स्कॉर्पिओ आणि अल्टोची समोरासमोर भीषण धडक; 2 भाविक जागीच ठार

car accident

अहमदनगर : हॅलो महाराष्ट्र – अहमदनगरमध्ये मोहटादेवीचे दर्शन घेऊन परतणाऱ्या दोन भाविकांवर काळाने घाला घातला आहे. औरंगाबाद-बारामती राज्य मार्गावर भरधाव स्कॉर्पिओ आणि अल्टो कारची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात (car accident) 2 भाविक जागीच ठार झाले आहेत. पाथर्डी तालुक्यातील काळेगाव शिवारात औरंगाबाद बारामती राज्य मार्गावर शुक्रवारी रात्री आठच्या सुमारास हा भीषण अपघात car accident) … Read more

नागपूरमध्ये भीषण अपघात; कार- दुचाकीच्या धडकेत चौघे 80 फूट उड्डाणपूलावरून खाली

accident

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | नागपूर येथे कार आणि दुचाकी मध्ये भीषण अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. या अपघातात कारच्या धडकेने दुचाकी थेट 80 फूट उंच उड्डाणपूलावरून खाली कोसळली. यामध्ये 4 जणांचा मृत्यू झाला. नागपूरच्या सक्करदरा पुलावर हा अपघात झाला आहे. पूलावरून जाणाऱ्या चार दुचाकींना मागून येणाऱ्या एका भरधाव चारचाकीने जोरदार धडक दिली. हा अपघात … Read more

विनायक मेटे यांच्यावर होणार शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; मुख्यमंत्री शिंदेंचे आदेश

Eknath Shinde Vinayak Mete 01

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसंग्राम संघटनेचे नेते विनायक मेटे हे मराठा समाजाच्या बैठकीसाठी पुण्याहून मुंबईला निघाले असताना त्यांच्या गाडीला अपघात झाला. डोक्याला जबर मार लगाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर पनवेल येथील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. “या अपघाताची सखोल चौकशी करण्याचे आदेश  अधिकाऱ्यांना दिले असून मेटे यांच्यावर उद्या बीड येथील त्यांच्या गावी शासकीय … Read more

100 नंबर फिरवला, पण तासभर मदत मिळालीच नाही; मेटेंच्या चालकाचा गंभीर आरोप

Eknath Kadam Vinayak Mete car accident

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मराठा आरक्षणासाठी संघर्ष करणारे शिवसंग्राम संघटनेचे नेते विनायक मेटे हे मराठा समाजाच्या बैठकीसाठी पुण्याहून मुंबईला निघाले होते. बैठकीला जात असताना खोपोली बोगद्याजवळ त्यांच्या गाडीला अपघात झाला. डोक्याला जबर मार लगाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघात झाल्यानंतर त्यांच्यासोबत असलेल्या वाहन चालक एकनाथ कदम यांनी गंभीर आरोप केले आहेत. “अपघातानंतर 100 नंबरवर अनेकदा … Read more

पुणे बेंगलोर महामार्गावर Maruti गाडी पलटी होऊन पेटली; टायर फुटून दुर्घटना

Car Accident News

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी पुणे-बंगलोर आशियाई महामार्गावर कराड तालुक्यातील वनवासमाची- खोडशी गाव हद्दीत एका वॅगनार कारचा टायर फुटून ती पलटी होऊन अपघात झाला. गुरुवारी सकाळी 8:30 वाजण्याच्या सुमारास हि घडली. या अपघातानंतर कारने अचानकपणे पेट घेतला. प्रसंगावधान राखत कारमधील 5 जण बाहेर पडल्याने ते सुखरूप बचावले. या अपघातात कारचे मात्र मोठ्या प्रमाणात नुकसान झाले … Read more

ब्रह्मानंद पडळकर यांच्या गाडीला भीषण अपघात, कार – टेम्पोची समोरासमोर जोरदार धडक

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांचे जेष्ठ बंधू आणि माजी समाजकल्याण सभापती ब्रम्हानंद पडळकर यांची इनोव्हा गाडी आणि मालवाहतूक टेम्पो यांची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला. हा अपघात आज रविवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास विटा – कुंडल रस्त्यावर आळसंदजवळ घडला. या भीषण अपघातात ब्रम्हानंद पडळकर हे गंभीर जखमी झाले असून … Read more

गोपीचंद पडळकरांच्या भावाच्या गाडीला भीषण अपघात

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाविकास आघाडी व राष्ट्रवादी काँग्रेसवर वारंवार टीकास्त्र सोडण्याचे काम भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्याकडून केले जातंय. काही दिवसापूर्वी त्याच्यावरही हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. आता त्यांच्यानंतर त्यांचे बंधू आणि सांगली जिल्हा परिषदेचे सदस्य ब्रम्हानंद पडळकर यांच्या गाडीला भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. या अपघात ब्रम्हानंद पडळकर यांच्यासह तिघे जखमी … Read more

कारला पाठीमागून डंपरची धडक; एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू

Accident

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कारला मागून डम्परने धडक दिल्याने मलकापूर-कऱ्हाड येथील एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाला. पेठ ते सांगली रस्त्यावर आष्टानजीकच्या गाताडवाडी येथे शनिवारी (ता.२६) सकाळी नऊ वाजताच्या सुमारास हा अपघात झाला. सदर कुटुंबीय सांगलवाडी येथे घरगुती कार्यक्रमाला जात असताना हा दुर्दैवी अपघात घडला. प्राप्त माहितीनुसार, मलकापूरचे व्यावसायिक अधिकाराव पोळ (४९), त्यांची आई गीताबाई … Read more

टाटा कार आणि क्रुझरच्या अपघातात 13 जण जखमी, दोघांची प्रकृती चिंताजनक

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे जत अथणी रोडवर आज सायंकाळी झालेल्या टाटा कार आणि क्रुझर च्या अपघातात १३ जण जखमी झाले असून यापैकी दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना उपचारार्थ सांगलीच्या शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघातातील वंदना दिलीप परदेशी ही पंढरपूर येथील आहे. बाकीचे सर्व कर्नाटक राज्यातील कोहळी व बेळगाव जिल्ह्यातील महालिंगपूर येथील … Read more

पुणे मुंबई हायवेवर मोठा अपघात! दोन ट्रकच्या धडकेत कारचा चक्काचूर; 4 जण ठार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वर भीषण अपघात झाला असून यात 4 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे तर तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर एम. जी. एम. रुग्णालयात उपचार सुरु आहेत. खोपोलीजवळ बोरघाटात हा भीषण अपघात झालाय. या अपघातात कार चा चक्काचूर झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एका ट्रेलरचा ब्रेक फेल झाल्याने सहा ते … Read more