मुंगसाच्या केसांपासून बनवलेले 1 हजार 735 पेंटींग ब्रश जप्त; वनविभागाची कारवाई

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी कराड शहरात विविध रंग व्यवसायिक दुकानदारांवर वन विभागाने धाड टाकून मुंगूस या वन्य प्राण्याच्या केसांपासून बनवलेले ब्रश मोठ्या प्रमाणावर जप्त केले. बुधवारी १५ रोजी वनविभागाने ही धडक कारवाई केली. यामध्ये कराड व मलकापूर येथील ५ दुकानदारांकडून मुंगूसाच्या केसांपासून बनवलेले 1 हजार 735 ब्रश जप्त करण्यात आले आहेत. याबाबत वन विभागाकडून … Read more

पुन्हा येणकेत बिबट्या : एका बिबट्यास जेरबंद करताच दुसऱ्याच्या दर्शनाने लोकांच्यात घबराट

Leopard

कराड : तालुक्यातील येणके येथे शनिवार दिनांक 27 रोजी सकाळी 7.30 वाजता वन विभागाने एका बिबट्यास सापळ्यात जेरबंद करून ताब्यात घेतले आहे. तर त्यानंतर अवघ्या तासाभरात 8.30 वाजता याच गावात पुन्हा बिबट्याचे दर्शन झाल्याने लोकांच्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे वन विभागाने या गावात असणाऱ्या बिबट्याचा शोध घेण्याची मागणी ग्रामस्थांच्यातून केली आहे. येणके येथे … Read more

सुलीभंजन परिसरात बिबट्याचा वावर; पर्यटकांमध्ये भीतीचे वातावरण

Bibatya

औरंगाबाद | काही दिवसांपूर्वी वेरूळ परिसरात असलेल्या बिबट्याने गुरूवारी सकाळी सुलीभंजनकडे जाणाऱ्या मार्गावर नागरिकांना पुन्हा एकदा दर्शन दिल्याने सुलीभंजन परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बिबट्या दिसल्याची माहिती वन विभागाला समजताच पथकाने या परिसरात शोध मोहीम राबवली. नागरिकांनी सतर्क राहावे व जंगल परिसरात प्रवेश करु नये, असे आवाहन वनपरिक्षेत्र अधिकारी अण्णासाहेब पेहरकर यांनी केले आहे. … Read more

बिबट्याचे पिल्लू विकणे आहे : पठ्ठ्यानं फेसबुकवर टाकली जाहिरात अन पुढे झालं असं काही…

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी बिबट्याचे पिल्लू विकणे आहे, अशी फेसबुकवर जाहिरात करणाऱ्या एकाला वनविभागाने अटक केली आहे. शुक्रवारी दि.23 जुलै रोजी मिळालेल्या गुप्त माहितीवरून कराडच्या वनविभागाने कराड तालुक्यातील वसंतगड येथील ऋषीकेश शामराव इंगळे उर्फ लाल्या असे अटक केलेल्याचे नांव आहे. वनविभागाने दिलेली माहिती अशी, ऋषीकेश इंगळे उर्फ लाल्या (मूळ रा.म्हसवड सध्या रा. वसंतगड ता.कराड) … Read more

ढेबेवाडी विभागात बिबट्याच्या हल्ल्यात गाय व शेळी ठार

Bibatya

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी पाटण तालुक्यातील ढेबेवाडी विभागातील दुर्गम निवी व कसणी परिसरात बिबट्याच्या हल्ल्यात गाय व शेळीचा मृत्यू झाला. बिबट्याच्या वाढत्या उपद्रवाने तेथील नागरिकांत भीतीचे वातावरण आहे. सातारा व सांगली जिल्ह्याच्या सीमेवर घनदाट जंगलालगत वसलेल्या निवी-कसणी परिसरात वन्य प्राण्यांचा सतत उपद्रव जाणवत आहे. बिबट्याने केलेल्या हल्ल्यात गाय व शेळीचा मृत्यू झाल्याची घटना नुकतीच … Read more

