कुस्तीपटू खाशाबा जाधव : भारताला पाहिलं ऑलम्पिक पदक जिंकून देणारा खेळाडू

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । खाशाबा दादासाहेब जाधव. भारताचे पहिले ऑलिम्पिक पदक विजेते कुस्तीपटू. कोणत्याही साधनांच्या उपलब्धीविना कर्ज काढून खाशाबा ऑलिम्पिकला गेले आणि दगाफटका होऊनही कुस्तीतील पहिलं कांस्यपदक घेऊनच माघारी आले. इयत्ता नववीच्या पुस्तकात असणाऱ्या एका धड्याशिवाय त्यांची दखल आजतागायत कुणीही घेतली नाही. खाशाबा जाधव यांचा जन्म १५ जानेवारी १९२६ रोजी साताऱ्याच्या कराड तालुक्यातील गोळेश्वर येथे … Read more

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवनिमित्त काँग्रेसकडून जिल्ह्यात 75 कि. मी. पदयात्रेचे आयोजन

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्त सातारा जिल्ह्यात काँग्रेस कडून 75 कि. मी. पदयात्रेचे आयोजन केले जाणार आहे. पदयात्रा नियोजनाची बैठक आज कराड दक्षिण काँग्रेस कमिटीच्या वतीने माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात आली. यावेळी प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस उदयसिंह पाटील, प्रा. धनाजी काटकर, कराड दक्षिण महिला काँग्रेस अध्यक्षा … Read more

आरेवाडी आरोग्य उपकेंद्र ‘असून अडचण आणि नसून खोळंबा’

कराड | सुपने आरोग्य केंद्रातर्गत आरेवाडी (ता. कराड) येथे उपकेंद्र मंजूर आहे. येथे सुसज्ज इमारत असलेले आरोग्य उपकेंद्रे अनेक दिवसा पासून रस्ता नसल्याने बंद स्थितीतआहे. या उपकेंद्राची ‘असून अडचण आणि नसून खोळंबा’ अशी अवस्था झाली आहे. सुपने- तांबवे जिल्हा परिषद गटात आरेवाडी येथे असलेल्या आरोग्य उपकेंद्रास साजुर, आरेवाडी, गमेवाडी, पाठरवाडी, उत्तर तांबवे ही गावे जोडली … Read more

कराड जनता बँकेच्या कर्ज व्यवहारांची ED कडून चौकशी

ED Karad Janata Sahakari Bank

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी नेहमीच चर्चेत असलेल्या कराड येथील कराड जनता सहकारी बँकेच्या कारभाराची ईडीच्या अधिकाऱ्यांच्यावतीने सखोल चौकशी सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सहकार क्षेत्रात खळबळ उडाली आहे. दोन वर्षापूर्वी रिझर्व्ह बॅंकेने जनता बँकेचा परवाना रद्द केला होता. केवळ चार कर्जदारांच्या मोठ्या कर्जाने बँकेवर दिवाळखोरी लादल्याची आजही भावना आहेत. त्या अनुषंगाने ईडीच्या अधिकाऱ्यांकडूनही … Read more

काले गावातील महात्मा गांधी विद्यालयाच्या अमृत महोत्सवी वर्षाला उत्साहात प्रारंभ

Mahatma Gandhi Vidyalaya Amrit Mahotsav

कराड प्रतिनिधी | अक्षय पाटील रयत शिक्षण संस्थेची स्थापना झालेल्या कराड तालुक्यातील काले या गावातील महात्मा गांधी विद्यालयाला 1 ऑगस्ट रोजी 74 वर्ष पूर्ण झाली असून 75 व्या अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण केले आहे. याच पार्श्वभूमीवर अमृत महोत्सव वर्षाचा प्रारंभ उत्साहात पार पडला. स्व.शांताराम काकडे (सर) व स्व.इस्माईल मुल्ला (साहेब) यांनी 1 ऑगस्ट 1948 साली … Read more

कराडात शिवसेना पदाधिकाऱ्यांचे राऊतांवरील कारवाईच्या निषेधार्थ धरणे आंदोलन

Shiv Sena Karad protested

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यावर काल ईडीच्या अधिकाऱ्यांनी कारवाई केली. त्यांना अटक केल्यानंतर राज्यभर शिवसेना पदाधिकाऱ्यांच्यावतीने धरणे आंदोलने करत तीव्र निषेध व्यक्त केला जात आहे. याचे पडसात कराड येथेही उमटले असून शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या वतीने येथील तहसील कार्यालयाबाहेर घोषणाबाजी करत धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी शिवसेनेचे कराड तालुका अध्यक्ष नितीन काशीद … Read more

शेतकऱ्यांची 1 हजार 530 कोटीची थकीत एफआरपी द्या, अन्यथा आक्रमक आंदोलन : राजू शेट्टी

Raju Shetty

कराड प्रतिनिधी सकलेन मुलाणी राज्यात आज 23 जिल्ह्यात जवळपास साडेआठ लाख हेक्टर क्षेत्रावरील पिके अतिवृष्टी व महापूरामुळे नष्ट झालेली आहेत. तरी अद्यापही सरकारने मदत जाहीर केलेली नाही. अनेक जमिनी वाहून गेलेल्या असून विहीरी कोसळल्या आहेत.  महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे आजही 1 हजार 530 कोटीची एफआरपी थकीत आहे, याबाबत शासनाने ठोस कार्यवाही न केल्यास आक्रमक आंदोलन करण्याचा निर्णय … Read more

कराडात लोकशाही आघाडीच्या हस्ते विद्यार्थ्यांना गणवेश वाटप

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कराडमधील रेव्हीन्यू कॉलनीतील विक्रमसिंह देशमुख आणि देशमुख परिवाराच्या वतीने ग्रामीणमधील बारा डबरे येथील अंगणवाडी क्र. 118 तील 20 मुलं आणि 18 मुली अशा एकूण 38 विद्यार्थ्यांना शालेय गणवेशाचे वाटप करण्यात आले. कराड नगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते सौरभ पाटील आणि लोकशाही आघाडीच्या मान्यवरांच्या हस्ते गणवेश वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाला कराड … Read more

पुढील आठवड्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कराड दाैऱ्यावर येणार : राजेंद्रसिंह यादव

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा यशवंत विकास आघाडीचे नेते राजेंद्रसिह यादव यांनी सत्कार केला. तसेच कराडला भेट देण्याची विनंती केली, तात्काळ मुख्यमंत्र्यांनी भेटीचे निमंत्रण स्विकारले. यावेळी एकनाथ शिंदे यांनी आपण पुढील आठवड्यात सातारा जिल्हा दौर्‍यावर येत असुन यावेळी कराडला येणार असे अश्वासन दिले असल्याचे राजेंद्रसिंह यादव यांनी सांगितले.. कराड शहराच्या विविध … Read more

चंदन चोरटे सापडले : कराड, वाळवा तालुक्यातील 4 जणांवर कारवाई

कराड | चंदन चोरी करणाऱ्या चोरट्यांवर कराड वन विभागाने चार जणांवर कारवाई केली. एक दुचाकीसह पोत्यात भरलेले चंदनाचे तुकडे, तोडणीसाठी वापरलेले साहित्य जप्त करून संबंधितावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अर्जुन बाळासाहेब मदने (किल्ले मच्छिंद्रगड, ता. वाळवा), विकास दाजीराम मदने, मोहन हिंदुराव माने व बाबासाहेब गोपाळ माने (सर्व रा. विंग, ता. कराड) अशी संशयितांची नावे … Read more