राज्य शासन शेतकरी आणि वारकऱ्यांच्या पाठिशी राहील- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

CM Devendra Fadanvis Adressing Farmers

शिर्डी । सतिश शिंदे राज्य शासन शेतकरी आणि वारकऱ्यांच्या पाठिशी आहे. कर्जमाफी, बोंडअळी अनुदान, इतर पिकांसाठी अनुदान थेट शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यावर जमा करण्यात आले आहे. तसेच शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमीभाव देण्याचे धोरण शासनाने घेतले. अडचणीच्या काळात शासन खंबीरपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहील, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. श्री क्षेत्र शनि शिंगणापूर येथे शेतकरी मराठा … Read more

आजच्या काळातील विद्यार्थ्यांनी स्वत; मधील सुप्त गुणांना वाव द्यावा – शिक्षणमंत्री विनोद तावडे

Vinod Tawde

मुंबई । सतिश शिंदे आजच्या काळात विद्यार्थ्यांनी अभ्यासाला महत्त्व देताना त्यांच्यामध्ये असणाऱ्या सुप्त गुणांनाही वाव द्यावा, असे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी सांगितले. बाल दिनाच्या निमित्ताने चर्नी रोड येथील जवाहर बाल भवन येथे शिक्षणमंत्री श्री. तावडे यांच्या प्रमुख उपस्थितीत आंतर शालेय चित्रकला स्पर्धा बक्षिस समारंभ पार पडला. यावेळी कवी प्रशांत मोरे, मुंबई शिक्षक परिषदेचे अध्यक्ष अनिल … Read more

शेती उपयोगी ‘शेतकरी’ मासिकाचे कृषीमंत्री पाटील यांच्या हस्ते प्रकाशन

Shetkari Masik

मुंबई प्रतिनिधी | स्वप्नील हिंगे महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या वतीने प्रकाशित होणाऱ्या ‘शेतकरी’ मासिकाचे प्रकाशन महसूल मंत्री व कृषी मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते झाले. ज्वारी, बाजरी, नाचणी सारख्या तृणधान्यांची लागवड ते काढणीपर्यंतची सविस्तर माहिती या मासिकाच्या विशेषांकात दिली आहे. याचा तृणधान्य उत्पादक शेतकऱ्यांना फायदा होईल अशी माहीती चंद्रकांत प‍ाटील यांनी दिली. मुंबई येथील प्रकाशन … Read more

ओबीसींना धक्का न लावता मराठा-कुणबींना स्वतंत्र १६ टक्के आरक्षण द्या- नारायण राणे

Narayan Rane

मुंबई | इतर मागासवर्गीयांच्या (ओबीसी वर्ग) आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला स्वतंत्र १६ टक्के आरक्षण आम्ही दिले होते. आताही पुन्हा तीच मागणी करत आहोत. मात्र हे आरक्षण देताना कलम १६ आणि १७ नुसार कायद्याच्या चौकटीत बसणारे व टिकणारे हवे, अशी भूमिका महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आणि खासदार नारायण राणे यांनी बुधवारी मांडली. मराठा … Read more

उमेदवारीसाठी भाजपमध्ये शक्ती प्रदर्शन, मंत्री प्रा. राम शिंदे यांची परीक्षा

महापालिका निवडणुका

अहमदनगर | शिवसेना व भाजपच्या युतीचे चिन्हे दिसत नसल्याने शिवसेनेपाठोपाठ आता भाजपनेही उमेदवार निश्चितीकडे पाऊले उचलली आहेत. आज इच्छुकांच्या मुलाखती झाल्या. मोठ्या शक्तीप्रदर्शनात येवून उमेदवारांनी आपली ताकद दाखवून दिली. या मुलाखती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिनिधी रघुनाथ कुलकर्णी, नगर प्रभारी आमदार सुरजितसिंह ठाकूर, कोअर कमिटीचे सदस्य जिल्ह्याचे पालकमंत्री प्रा. राम शिंदे, खासदार दिलीप गांधी यांनी … Read more

