महामार्गावरील गॅस पाईपच्या कामावरील कामगारांना चाकू व कोयत्याच्या धाकाने चोरट्यांनी लुटले

कराड | मालखेड (ता. कराड) गावच्या हद्दीत पोकलॅन मशिनवरील परप्रांतीय चालकासह त्याच्या कामगाराला चाकू व कोयत्याचा धाक दाखवून लुबाडल्याची घटना पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास घडली. चोरट्यांनी त्या दोघांकडील सुमारे 25 हजाराचा ऐवज लंपास केला असून याबाबतची फिर्याद पारसनाथ आवधेश कुमार यादव यांनी कराड ग्रामीण पोलिसात दिली असून याप्रकरणी अज्ञात चोरट्यांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. … Read more

Karad खूनाचा उलगडा : दाजीला अडकविण्यासाठी मेव्हुण्याकडून महिलेचा खून

कराड | सोमवारी 3 जानेवारी 2022 रोजीचे कार्वे (ता.कराड जि. सातारा) गांवचे हद्दीत भैरवनाथ मंदिरा शेजारुन कृष्णा नदीचे पात्राकडे जाणारे रोडवरील अज्ञात महिलेचा खून सातारा गुन्हे शाखा आणि कराड तालुका पोलिसांनी उघडकीस आणलेला आहे. बहिणीस त्रास देणाऱ्या दाजीला अडकविण्यासाठी मेव्हुण्याने सदरील महिलेचा खून केल्याचे तपासात पोलिसांना सांगितले आहे. मयत वनिता आत्माराम साळुंखे (वय – 30 … Read more

25 वर्षीय युवतीच्या खून प्रकरणाला वेगळ वळण? ; मृतदेहाजवळ चिठ्ठ्या अन् दोन दारुच्या बाटल्या..

कराड | डोक्यात दगड घालून 25 वर्षीय युवतीचा निर्घृण खून करण्यात आला. कोरेगाव (ता. कराड) येथे सोमवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. उसाच्या फडात युवतीचा मृतदेह आढळला असून संबंधित युवतीच्या ओळखीबाबतची ठोस माहिती रात्री उशिरापर्यंत पोलिसांच्या हाती लागली नव्हती. एका संशयीताला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मात्र, त्याच्याकडूनही खात्रीशीर माहिती पोलिसांना मिळालेली नाही. परंतु मृतदेहाजवळ एक … Read more

कराड पोलिसांची कारवाई : तीन लाख 59 हजारांचा गुटखा जप्त

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कराड पोलिसांनी तब्बल 3 लाख 59 हजार रुपयांच्या गुटख्यासहित ईस्टीम गाडी जप्त करण्यात यश मिळवले आहे. दि.21/12/2021 रोजी रात्रगस्त पेट्रोलिंग दरम्यान कराड शहरात सक्त नाकाबंदी व पेट्रोलिंग सुरू होती. पोपटभाई पेट्रोलपंप याठिकाणी वाहतुक नियंत्रण शाखेचे सहा .पोलीस उपनिरीक्षक श्री. राजू पाटील , महिला पोलीस कॉन्स्टेबल पुजा पाटील, बीट मार्शल 01 … Read more

गोवारेत युवकाची गळफास घेऊन आत्महत्या

Karad Police City

कराड | तालुक्यातील कराड शहर पोलिस हद्दीत असलेल्या गोवारे गावच्या हद्दीत एका युवकाने गळफास घेवून आत्महत्या केली आहे. गोवारे येथील जानुगडे वस्तीचे खाली नदीकडेला करंजाचे झाडाला दोरीच्या सहाय्याने एका युवकाने गळफास घेतला. सदरील घटना शुक्रवारी 17 रोजी दुपारी घडली. याबाबतची खबर सुरेश रंगराव पवार (वय 47) रा. गोवारे ता. कराड यांनी कराड शहर पोलिस ठाण्यात … Read more

मलकापूर फाट्यावर एका तरूणाला भोकसले : पाचही हल्लेखोर फरार

कराड | मलकापूर फाटा (ता. कराड) येथे बुधवारी सकाळी पावणे अकराच्या सुमारास पाच जणांनी एकास धारदार शस्त्राने भोकसल्याची घटना घडली आहे. घटनेनंतर मारेकरी घटनास्थळावरून फरार झाले असून जखमीला उपचारार्थ कृष्णा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. विश्वास हणमंत येडगे (रा. अहिल्यानगर, मलकापूर) असे जखमी झालेल्याचे नाव आहे. याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, लहान मुलांच्या कारणावरून मंगळवारी … Read more

कराडला सिग्नल तोडणारा चोरटा चोरीच्या दुचाकीसह ताब्यात

Crime

कराड | येथील कर्मवीर चौकात सिग्नल तोडून पळ काढण्याच्या नादात असलेल्या दुचाकी चोरट्यास पोलिसांनी नागरिकांच्या मदतीने पकडले. ही घटना रविवारी घडली. जावेद दस्तगिर मदबरी (वय- 27, रा. आटके ता. कराड) असे अटक केलेल्या चोरट्याने नाव आहे. पोलिसांनी त्याच्याकडून दोन चोरीच्या दुचाकी हस्तगत केल्या आहेत. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, चोरीची दुचाकी घेऊन जावेद मदबरी … Read more

परदेशी नागरिकांकडे 75 एटीएम कार्ड : कराड, कोल्हापूरमधील अनेकांची ATM मधील रक्कम लंपास

Karad Police City

कराड | बनावट एटीएम कार्डव्दारे नागरीकांच्या परस्पर त्यांच्या खात्यातून रक्कम लंपास काढणार्‍या दोन्ही परदेशी भामट्यांनी कोल्हापूरलाही एटीएम मधून रक्कम लंपास केल्याची कबुली त्यांनी कराड पोलिसांना दिली आहे. त्यामुळे कोल्हापूरातील प्रकार नक्की काय, याच्या तपासासाठी येथील पोलिस पथक कोल्हापूर जिल्ह्यात अधिक तपासाला रवाना झाले आहे. त्यांच्यासबोत दोन्ही संशयीतही आहेत. संशयीतांना कोल्हापूर भागातूनही पैसे काढल्याने त्या भागातील … Read more

ओगलेवाडी येथे हद्दपारीचे उल्लघंन करणाऱ्यास अटक

कराड | पोलीस अधीक्षक सातारा यांच्याकडून कराड शहर पोलीस ठाणे अंतर्गत ओगलेवाडीदुरक्षेत्र हद्दीतील रेकॉर्डवरील 11 गुन्हेगारांना 6 नोव्हेंबर रोजी 6 महिन्याकरिता हद्दपार करण्यात आले होते. तरीही हद्दपारीचे उल्लघंन करणाऱ्या सागर सुभाष सुर्यवंशी (वय- 25, रा. हजारमाची, ता. कराड ) यास ओगलेवाडी पोलिसांनी अटक केली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, जिल्ह्यातून हद्दपार असणाऱ्या सागर सूर्यवंशी … Read more