मुली आणि महिलांकडे वाईट नजरेने बघणार्यांची बोटे कापा – मुख्यमंत्री हरियाणा

thumbnail 15315197422651

चंदीगढ | आपल्या टिप्पणीने सतत विवादात राहणारे हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी पुन्हाएकदा वादात्मक विधान केले आहे. ‘मुली आणि महिलांकडे वाईट नजरेने बघणार्यांची बोटे कापून टाका’ असे खट्टर यांनी जाहीर भाषणात म्हटले आहे. मात्र कार्यक्रम संपल्यावर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देताना त्यांनी या विधानावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. बोटे तोडा याचा अर्थ सक्तीने वागा असे … Read more

उध्दव ठाकरेंची आज पुण्यात गुप्त बैठक

thumbnail 1531539923274

पुणे | शिवसेना २०१९ च्या लोकसभा निवडणुका स्वबळावर लढवण्याच्या तयारीत आहे. मित्रपक्ष भाजपला जबर धक्का देण्याच्या पवित्र्यात असेलेल्या उद्धव ठाकरें यांनी त्यासंदर्भात पुण्यात गुप्त बैठकीचे आयोजन केले असल्याची समजत आहे. पुण्यातील कोरेगाव पार्कमधील पंचतारांकित हॉटेलमध्ये आज ही बैठक पार पडणार आहे. बैठकीत मिलिंद नॉर्वेकर, विजय शिवतारे, नीलम गोऱ्हे, उदय सामंत, गजानन किर्तीकर, शिवाजीराव आढळराव पाटील … Read more

बातमी काल दिवसभराची

thumbnail 15314482651911

१.अल्पसंख्याक शिक्षण संस्थेत मागासवर्गीयांना आरक्षण नाही-सर्वोच्च न्यायालय अल्पसंख्याक शिक्षण संस्थांमध्ये मागासवर्गीय विद्यार्थ्यांना आरक्षण मिळावे अशी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे.सदरची याचिका राज्य सरकारने उच्च न्यायालयात दाखल केली होती.सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाचा निकाल कायम ठेवला आहे. २.गणेशोत्सवा दरम्यान थर्माकोल वापरास बंदीच.मुंबई उच्च न्यायालय थर्माकोल उत्पादक आणि सजावटीचे कलाकार यांनी गणेशोत्सवात थर्माकोल ची बंदी शिथिल करावी … Read more

गजानन महाराजांची पालखी उस्मानाबाद शहरात

thumbnail 1531520761344

उस्नानाबाद | शेगाव चे संत गजानन महाराज यांची पालखी दर वर्षी पंढरपूरला जाते. गेल्या वर्षी पालखी सोबत चालत चाललेल्या हरीणामुळे पालखीचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. एरव्ही मराठवाड्यातून निघणाऱ्या संत एकनाथ महाराज आणि गजानन महाराज यांच्या पालख्या प्रसार माध्यमांच्या झोतात येत नाहीत. संत गजाननमहाराजांची पालखी उस्मानाबाद मुक्कामी होती. एक दिवसाचा मुक्काम करुन आज पालखी … Read more

दिल्लीत पहिल्या पावसाचे आगमन

thumbnail 15315203621038

दिल्ली | राजधानीत अाज पहिल्यांदा मान्सूनच्या पावसाचे आगमन झाले. उन्हाळा संपूण दीड महिना झाला तरी दिल्लीत पावसाचा पत्ता नव्हता. दिल्लीकर घामाने पुरते बेजार झाले होते. अशात आज पावसाने दमदार हजेरी लावल्याने देशाची राजधानी थंडावली आहे. मुसळधार पावसामुळे दिल्लीच्या सखल भागात पाणी साठले आहे. शहरातील मिंटो पुला खाली पाणी साठल्याने त्यात एक बस बुडाल्याची घटना काल … Read more

