काय सांगता ! ज़िल्हा परिषदेतील नवे शिपाई एम.एस्सी, एमबीए, एमकॉम झालेले

औरंगाबाद – वर्ग ‘क’ ची शेकडो पदे रिक्त असताना जिल्हा परिषदेने अनुकंपाधारकांची भरती प्रक्रिया राबविताना उमेदवारांच्या शैक्षणिक अर्हतेचा विचार न करता त्यांची सरसकट शिपाई पदावर निवड केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. या निवड यादीतील 15 जण बी.ई, बी.एस्सी., एम.एस्सी., बी.ए.बी.एड, बी.कॉमसह टायपिंग परीक्षा उत्तीर्ण आहेत. या उमेदवारांची शासन निर्णयानुसार वर्ग ‘क’ मधील लिपिकासह अन्य पदावर … Read more

जि. प. शिक्षण विभागातील कारकून लाचेच्या जाळ्यात

Lach

औरंगाबाद – मयत वडिलांचे वैद्यकीय प्रतिपूर्तीचे बिल उपसंचालक कार्यालयात पाठवण्यासाठी 7 हजार रूपयांची लाच घेताना जिल्हा परिषदेतील माध्यमिक शिक्षण विभागातील वरिष्ठ सहाय्यक तुळशीराम आसाराम गायकवाड रंगेहाथ एसीबीच्या जाळ्यात अडकले आहेत. औरंगाबादच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने काल ही कारवाई केली. मयत वडिलांच्या मृत्यूनंतर त्यांच्या उपचारासाठी झालेला खर्च वैद्यकीय प्रतिपूर्तीतून मिळावा यासाठी संचिका दाखल केल्यावर शिक्षण उपसंचालक कार्यालयात … Read more

जिल्हा परिषदेचे देखील वाढणार आठ गट 

औरंगाबाद – राज्य मंत्रिमंडळाने काल राज्यातील जिल्हा परिषदांची संख्या वाढविण्यास मंजुरी दिली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील वाढलेली मतदार संख्या लक्षात घेता जिल्हा परिषदेचे आठ गट वाढण्याची शक्यता आहे. त्या तुलनेत पंचायत समितीचे 16 गण वाढतील त्यामुळे सदस्य संख्या 62 वरून 70 होऊ शकते. फेररचना झाल्यास आरक्षणाचे रोटेशन न होता उतरत्या क्रमाने गट, गण सुटतील असे राजकीय … Read more

जिल्हा परिषदेत ‘संभाजीनगर’ चा ठराव

औरंगाबाद – औरंगाबाद शहराचे नाव बदलून संभाजीनगर करण्याची शिवसेनेची अनेक वर्षांची जुनी मागणी आहे. याविषयी राज्य सरकारने केंद्राकडे पाठवलेला प्रस्ताव अद्यापही प्रलंबित आहे. परंतु, आगामी महानगर पालिका व जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोमवारी झालेल्या जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत औरंगाबाद शहराचे संभाजीनगर असे नामांतर करावे असा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला आहे. जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत … Read more

जिल्हा परिषद निवडणुकांचे वेध; नोव्हेंबर अखेरपर्यंत जाहीर होणार आरक्षण सोडत

औरंगाबाद – येत्या फेब्रुवारी महिन्यात औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे. जिल्हा परिषदेच्या विद्यमान सभागृहाचा कार्यकाळ दोन महिन्यांत समाप्त होत आहे. फेब्रुवारीतील या निवडणुकांची शक्यता गृहित धरून जिल्हा परिषद अध्यक्षपदासह विविध गटांतील आरक्षणाची सोडत नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात काढण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या आरक्षण सोडतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. औरंगाबाद जिल्हा … Read more

जिल्हा परिषदेच्या मालमत्तेवर अतिक्रमण करणाऱ्यांविरोधात जि.प. प्रशासनाने कसली कंबर

औरंगाबाद – जिल्हा परिषदेच्या मालकीच्या कोट्यावधींच्या जागा, मालमत्ता भूमाफियांच्या घशात गेल्या आहेत, तर उर्वरित अनेक जागा गिळंकृत करण्यासाठी भूमियांचे प्रयत्न सुरु आहे. जिल्हा परिषदेच्या मालमत्तेवर होत असलेले अतिक्रमण रोखण्यासाठी व गेलेल्या जागा पुन्हा ताब्यात घेण्यासाठी जि.प.ने कंबर कसली आहे. त्या दृष्टीने मालमत्ता कक्ष स्थापन करून प्रत्येक जागा, मालमत्तेची स्वतंत्र संचिका तयार करून त्या संरक्षित करण्याचे … Read more

सकारात्मक ! ग्रामीण भागात आजपासून पाचवी ते सातवी शाळांच्या वाजणार घंटा

औरंगाबाद – मागील दीड वर्षापासून कोरोनामुळे तसेच लॉकडाऊन मुळे शाळा बंद असल्याने विद्यार्थी गेल्या दीड वर्षापासून प्रत्यक्ष शिक्षण प्रवाहापासून दूर आहेत. अशा विद्यार्थ्यांसाठी आज पासून ग्रामीण भागातील पाचवी ते सातवीचे वर्ग सुरू केली जाणार असल्याची घोषणा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश गटणे यांनी केली आहे. शिक्षक दिनानिमित्त शहरातील एमजीएम विद्यापीठातील रुख्मिणी सभागृहात आयोजित आदर्श … Read more

शिक्षकदिनी २८ शिक्षकांचा होणार सन्मान; जिल्हा परिषदेचे आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर

teachers day

औरंगाबाद – जिल्हा परिषदेतर्फे दरवर्षीप्रमाणे यावर्षीही शिक्षक दिनी आदर्श शिक्षक पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे. त्यानिमित्त २८ शिक्षकांचा आज ५ सप्टेंबर रोजी सायंकाळी एमजीएम विद्यापीठाच्या रुक्मिणी हॉलमध्ये सन्मान करण्यात येणार आहे. जि. प. अध्यक्षा मीना शेळके, शिक्षण सभापती अविनाश गलांडे, मुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश गटणे, समाजकल्याण सभापती मोनाली राठोड, शिक्षणाधिकारी डॉ. बी. बी. चव्हाण यांच्या … Read more

प्रधानमंत्री आवास योजनेत औरंगाबाद जिल्हा परिषदेला प्रथम क्रमांक

zp

औरंगाबाद – दगड मातीच्या घरात वास्तव्य करणाऱ्या कुटुंबांना हक्काचा निवारा मिळावा यासाठी केंद्र तसेच राज्य शासनाच्या वतीने विविध आवास योजना राबविण्यात येतात. गरीब कुटुंबियांसाठी स्वत:चे हक्काचे सुरक्षित घर असणे ही त्यांच्यासाठी आयुष्यात महत्वपूर्ण बाब आहे. अधिकाऱ्यांनी विविध घरकुल योजना राबवतांना केवळ प्रशासकीयदृष्ट्या विचार न करता भावनिकदृष्ट्या विचार करुन काम करावे जेणेकरुन योजनेच्या कामाच ओझ वाटणार … Read more