कराडच्या एकाची साडेनऊ लाखाची फसवणूक : ऊस टोळीच्या मुकादमावर गुन्हा

Karad Police City

कराड | ऊस तोडणीसाठी मजूर पुरवितो, असे सांगून मुकादमाने ट्रॅक्टर मालकाला साडेनऊ लाख रुपयांचा गंडा घातला. नुकताच हा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी फसवणूक करणार्‍या मुकादमावर कराड शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सुभाष रामराव भोजने (रा. आंबेवडगाव, ता. धारुर, जि. बीड) असे गुन्हा दाखल झालेल्या मुकादमाचे नाव आहे. याबाबत केसे (ता. कराड) … Read more

कराड- पाटण मार्गावर लोक मरत असताना बांधकामचे अधिकारी झोपेत

कराड | कराड- पाटण मार्गावर असलेल्या तांबवे फाटा (साकुर्डी पेठ) येथे मोठी बाजारपेठ उभी राहिली असून तिचे स्वरूप वाढत चालले आहे. या मार्गावरील रस्त्याचेही काम बऱ्यापैकी उरकले आहे. वाहतूकीच्या दृष्टीने कामे उरकली आहेत, मात्र सुरक्षिततेच्या बाबत बांधकाम विभागाचे अधिकारी झोपेत असल्याचे पहायला मिळत आहे. या बाजारपेठ परिसरात दररोज अपघात होत असून काहींना जीवही गमवावा लागला … Read more

कराडात लोकवर्गणीतून पहिली स्वतंत्र ट्रेकिंग इन्स्टिट्यूट उभारणार: खा. श्रीनिवास पाटील

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी  आजच्या स्पर्धात्मक व धावपळीच्या युगात युवा पिढीमध्ये चंगळवादी संस्कृती वाढत आहे. त्यामुळे कराडसह तालुक्यात एक चांगली युवा पिढी तयार व्हावी, यासाठी लोकवर्गणीतून पहिली स्वतंत्र ट्रेकिंग इन्स्टिट्यूट उभारण्याचा संकल्प खासदार श्रीनिवास पाटील यांनी जाहीर केला आहे. मागील 30 वर्षापासून दुर्ग संवर्धनासह सामाजिक कार्यात अग्रेसर असणार्‍या कराडमधील प्रीतिसंगम सायकल ग्रुपचे संस्थापक दिपक … Read more

मोदी सरकार विरोधात आरपारच्या लढाईत युवक काॅंग्रेस सक्षम : शिवराज मोरे

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी केंद्रात मोदी सरकार आल्यापासून गोरगरिंबाचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे. काॅंग्रेसचे नेत्या सोनिया गांधी व राहुल गांधी यांना 2015 सालापासून चाैकशी सुरू आहे. ईडी, सीबीआयला योग्य सहकार्य केले जात असतानाही 12- 12 तास बसवून चाैकशी केली जात आहे. यामध्ये केंद्र सरकार हस्तक्षेप करीत गांधी घराण्याचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करीत … Read more

कराड नगरपालिकेची प्रभाग निहाय आरक्षण सोडत जाहीर

Karad Nagerpalika

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी निवडणुक आयोगाच्या सूचनेनुसार कराड पालिकेचा प्रभागनिहायक आरक्षण सोडतीचा कार्यक्रम आज पार पडला. येथील टाऊनहॉलमध्ये मुख्याधिकारी रमाकांत डाके यांच्या उपस्थितीत आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली. कराड येथील टाऊन हॉलमध्ये आज पार पडलेल्या आरक्षण सोडतीच्या कार्यक्रमास पालिकेतील वरिष्ठ अधिकारी, नगरसेवक, नागरिकांनी उपस्थिती लावली होती. यावेळी मुख्याधिकारी रमाकांत डाके यांनी आरक्षण सोडत जाहीर … Read more

देवेंद्र भुयारची लायकी माहिती असल्याने स्वाभिमानीतून हकालपट्टी केली : राजू शेट्टी

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी देवेंद्र भुयार काय लायकीचा आहे, हे आम्हांला अगोदरच माहीत होतं. मात्र महाविकास आघाडीला ते आता माहीत झालं. त्यामुळे त्यांची हकालपट्टी केलेली होती. देवेंद्र भुयारने मत दिलं किंवा नाही दिलं याच्याशी आम्हाला घेणे- देणे नाही. तेव्हा स्वाभिमानीचा उल्लेख संजय राऊत यांनी केला झाला यांच्यावर मला आक्षेप असल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते … Read more

भाजप खासदार चक्क राजू शेट्टींच्या रस्त्यावरच पाया पडले

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी भाजपचे नवनिर्वाचित राज्यसभा खासदार धनंजय महाडिक यांनी चक्क रस्त्यावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्या पायावर थेट नमस्कार घालत आशीर्वाद घेतले. कराड येथे पुणे- बेंगलोर महामार्गांवर हा प्रकार पहायला मिळाला. कराड येथील पंकज हॉटेल येथे कोल्हापूरकडे निघालेले नवनिर्वाचित खासदार धनंजय महाडिक यांचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर कार्यकर्त्यांना भेटून बाहेर … Read more

कराडात नुपूर शर्मावर गुन्हा दाखल करण्याची मागणी ; मूस्लिम समाज आक्रमक

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी भाजपाच्या प्रवक्त्या नूपूर शर्मा यांनी काही दिवसांपूर्वी मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याने त्यांच्या वक्तव्यावर देशभरात विविध संघटनांनी संताप व्यक्त केला जात आहे. कराड येथील मूस्लिम समाज आक्रमक झाला असून आज उलमा आईमा हुफ्फाज कमेटी, जमात रजा- ए- मुस्तफा कमिटी व समाजाच्या वतीने तहसिलदार विजय पवार व वरिष्ठ पो. निरक्षक … Read more

बळीराजा संघटनेचे लेटरपॅड, बिल्ला वापरून काहींनी दुकानदारी सुरू केली होती : बी. जी. पाटील

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी संघटना आणि प्रामाणिकपणा एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. चूक ते चूक व बरोबर ते बरोबर हे चळवळीचे शास्त्र आहे. टेंडर, बिल निघण्यासाठी बळीराजा शेतकरी संघटनेचा वापर केला जात होता. लेटरपॅड, बिल्ला वापरून काहींनी दुकानदारी सुरू केली होती, असा आरोप बळीराजा शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष बी. जी. पाटील यांनी विरोधातील लोकांवर लावला … Read more

जगातील व्यवस्थापनात छ. शिवाजी महाराजांचे धडे अभ्यासले जातात : प्रा. नितीन बानुगडे

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी परकीयांनी छ. शिवाजी महाराजांचा व्यवस्थापनाचा अभ्यास करून जगावर अधिराज्य केले. जगातील मोठ- मोठ्या विद्यापीठात, व्यवस्थापनात छ. शिवाजी महाराजांचा अभ्यासक्रम अभ्यासला जातो. परंतु आमच्या देशात महाराजांच्या इतिहास अभ्यासाकडे दुर्लक्ष केले जात आह. मात्र जगातील अनेक दिग्गज हे छ. शिवाजी महाराजांचे धड्याचा अभ्यास करत असल्याचे, प्रख्यात व्याख्याते प्रा. नितीन बानुगडे- पाटील यांनी … Read more