लष्करप्रमुखांनी आम्हाला राजकारण शिकवू नये – पी. चिदंबरम

तिरुवनंतपुरम | देशात नागरिकत्व सुधारणा कायद्यावरून अनेकांमध्ये मतभेद आहेत. या कायद्यावरून राजकीय स्टंटबाजीदेखील मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. त्यातच लष्करप्रमुखांनी या कायद्याविरोधात आंदोलन कर्त्यांना निशाणा केले. या पार्श्वभूमिवर कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी अर्थमंत्री पी चिदंबरम यांनी लष्करप्रमुख बिपीन रावत यांना सुनावले आहे. लष्करप्रमुख बिपीन रावत यांनी आम्हाला राजकारण शिकवण्याच्या फंदात पडू नये. त्यांनी स्वत:च्या कामात लक्ष … Read more

पी.चिदंबरम वकील म्हणून सुप्रीम कोर्टात पुन्हा हजर;सिब्बल-मनुसिंघवी यांच्या विरोधात लढणार केस

आयएनएक्स मीडिया ग्रुप आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात जमीन मिळाल्यानंतर पी. चिदंबरम आज सुप्रीम कोर्टात वकील म्हणून पुन्हा हजर होणार आहेत. १०६ दिवस तिहार तुरुंगात घालविल्यानंतर त्यांना जमीन मिळाला होता. त्यामुळं व्यवसायाने वकील असणाऱ्या पी. चिदंबरम यांनी पुन्हा वकील म्हणून सुप्रीम कोर्टात उभं राहणार आहेत. यासर्वांत गमतीशीर बाब म्हणजे ज्या कपिल सिब्बल आणि अभिषेक मनूसिंघवी यांनी चिदंबरम यांना जमीन मिळावा म्हणून जीवाचं रान केलं होत त्याच्याच विरोधात ते आज वकील म्हणून केस लढणार आहेत.

कांदे कमी खायला सांगणारं सरकार गेलेच पाहिजे – पी. चिदंबरम

कांद्याच्या भावाबाबत देशात खळबळ उडाली आहे, परंतु अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांचे म्हणणे आहे की मी कांदा खात नाही. म्हणून मला काही फरक पडत नाही. अर्थमंत्र्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय आक्रोश वाढला आहे. त्यामुळे १०६ दिवसांनंतर तुरूंगातून बाहेर आलेले माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी निर्मला सीतारमण यांच्यावर ट्विटद्वारे निशाणा साधला आहे. पी. चिदंबरम म्हणतात की ज्या सरकारने कमी कांदा खाण्यास सांगितले आहे. ते सरकार गेले पाहिजे.

पी. चिदंमबरम यांच्यावरील कारवाईत आम्ही सूडबुद्धीने वागलो नाही- नितीन गडकरी

आयएनएक्स मीडिया आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी काँग्रेस नेते आणि माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांना आज सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर करण्यात आला आहे. पी. चिदंबरम यांनी चौकशीला सहकार्य करावं आणि देश सोडून जाऊ नये या दोन अटींवर त्यांना न्यायालयाकडून जामीन मंजूर करण्यात आला आहे. पी. चिदंबरम यांना जामीन मंजूर करण्यात आल्यानंतर काँग्रेसने ट्विट करत नेहमी सत्याचाच विजय झाला असल्याचे सांगितले आहे. याच पार्श्वभूमीवर ‘भाजपा’चे नेते नितीन गडकरी यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.

पी.चिदंबरम यांना केलेली अटक ही सूडबुद्धीतून केलेली कारवाई होती- राहुल गांधी

आयएनएक्स मीडिया आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी काँग्रेस नेते आणि माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांना आज सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर करण्यात आला आहे. पी. चिदंबरम यांनी चौकशीला सहकार्य करावं आणि देश सोडून जाऊ नये या दोन अटींवर त्यांना सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर करण्यात आला आहे. पी. चिदंबरम यांना जामीन मंजूर करण्यात आल्यानंतर काँग्रेसने ट्विट करत नेहमी सत्याचाच विजय झाला असल्याचे सांगितले आहे.

अखेर चिदंबरम यांची होणार तिहारमधून सुटका

आयएनएक्स मीडिया प्रकरणी अटकेत असलेल्या माजी केंद्रीय गृहमंत्री आणि ज्येष्ठ काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांना सर्वोच्च न्यायालयाकडून अखेर दिलासा मिळाला आहे. याप्रकरणात ईडीने दाखल केलेल्या गुन्ह्यात न्यायालयानं चिदंबरम यांना २ लाख रूपयांच्या जातमुचलक्यावर जामीन दिला आहे. त्यामुळे चिदंबरम यांचा तिहार तुरूंगातून बाहेर येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.