कराडचा जवान पंजाबमध्ये शहीद

Untitled design

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी  कराड तालुकयातील पाचुंद येथील जवान विठ्ठल महादेव जाधव (वय २६) पंजाब येथील फिरोजपूर सीमेवर देशसेवेचे कर्तव्य बजावत असताना शहीद झाले आहेत. विठ्ठल जाधव २०१५मध्ये बीएसएफमध्ये भरती झाले होते. राजस्थान येथे त्यांचे पहिले पोस्टिंग झाले होते. तिथे त्यांनी दोन वर्षे सेवा बजावल्या नंतर त्यांची पंजाब येथे बदली झाली होती. गेली दोन वर्षे … Read more

कुऱ्हाडीचा घाव घालून पत्नीचा खून

Untitled design

कराड प्रतिनिधी|सकलेन मुलाणी तालुक्यातील चोरे येथे दारूच्या नशेत पतीने पत्नीवर कुऱ्हाडीने गळ्यावर घाव घालून खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सोमवार, २० मे रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. शशिकला आनंदा सातपुते  (वय ५०) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. तर आनंदा दादू सातपुते (वय ५५) … Read more

कोयना नदीतील घटना : कडक उन्हामुळे जंगलातील प्राण्याची पाण्यासाठी वणवण

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी पाटण येथील कोयना नदीवरील पाटण वरून मोरगिरी परिसराला जोडणारा जलसेतू याच्या खालील बाजूस कोयना नदीत जंगलातून पाण्याच्या शोधात आलेला गवारेडा शनिवारी सकाळी मूर्त अवस्थेत दिसून आला आहे. त्यामुळे नेरळे पुलावरून ये-जा करणाऱ्यांची पुलावर शनिवारी सकाळी चांगलीच गर्दी जमली होती. तसेच जंगलातील पाणीसाठा संपल्याने प्राण्यांनाही कडक उन्हामुळे पाण्यासाठी वणवण करावी लागत … Read more

शेडगेवाडी येथे वारणा जलसेतूवरून पडून बिबट्या ठार

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी शेडगेवाडी (ता. शिराळा) येथील वारणा जलसेतूवरून जाताना अंदाज न आल्याने सुमारे दीडशे फूट उंचीवरून पडल्याने बिबट्या जागीच ठार झाल्याची घटना घडली आहे. खुजगाव- शेडगेवाडी दरम्यान असणाऱ्या जलसेतूवरून जाताना बिबट्या शुक्रवारी रात्री नऊच्या सुमारास पडला. घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, शुक्रवारी रात्री पूर्ण वाढ झालेला बिबट्या जलसेतूवरून जाताना पडला. त्यावेळेस एका ॲकॅडमीतील … Read more

कराड : खासगी ट्रॅव्हल्स व्यावसायिकांची राष्ट्रीय महामार्गावर चालते मनमानी

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी दिवसभर ट्रॉफिक पोलिस उभे असतात, मात्र रात्री या खासगी वाहनांच्यावर कोणत्याही प्रकारचा वचक नसतो. त्यामुळे हम करे सो कायदा अशा पध्दतीने वाहने उभी असतात. यावर पोलिस कधी कारवाई करणार? असा प्रश्न जनसामान्यांकडून विचारला जात आहे. कराड शहराचे मुख्यद्वार असणाऱ्या कोल्हापूर नाका येथे रात्रीच्या वेळी जीव मुठीत घेवून प्रवास करावा लागत … Read more

रिचार्ज करायला येणार्‍या मुलींना अश्लील मेसेज करणारा मोबाईल शॉप धारक पोलीसांच्या ताब्यात

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी मोबाईल शॉपीत बॅलेन्सचे व्हाऊचर मारण्यासाठी आलेल्या महिला, मुलींचे मोबाईल क्रमांक त्यांना न कळत सेव्ह करून अश्लील मेसेज पाठवले जात असल्याचा प्रकार शहर पोलीस ठाण्याच्या निर्भया पथकाने उघडकीस आणला. ज्या दुकानात व्हाऊचर मारल्यावर अश्लील मेसेज येण्यास सुरूवात होत होती, त्या मोबाईल शॉपी चालकास निर्भया पथकाने मंगळवारी अटक केली. गणेश दसवंत (रा. … Read more

प्रलंबित मागण्यांसाठी एसटी आगार प्रमुखांना गावकऱ्यांचा घेराव

Untitled design

कराड प्रतिनिधी |सकलेन मुलाणी  गेल्या ६ महिन्यापासून काले गावातील एस.टी सेवेच वेळापत्रक पूर्णपणे कोलमडले  होते.  याचा नाहक त्रास महाविद्यालयीन विद्यार्थी, विद्यार्थिनींना प्रवाशांना व ग्रामस्थांना होत होता. एसटी प्रशासनाच्या नाहक त्रासाला कंटाळून अखेर काले ग्रामस्थ विद्यार्थ्यांनी कराड आगाराचे आगारप्रमुख जे.डी पाटील यांना आपल्या मागण्यांचे लेखी निवेदन दिले. काले मसूर ही शटल सेवा पुन्हा सुरु करण्याचे लेखी … Read more

धक्कादायक! कराडकर मठातील मठाधिपतीने वृद्ध विश्वस्तांच्या डोक्यात घातला वीणा

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कराड शहरातील मठाधिपतींनी नव्वद वर्षीय वृद्ध विश्वस्तांच्या डोक्यात किर्तनातील वीणा घातल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. कराडच्या प्राचिन कराडकर मठातचे वादग्रस्त तरुण मठाधिपती बाजीराव जगताप यांनी मठाचे नव्वद वर्षीय वृध्द विश्वस्त यशवंत माने गुरुजी यांचे डोक्यात किर्तनातील वीण्याचा जीवघेणी घाव घातल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे. हाती आलेल्या माहितीनुसार, तरुण मठाधिपती … Read more

धक्कादायक! विवाहीत मुलीसह आई वडीलांची आत्महत्या

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी विवाहीत मुलीसह आई वडीलांनी आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार कराड येथे घडला आहे. यामुळे कराड आणि परिसरात एकच खळबळ उडाली असून आत्महत्ये मागचं कारण अजून कळू शकलेलं नाही. हाती आलेल्या माहितीनुसार, कराड शहरातील विद्यानगर परिसरात गुरूदत्त काॅलनीमध्ये गुरुवारी दुपारी विवाहीत मुलीसह आई वडीलांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. यामध्ये विवाहीतेने विषारी … Read more

उसतोड करता सापडले बिबट्याचे बछडे

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कराड तालुक्यातील धोंडेवाडी येथे उसतोड सुरु असताना शेतात बिबट्याचे बछडे सापडले. उसतोड करताना बिबट्याचे बछडे सापडल्याने ग्रामस्थांकडून आश्चर्य व्यक्त केले जात आहे. ग्रामीण भागात सध्या उसतोड सुरु आहे. धोंडेवाडी येथे उसतोड कामगार उसतोड करत असताना त्यांना शेतात बिबट्याचे दोन बछडे सापडले. त्यातील एक बछडे जिवंत होते तर एक मृत अवस्थेत … Read more