साहेब आपण आपल्या निर्णयाचा पुर्नविचार करा, रोहित पवारांची आजोबांना भावनिक साद

पुणे प्रतिनिधी | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काल आपण आगामी लोकसभा लढवणार नसल्याचे जाहीर केले. यानंतर पवार यांच्या कार्यकर्त्यांत त्यांच्या या निर्णयाबद्दल नाराजीचा सूर व्यक्त होत होता. पवार यांनी लोकसभा निवडणूक लढवावी अशी इच्छा पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून व्यक्त केली जात होती. यापार्श्वभुमीवर पवार यांचे नातू आणि पुणे जि.प. सदस्य रोहित पवार यांनी “साहेब आपण … Read more

पवारांकडून साताऱ्यातील दोन्ही राजांचे मनोमिलन

Untitled design T.

मुंबई प्रतिनिधी | राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी सातारा लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक बोलवली होती. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्यातील वाद मिटवण्याचा प्रयत्न केला. राष्ट्रवादीच्या बैठकीला शरद पवार, अजित पवार, उदयनराजे, शिवेंद्रराजे, जयंत पाटील उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी साताऱ्यातील दोन्ही राजांमध्ये पुन्हा … Read more

मनसे लोकसभा लढणार नाही ?

Untitled design

मुंबई प्रतिनिधी | राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांची चर्चा झाली असून मनसे लोकसभा निवडणूक लढण्यास इच्छूक नसल्याचे म्हटले जात आहे. मनसे फक्त महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक लढणार असल्याचे बोलले जात आहे. मनसे काँग्रेस- राष्ट्रवादी महाआघाडीत समाविष्ट होणार का नाही हा प्रश्न अजून उलगडला नाही. मात्र मनसे लोकसभा निवडणूक न लढता फक्त … Read more

नाशिकमध्ये उमेदवाराच्या नावावर शिक्कामोर्तब नाहीच…

Untitled design

नाशिक प्रतिनिधी | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे नाशिक मध्ये दोन दिवसाच्या दौऱ्यावर होते. नाशिकच्या या दौऱ्यात ते आगामी निवडणुकीचे उमेदवार घोषित करतील अशी कार्यकर्त्यांची अपेक्षा होती. मात्र पवारांनी उमेदवारांचे नाव घोषित करण्याची जबाबदारी छगन भुजबळ यांच्यावर दिली आहे. राष्ट्रवादीच्या बैठकीत पवारांनी नाशिक येथील उमेदवार आपण ठरवू असे सांगितले होते, मात्र नाशिकची जबाबदारी छगन … Read more

मावळमधे राष्ट्रवादीकडून ‘या’ लढणार ?

Untitled design

मुंबई प्रतिनिधी | आर. आर. पाटील यांच्या कन्या स्मिता पाटील यांनी मावळमधून निवडणूक लढवण्याचा आग्रह राष्ट्रवादी काँग्रेसने केला आहे. शरद पवारांनी पार्थ पवार यांच्या उमेदवारीला नकार दिल्यानंतर स्मिता पाटील यांचे नाव पक्षाने मावळसाठी पुढे आणले आहे. स्मिता पाटील यांच्याशी पक्षाच्या नेत्यांची प्राथमिक बोलणी झाली आहे. फक्त स्मिता पाटील यांच्याकडून होकार येण्याची पक्ष वाट बघतोय. आर. … Read more

डॉ.अमोल कोल्हेचा शिवसेनेला रामराम,’या’ पक्षात करणार प्रवेश

Untitled design

मुंबई प्रतिनिधी | अभिनेते अमोल कोल्हे हे शिवसेना सोडून राष्ट्रवादीत जाणार असल्याने शिवसेनेला ऐन लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर मोठा धक्का बसणार असल्याचे बोलले जात आहे. ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. कोल्हे हे राष्ट्रवादीकडून शिरुरमधून लोकसभा निवडणूक लढविण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. उद्याच ते पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थित प्रवेश करण्याची शक्यता … Read more

‘यांची’ आश्वासने म्हणजे ‘लबाड घरच आवताण’ – शरद पवार

Untitled design

रत्नागिरी प्रतिनिधी | २४ फेब्रुवारीला रत्नागिरी येथे महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेच्या ५५ व्या राज्यव्यापी वार्षिक अधिवेशनात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार बोलत होते. त्यावेळी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आश्वासनांचा पाणउतारा केला. ‘मुख्यमंत्र्यांचं वागणं, बोलणं लबाडाच्या घरच आवताण’ असल्याची टीका शरद पवार यांनी केली. मुख्यमंत्र्यांनी दिलेला एकही शब्द पूर्ण केला नाही.पाच वर्षापूर्वी मुख्यमंत्री यांनी बारामतीला … Read more

महाआघाडीत ‘मनसेला’ प्रवेश नाही

Untitled design

मुंबई प्रतिनिधी | राष्ट्रवादीचे काँग्रेसचे अजित पवार यांनी मनसेला महाआघाडीत घेण्यासाठी प्रस्ताव पाठविला होता. मात्र मनसे आणि आमचे विचार वेगवेगळे असल्याकारणाने काँग्रेस ने त्यांना महाआघाडीत येण्यास नकार दिला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचा मनसेला महाआघाडीत घेण्याचं प्रयत्न फसला आहे. मनसेला महाआघाडीत स्थान नसल्याचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण आणि संजय निरुपम यांनी राष्ट्रवादीला कळविले आहे. समविचारी पक्षांनीं … Read more

शरद पवारांसमोर कार्यकर्त्यांचा राडा

Untitled design

सातारा प्रतिनिधी |    राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी लोकसभेची आगामी निवडणूक माढा मतदार संघातून लढविणार असल्याचे स्पष्ट केले होते. मात्र त्यांच्या या माढा मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेसची अंतर्गत गटबाजी असल्याचे उघड झाले. शरद पवारांनाही याचा अनुभव आला.दोन गटांमधील वाद पवारांसमोर उघड झाला. साताऱ्यात शरद पवार बोलत असताना पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जोरदार राडा घातला. या वेळी पोलिसांना … Read more

पवारांचा प्रचार करायचा असेल तर, भाजपकडून मिळालेले पद सोडा…

Untitled design

पंढपूर प्रतिनिधी | लोकसभेच्या निवडणुकीच्या धर्तीवर शिवसेना- भाजप यांची युती झाली, राष्ट्रवादी काँग्रेस- काँग्रेस यांच्या महाआघाडीच्या प्रचार सभेला काल पासून सुरवात झाली. आता कोणला कुठे उमेदवारी द्यायची याची खलबत सुरु झाली आहेत. राष्ट्रवादीचे शरद पवार यांनी माढा लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतल्यानंतर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे यांनी शरद पवार यांची भेट घेतली. … Read more