चारा आणायला गेलेल्या 14 वर्षाचा मुलाचा शाॅक लागून मृत्यू

कराड | वीजवाहक तारेचा धक्का लागल्याने बकऱ्यांसाठी चारा आणण्यास गेलेल्या 14 वर्षांच्या मुलाचा जागीच मृत्यू झाला. मुंढे (ता. कराड) येथे दुपारी तीनच्या सुमारास ही घटना घडली. फरहान अमीर सय्यद (रा. गोटे, ता. कराड) असे मृताचे नाव आहे. पाय व हाताला झालेल्या जखमेवरून त्याला शॉक लागल्याचे वीज कंपनीचे सहायक अभियंता अमोल साठे यांनी सांगितले. या घटनेची … Read more

कृष्णापूल ते बनवडी फाटा मार्गावर स्ट्रीटलाईट, CCTV बसवावेत : नवाज सुतार

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कृष्णापूल ते बनवडी फाटा मार्गावर स्ट्रीटलाईट आणि CCTV बसवावेत अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश सदस्य नवाज सुतार यांनी केली आहे. याबाबतचे पत्र पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांना देण्यात आले आहे. पत्रात म्हटले आहे की, कराड- विद्यानगर हे शिक्षणाचे माहेरघर आहे. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब आणि स्वर्गीय पी.डी.पाटील साहेब यांच्या … Read more

मुंबईहून कोल्हापूरला 22 प्रवासी घेवून निघालेली ट्रव्हल्स पलटी

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी पुणे- बंगलोर महामार्गावर कराडजवळील गोटे गावच्या हद्दीत सोमवारी पहाटे 6 वाजण्याच्या सुमारास 22 प्रवासी असलेली ट्रव्हल्स पलटी झाली आहे. चालकाचा ताबा सुटल्याने गाडी डिवायडरला धडकल्याने ट्रव्हल्स 15 ते 20 फूट फरफटत गेली होती. ट्रव्हल्स पलटी झाल्याचा मोठा आवाज आल्याने पहाटे लोकांची मोठी पळापळ उडाली. घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, मुंबईहून- कोल्हापूरला … Read more

सहकार मंत्र्याच्या “सह्याद्रिस” प्रथम क्रमांकाचा पुरस्कार प्रदान

कराड प्रतिनिधी सकलेन मुलाणी सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु असलेल्या यशवंतनगर (ता. कराड) येथील सह्याद्रि सहकारी साखर कारखान्यास 2019-20 या सालाचा उत्कृष्ठ आर्थिक व्यवस्थापनाचा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. आज दि. 5 जून 2022 रोजी, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट मांजरी बु. येथे राज्यस्तरीय साखर परिषदेत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. वसंतदादा शुगर इन्स्टिट्युटने जाहीर … Read more

नांदलापूर येथे क्राॅंसिंग रस्त्यावर तीन वाहनांचा विचित्र अपघात

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी पुणे- बंगलोर महामार्गावर नांदलापूर फाटा येथे तीन वाहनांचा अपघात झाला आहे. शनिवारी सकाळी 11.30 वाजण्याच्या सुमारास झालेल्या अपघातात वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. या अपघातामुळे महामार्गावर जवळपास 1 किलोमीटर अतंरापर्यंत वाहनांच्या रांगा लागलेल्या होत्या. घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, जखिणवाडी या गावाकडून आलेला एक ट्रक महामार्गावरील क्राॅसिंगवरून वळत होता. तेव्हा पुणेकडून … Read more

सुपनेत मॅटवरील कुस्त्यांचा दोन दिवस थरार

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी सुपने (ता. कराड) येथे दोन दिवस मॅटवरील कुस्तीचा थरार अनुभवता येणार आहे. सातारा व सांगली जिल्हा मर्यादित मॅटवरील कुस्तीचे दि. 4 व 5 जून छत्रपती चषक भव्य कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. 14, 15 व 18 वर्षाखालील मुलांच्या कुस्ती स्पर्धा वजनी गटात होणार आहेत. या स्पर्धेवेळी नविन मॅटचे पूजन … Read more

सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या समाधीस श्री. छ. वृषालीराजे भोसले यांच्याकडून अभिवादन

सातारा | सरसेनापती हंबीरराव मोहिते यांचे शौर्य अतुलनीय होते. त्यांना कर्तबगार घराण्याचा वारसा लाभला होता. सरसेनापती म्हणून त्यांनी स्वराज्याची पताका चहुबाजूंना फडकावत ठेवली. त्यांच्या कार्याची माहिती नवीन पिढीपर्यंत पोहचवण्यासाठी प्रयत्नशील आहे. त्यांच्याबद्दल प्रत्येक मराठी माणसांमध्ये आदराची भावना आहे. त्यांच्या समाधीस भेट देऊन प्रत्येकाने प्रेरणा घ्यावी, असे आवाहन शाहुनगरी फाऊंडेशनच्या संस्थापिका श्री. छ. वृषालीराजे भोसले यांनी … Read more

कराड तालुक्याला वादळी वाऱ्यासह पावसाने झोडपले

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कराड शहरासह तालुक्यातील अनेक भागात मंगळवारी दि. 31मे रोजी रात्री 11 वाजता वीजेच्या कडकडाटासह मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसामुळे राष्ट्रीय महामार्गावर वाहन चालकांची तारांबळ उडाली. अनेक ठिकाणी विद्युत पुरवठा खंडित झाला होता. गेल्या काही दिवसांपासून उकाड्याने हैराण असल्याने पावसाने वातावरणात गारवा निर्माण झाला. परंतु वीजेच्या कडकडाटामुळे लोकांच्यात … Read more

नांदगाव मार्गे साळशिरंबे- जिंती एस टी पूर्ववत सुरू करण्याची ग्रामस्थांची मागणी

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कोरोना महामारी संकट, त्यातच अतिवृष्टीमुळे नांदगाव पुलाची झालेली दुरवस्था आणि एसटी कर्मचाऱ्यांचा संप यामुळे एसटी सेवा विस्कळीत झाली.परिणामी कराड आगारातून नांदगाव मार्गे साळशिरंबे जिंतीला जाणारी एसटी वाहतूक बंद पडली आहे. पण आता एसटी रुळावर येत असून नांदगाव मार्गे जिंती ला जाणारी गाडी पूर्ववत सुरु करावी अशी मागणी नांदगाव चे ग्रामपंचायत … Read more

आयुर्वेदिक औषधात भेसळ : कराडच्या गंगा मेडिकलच्या मालकासह दोघांवर गुन्हा

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी आयुर्वेदिक औषध विक्री दुकानात अ‍ॅलोपॅथिक औषधाची भेसळ करून ती विक्री केल्याप्रकरणी कराड येथील गंगा मेडिकल शॉपीचे चालक अरविंद चव्हाण व बिर्ला फार्मास्युटिकल्स प्रा. लि., राजस्थान या कंपनीचे मालक नवीन कुमार बिर्ला या दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे. सातारा अन्न व औषध विभागाचे औषध निरीक्षक अरुण सखाराम गोडसे (सध्या रा. सातारा) … Read more