संभाजी भिडे त्यांच्या ‘त्या’ वक्तव्याने गोत्यात

thumbnail 1531518713276

नागपूर | ‘माझ्या दारात एक आंबा आहे त्या आंब्याची फळे खाल्ल्याने अनेकांना मुले झाली आहेत’ या वक्तव्याने भिडे गुरुजींना गोत्यात आणले आहे. भीमा कोरेगाव दंगलीत कथित सहभागाचे आरोप भिडे गुरुजींवर आहेत. भीमा कोरेगाव दंगली पासून भिडे गुरुजी सतत वादग्रस्त वक्तव्य करून चर्चेच्या मध्यमागी असतात. अशातच मागील महिन्यात नाशिकात भिडे गुरुजींनी आंब्याचे वक्तव्य केले होते. भिडे … Read more

चंद्रकांतदादा अजून किती बळी घेणार

thumbnail 1531473446086

कल्याण |रस्त्यांवरील खड्यांमुळे होणार्या अपघातांची संख्या येत्या काही दिवसांत वाढली आहे. रस्त्यात पडलेल्या खड्यांमधे गाडी गेल्याने ताबा सुटून अपघातात अनेक जणांना आपला प्राण गमवावा लागला अाहे. त्यामुलळे ‘रस्त्यावर पडलेले खड्डे दाखवा आणि एक हजार रुपये मिळवा’ अशी घोषणा करणाऱ्या चंद्रकांत दादांना सामान्य माणसे प्रश्न विचारू लागली आहेत. ‘तुम्ही अजून किती जणांचे बळी घेतल्यावर खड्डे बुजवणार … Read more

डोनाल्ड ट्रम्प उर्फ ‘तात्या’ प्रजासत्ताक दिनाला भारतात

thumbnail 1531459857074

दिल्ली | ट्रम्प तात्या या नावाने सोशल मिडियावर प्रसिद्ध असणारे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यंदाच्या प्रसासत्ताक दिनी भारत दौर्यावर येणार आहेत. जगावर पाटीलकी गाजवू पाहणाऱ्या बलाढ्य महासत्तेच्या राष्ट्रध्यक्षांना भारताने आपल्या प्रजासत्ताक दिनाचे निमंत्रण दिले आहे. वास्तविक पाहता हे निमंत्रण एप्रिल मध्ये देण्यात आले होते परंतु अद्याप यावर अमेरिकेकडून उत्तर देण्यात आलेले नाही. प्रसार माध्यमात या … Read more

जयंत सिन्हा यांनी दिले राहुल गांधींना ओपन चॅलेंच

thumbnail 1531447391630

दिल्ली | केंद्रीय राज्यमंत्री जयंत सिन्हा यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना चर्चेसाठी ओपन चॅलेंज दिले आहे. ट्विटरच्या माध्यमातून राहुल गांधी यांनी केंद्रीय राज्यमंत्री जयंत सिन्हांवर वार केला होता. बीफ विक्रेत्याला मारहाण करुन ठार करणार्यांना सिन्हा यांनी हार घालून गौरवल्याबद्दल राहुल गांधींनी निषेध नोंदवला होता. हॉर्वर्ड यूनिवर्सिटीचा माजी विद्यार्थी असलेल्या जयंत सिन्हा यांच्या विरोधात दाखल … Read more

पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्र्यांची पत्रकार परिषद

thumbnail 1530626427720

मुंबई : राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच नागपुर येथे विधिमंडळाचे मान्सून सत्र भरणार आहे. उद्यापासून सुरु होणार्या अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषद बोलावून अनेक मुद्द्यांना वाचा फोडली आहे. मुख्यमंत्र्यांनी आयोजीत केलेल्या सर्वपक्षीय चहापानावर विरोधकांनी बहिष्कार टाकल्याचे प्रकरण गाजत असतानाच मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषद बोलवून विरोधकांची बोलती बंद केली असल्याचे बोलले जात आहे. मुख्यमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेतील ठळक मुद्दे खालीलप्रमाणे … Read more