तर सरकारी कार्यालयांमधेही भरणार संघाच्या शाखा

RSS

भोपाळ | मध्यप्रदेश मधे सध्या विधानसभा निवडणुकींमुळे राजकीय वातावरण पेटले आहे. दोन दिवसांपूर्वीच काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी काँग्रेसची सत्ता आल्यास संघाच्या शाखांवर बंदी आणू असे वक्तव्य केले होते. याला प्रत्यत्तर देत भाजपा ने सत्ता आल्यास संघाच्या शाखा सरकारी कार्यालयांमध्येही भरतील असे म्हटले आहे. भाजपचे शिवराज सिंह यांनी काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवत मध्यप्रदेश मधे भाजप … Read more

रायगड जिल्हा होणार महामुंबई चा भाग, मुख्यमंत्र्यांचे सुतोवाच

Devendra Fadanvis

रायगड । सतिश शिंदे पूर्वी नदीच्या काठावर मानवी संस्कृतीचा विकास झाला. आताच्या आधुनिक काळाच्या संदर्भात बोलावयाचे झाल्यास जेथे जेथे दळणवळण सुविधा उपलब्ध आहेत तेथे संस्कृतिचा विकास होईल. मुंबई, नवी मुंबई, एमएमआरडीए अंतर्गत येणारा परिसर येथे निर्माण होणाऱ्या वेगवान दळणवळण सुविधांचा रायगड जिल्ह्यापर्यंत होणारा विकास पाहता हे सर्व क्षेत्र एकत्र ‘महामुंबई’ म्हणूनच विचार करावा लागेल, त्यासाठी … Read more

प्रत्येक महसूल मंडळनिहाय पीक पाहणी करून फेर सर्व्हेक्षण करा- चंद्रशेखर बावनकुळे

Chandrashekhar Bawankule

भंडारा | सतिश शिंदे कमी पावसामुळे नुकसान झालेल्या धान उत्पादक शेतकऱ्यांच्या पिकाच्या नुकसानीचा महसूल मंडळनिहाय फेर सर्व्हे करून शासनास अहवाल सादर करण्याचे निर्देश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले. दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात लोकप्रतिनिधी व प्रशासकीय अधिकारी यांच्या आयोजित बैठकीत ते बोलत होते. आमदार सर्वश्री चरण वाघमारे, रामचंद्र अवसरे, बाळा काशिवार, जिल्हाधिकारी शांतनू गोयल, अप्पर … Read more

दुष्काळाशी सामोरे जाण्यासाठी यंत्रणांनी अतिशय संवेदनशील रहावे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Devendra Fadanvus

जालना | सतिश शिंदे येत्या तीन-चार महिन्यात दुष्काळाच्या परिस्थितीला सामोरे जावे लागणार आहे. या पार्श्वभूमीवर शासनाच्या सर्व यंत्रणांनी अत्यंत संवदेनशीलपणे तयारी करावी. तसेच पिण्याचे पाणी व चारा नियोजनाला प्राधान्य द्यावे, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. जालना जिल्ह्यातील दुष्काळ परिस्थितीतील उपाय योजनांचा व शासनाच्या महत्वाकांक्षी योजनांचा आढावा मुख्यमंत्र्यांनी जालना येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आयोजित … Read more

दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी शासन हे शेतकऱ्यांच्याच पाठीशी राहिल – पालकमंत्री चंद्रकांत पाटील

Chandrakant Patil

जळगाव | सतिश शिंदे पावसाळ्याच्या शेवटच्या टप्प्यात पावसाने ओढ दिल्याने राज्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून शासनाने राज्यातील १५१ तालुक्यांत दुष्काळ सदृश परिस्थिती जाहीर केली आहे. यामध्ये जिल्ह्यातील १५ पैकी १३ तालुक्यांचा समावेश आहे. या परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी शासन खंबीरपणे शेतकऱ्यांच्या पाठिशी असून बोंडअळीमुळे नुकसान झालेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खाती १४३ कोटी रुपयांची नुकसान भरपाई दिवासळीपूर्वी … Read more