वनविभागाच्या फिरत्या पथकाने हस्ती दंत विकणारी टोळी पकडली; इनोव्हा गाडी, तीन मोबाईल, तीन हस्ती दंत जप्त

कोल्हापूर । कोल्हापूर-पन्हाळा रस्त्यावर हॉटेल ग्रीन फील्डजवळ हस्ती दंत घेऊन विक्रीसाठी येणार असल्याचे माहिती मिळाली. त्या माहितीच्या आधारे कोल्हापूर व सातारा वनपरिक्षेत्र यांचे फिरते पथकाने कारवाई केली. यावेळी तीन आरोपींच्या कडून एक इनोव्हा गाडी क्रमांक (MH09 AQ 6661), तीन मोबाईल, हस्ती दंत 3 नग (वजन 965 ग्राम ) असे सर्व जप्त करण्यात आले. या कारवाईत … Read more

भर रस्त्यात चक्क माणसांसोबत खेळतोय बिबट्या; Video पाहून व्हाल थक्क

Leopard Playing with Human

हॅलो महाराष्ट्र आॅनलाईन | बिबट्या प्राणी अतिशय धोकादायक समजला जातो. गेल्या काही दिवसापासून महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये बिबट्याने खूप मोठ्या प्रमाणावर हाहाकार माजवला होता. काही लोकांना बिबट्याने मारले होते. त्यामुळे बिबट्याचे नाव ऐकले तरी लोकांचा थरकाप उडू लागला होता. दरम्यान इंटरनेटवर एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यामध्ये हिमाचल प्रदेश येथील तीर्थंन व्हॅलीमध्ये एक बिबट्या तेथील थांबलेल्या … Read more

म्हणुन तो बिबट्या NH4 हायवेवर बसून राहिला; कराड-नांदलापूर फाट्याजवळील घटना (Video)

Leopard

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी पाचवड फाटा (नांदलापूर) ता. कराड दरम्यान पुणे-बेंगलोर महामार्गालगत बिबट्याने काही क्षण ठोकला. एवढ्या वाहनांच्या रहदारीतही बिबट्याने महामार्गावर तळ ठोकल्याने वाहनधारकांचीही भंबेरी उडाली. बिबट्याने महामार्गावर काही क्षण विश्रांती घेतलयानंतर त्याने तेथून धूम ठोकली. दरम्यान, महामार्गवर बसलेल्या बिबट्याचे काही वाहनधारकांनी केलेले चित्रीकरण सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी … Read more

कोल्ह्याने सिंहाची शेपूट खेचली आणि…पहा व्हिडीओ

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल काही सांगता येत नाही. बऱ्याचदा काही मजेशीर व्हिडीओ शेअर केले जात असतात. आता असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. जो बऱ्यापैकी व्हायरल होतो आहे. या व्हिडिओची गंमत म्हणजे एक कोल्हा चक्क जंगलाच्या राजाची शेपूट खेचतो आहे. तसा हा व्हिडीओ पाहणाऱ्याला खूपच मजेशीर वाटतो. ओडिसामध्ये नोकरीत … Read more

देशातील २०० शहरांत उभारली जाणार शहरी जंगले; प्रकाश जावडेकरांची घोषणा

नवी दिल्ली । आज जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून पर्यावरण, वन, आणि हवामान बदल मंत्री यांनी भारतातील २०० महानगरपालिकेच्या शहरांमध्ये ‘नागरी वन’ उपक्रम कार्यक्रमाचा शुभारंभ केला आहे.  भारतात मोठ्या प्रमाणात वने ही ग्रामीण भागात आहेत पण शहरांमध्ये फारशी वने पाहावयास मिळत नाहीत. म्हणूनच ‘नागरी वन’ उपक्रम सुरु करीत आहोत. असे ते म्हणाले. शहरात उद्याने, बाग आहेत. … Read more