मस्जिदीला देण्यात आलेल्या ५ एकरात काँग्रेस भवन उभारा – इम्तियाज जलील

औरंगाबाद प्रतिनिधी | आम्ही इतके दिवस लढलो ते पाच एकर जागेसाठी नाही. आमची लढाई खैरातीसाठी नव्हती. आम्हाला हा दिवस काँग्रेस पक्षामुळेच पहायला लागत आहे असं मत एमआयएम नेते इम्तियाज जलील यांनी व्यक्त केले आहे. मस्जिदीला देण्यात आलेल्या ५ एकरात काँग्रेस भवन उभारा असं म्हणत जलील यांनी अयोध्या निकालाबाबत आपली नापसंती व्यक्त केली आहे. औरंगाबाद येथे … Read more

पोलिसांचा सोशल मीडियावर कडक बंदोबस्त !

अयोध्या खटल्याच्या निकालानंतर कायदा सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने राज्यासह देशभरातील पोलिस प्रशासन कामाला लागले आहे. विशेष म्हणजे सोशल मीडियाच्या माध्यमातून कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस पहारा देत आहेत. पोलिसांचे सोशल मीडिया वर बारीक लक्ष असुन नागरिकांनी चुकीचे मेसेज पुढे पाठवले तर संबंधित व्यक्तीवर तत्काळ गुन्हे दाखल करण्याचे आदेश पोलिसांकडून देण्यात आले आहेत. संपूर्ण राज्यभर सायबर सेल सोशल मीडियाव लक्ष ठेवून आहेत. राममंदीरा संदर्भात कोणताही मैसेज किंवा स्टेटस दिसल्यास तत्काळ त्या व्यक्तीला फोन करून संबंधित पोस्ट हटवण्यासंदर्भात सूचना देण्यात येणार असल्याची माहिती आहे. जर सूचनेचे पालन करण्यात आले नाही तर त्या व्यक्तीवर तातडीने गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येणार आहे.

अयोध्या निकालावर तापसी म्हणते, ‘हो गया. बस. अब?’

मुंबई प्रतिनिधी | आज अयोध्या प्रकरणाचा ऐतिहासिक निकाल सर्वोच्च न्यायालयाने जाहीर केला. अयोध्येतील वादग्रस्त जागा ही हिंदूंची असल्याचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. या निकालानंतर सोशल मीडियावर प्रतिक्रिया येत आहेत. निकालाच्या पार्श्वभूमीवर अभिनेत्री तापसी पन्नू हिने ट्विटरवर तिची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. Ho gaya. Bas. Ab ? — taapsee pannu (@taapsee) November 9, 2019 तापसीने … Read more

अयोध्येत राममंदिरच..!! मशीद बांधण्यासाठी ५ एकर जागा मिळणार

 दिल्ली प्रतिनिधी | भारत देशात दीर्घकाळ प्रलंबित राहिलेल्या अयोध्या खटल्याची अंतिम सुनावणी आज सकाळी साडेदहा वाजता सुरू झाली. वादग्रस्त जागेवर राम मंदिर बनणार असल्याचं कोर्टाच्या निकालातून सिद्ध झालं आहे. या निकालात सुन्नी वक्फ बोर्डाला अयोध्येतच ५ एकर जागा देण्याचं जाहीर करण्यात आलं आहे. सर्वोच्च न्यायालयाचे मावळते सरन्यायाधीश रंजन गोगोई, नवनिर्वाचित सरन्यायाधीश शरद बोबडे, न्या. चंद्रचूड … Read more

राम जन्मभूमी – मंदिराला जागा मिळणार ?

टीम, HELLO महाराष्ट्र | अयोध्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयात काल मंगळवारी सुनावणी करण्यात आली. या सुनावणीत मुस्लिम पक्षकारांनी राम जन्मभूमीचे महत्व मान्य करत, मंदिराला जागा देण्यासाठी सकरात्मक असल्याचे स्पष्ट केले. राम लल्ला चे वकील सी.एस वैद्यनाथन यांनी असा दावा केला की वादग्रस्त जागेवर मशीद तयार करण्यासाठी मंदिर पाडले गेले. भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (एएसआय) खात्याने केलेल्या उत्खननानुसार तेथे एक … Read more

अयोध्या विवादाप्रकरणी त्रिसदस्यीय समितीत ‘हे’ तीन मध्यस्थ

Untitled design

नवी दिल्ली प्रतिनिधी | अयोध्या राम जन्मभूमी-बाबरी मस्जिद जमीन विवादाप्रकरणी सुप्रीम कोर्ट आज मध्यस्थीच्या मुद्यावर सुनावणी केली. सुप्रीम कोर्टाने मध्यस्थीसाठी त्रिसदस्यीय समिती स्थापन केली आहे. या समितीवर तीन जणांची नावं सुचवली आहेत. मध्यस्थीसाठी निर्मोही आखाडा आणि मुस्लिम पक्षकारांचा पाठिंबा होता. मात्र हिंदू महासभेने मध्यस्थीला विरोध केला होता. त्रिस्तरीय समितीत सुप्रीम कोर्टाचे माजी न्यायमूर्ती एफ एम … Read more