामध्ये खेळ झाला नाही त्यानंतर पंचांनी खेळपट्टीची तपासणी करून आजच्या दिवसाचा खेळ थांबविण्याची घोषणा केली. … Read more