हसन मुश्रीफांनी दुसऱ्या कोणत्याही मतदारसंघातून निवडून येऊन दाखवावं : चंद्रकांत पाटलांचं प्रति आव्हान

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : कोल्हापुरातून पळून गेलेल्या व्यक्तीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासारख्या प्रामाणिक आणि सोज्वळ व्यक्तीवर बोलणं योग्य नाही. चंद्रकांत पाटलांना एवढी मस्ती कुठून आली?, अशी टीका ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर केली होती. त्याचा समाचार भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी रविवारी उशिरा घेतला. त्यांनी हसन मुश्रीफ याना प्रति आव्हान दिले. ते म्हणाले, … Read more

हसन मुश्रिफांचा तोल घसरला म्हणाले., ‘चंद्रकांत पाटलांना एवढी मस्ती कुठून आली?’

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका करताना राज्याचे कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांचा तोल घसरला आहे. चंद्रकांतदादांवर सडकून टीका करताना चंद्रकांत पाटलांना एवढी मस्ती कुठून आली?, असं धक्कादायक विधान हसन मुश्रीफ यांनी केलं आहे. टीका करण्याच्या नादात मुश्रीफ यांची जीभ घसरल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात असून त्यावर तर्कवितर्क व्यक्त केले जात … Read more

आबिटकर म्हणतायत ‘आमचं ठरलं’, गोकुळला विरोधी आघाडीसोबतच

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : गोकुळ दूध संघ सध्या काँग्रेसचे आमदार पी. एन. पाटील व भाजपचे माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्याकडे आहे. ही सत्ता उलथून टाकण्याचा निर्धार करत पालकमंत्री सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली विरोधकांनी राजर्षी शाहू शेतकरी आघाडीची स्थापना केली आहे. या आघाडीमध्ये काँग्रेस, शिवसेना, जनसुराज्य पक्ष तसेच ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील … Read more

प्रेमासाठी सर्वकाही…कोल्हापुरातल्या युवकाचा भन्नाट पराक्रम; अडीच किमी रस्त्यावर लिहिले I Love You

कोल्हापूर | प्रेम करावं भिल्लासारखं बाणावरती खोचलेलं, मातीमध्ये उगवून सुद्धा मेघापर्यंत पोहोचलेलं… मराठी कवींनी प्रेमाचे हे असे वर्णन करून ठेवले आहे. त्यामुळे हे प्रेमवीर प्रेमात प्रेरित होऊन काय काय करतील काही सांगता येत नाही. कोल्हापुरात अशीच एक भन्नाट घटना घडली आहे. जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील धरणगुत्ती परिसरातील एका युवकाने जयसिंगपूर-धरणगुत्ती अशा रस्त्यावर साधारण दोन ते अडीच … Read more

वनविभागाच्या फिरत्या पथकाने हस्ती दंत विकणारी टोळी पकडली; इनोव्हा गाडी, तीन मोबाईल, तीन हस्ती दंत जप्त

कोल्हापूर । कोल्हापूर-पन्हाळा रस्त्यावर हॉटेल ग्रीन फील्डजवळ हस्ती दंत घेऊन विक्रीसाठी येणार असल्याचे माहिती मिळाली. त्या माहितीच्या आधारे कोल्हापूर व सातारा वनपरिक्षेत्र यांचे फिरते पथकाने कारवाई केली. यावेळी तीन आरोपींच्या कडून एक इनोव्हा गाडी क्रमांक (MH09 AQ 6661), तीन मोबाईल, हस्ती दंत 3 नग (वजन 965 ग्राम ) असे सर्व जप्त करण्यात आले. या कारवाईत … Read more

चंद्रकांत पाटलांनी केवळ माझा काटा काढण्यासाठी बँकेची चौकशी लावली; हसन मुश्रिफांचा आरोप

कोल्हापूर । राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार, हसन मुश्रीफ यांच्यासह 65 संचालकांना सहकार विभागाच्या अहवालामध्ये क्लिन चिट देण्यात आली आहे. यानंतर आता मंत्री हसन मुश्रीफ यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. चंद्रकांत पाटलांनी केवळ माझा काटा काढण्यासाठी माझं नाव घालून बँकेची चौकशी लावली होती, असा आरोप हसन … Read more

अवैध उत्खननातून कोल्हापूर जिल्ह्यातील 100 एकर जमिन नष्ट; संरक्षित वन जमिनीवरच करोडोंचे गैरव्यवहार – असिम सरोदे

कोल्हापूर | हातकणंगले तालुक्यातील टोप जवळील कासारवाडी ग्रामपंचायत अंतर्गत गावरान जमिनीत उत्खननाचे काम गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. याद्वारे १०० एकर जमिन नष्ट करण्यात आलीय. अवैध उत्खननातून करोडोंचे गैरव्यवहार झाल्याचे मत जेष्ठ विधिज्ञ व पर्यावरण कायदेतज्ञ ऍड. असीम सरोदे यांनी व्यक्य केलेय. २०१४ साली करार संपला असला तरी अवैधरित्या हे काम सुरू आहे. यात मोठ्या … Read more

इंजिनीरिंगची नोकरी सोडून आधुनिक पद्धतीने शेती केली; आज महिन्याला कमावतोय लाखो रुपये

 हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शेतीमध्ये तरुण पिढी लक्ष देताना दिसत नाही. त्यांचा नोकरीमधेच जास्त विश्वास असल्याचे दिसून येते. पारंपारिक पद्धतीने करत असलेल्या शेतीमध्ये उत्पन्न तुलनेने कमी होते. यामुळे शेतीवरचा विश्वास हळूहळू कमी होताना दिसून येत आहे नवीन पिढी याला पूर्वीइतकी महत्त्व देताना दिसून येत नाही. परंतु आजही काही तरुण असे आहेत जे अभ्यासपूर्ण शेतीला प्राथमिकता देऊन … Read more

राज्यभर गाजलेल्या ९ कोटींच्या लुटीतील मुख्य सूत्रधाराचा अज्ञातांकडून थरारक पाठलाग करत निर्घृण खून

कोल्हापूर प्रतिनिधी । कोल्हापूर जिल्ह्यातील वारणानगर येथील ९ कोटींच्या लुटीतील मुख्य सूत्रधार मैनुद्दीन उर्फ राजू अबूबकर मुल्ला याचा अज्ञात हल्लेखोरांनी पाठलाग करून धारदार शास्त्राने डोक्यात निर्घृण वार करत खून केला. सदर खुनाची घटना शुक्रवारी रात्री पाऊणे नऊ वाजण्याच्या सुमारास सांगलीतील गणेशनगर येथील गल्ली नंबर पाच येथील एका बिल्डिंग मध्ये घडली. घटनेची माहिती मिळताच मोठ्या प्रमाणात … Read more

कोल्हापुरात शिवसेनेनंही केली कमाल,जिल्ह्यातील मिणचे ग्रामपंचयातीवर शिवसेनेचा झेंडा

कोल्हापूर | कोल्हापूर जिल्ह्यातील मोठ्या नेत्यांमुळे लक्ष लागून राहिलेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालाचे चित्र क्षणाक्षणाला बदलत आहे. आता हातकणंगले तालुक्यात जनसुराज्य पाठोपाठ शिवसेनेने कमाल करुन दाखविली आहे. येथील मिणचे ग्रामपंचायतीवर शिवसेनेचा भगवा फडकला आहे. याठिकाणी शिवसेनाप्रणित प्रवीण यादव युवा शक्ती आघाडीने 13 पैकी 10 जागांवर बाजी मारली. या विजयानंतर मिणचे गावात शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी गुलाल … Read more