हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | महाविकास आघाडी सरकार व भाजप यांच्यात एमएम पक्षावरून सध्या एकमेकांवर निशाणा साधला जात आहे. तर एमआयएम हि भाजपची बी टीम असल्याचा आरोपही केला जात असल्याने यावरून आज भाजप नेते तथा केंद्रीयमंत्री रावसाहेब दानवे यांनी महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल केला. “काँग्रेसला आणि राष्ट्रवादीला दलितांची मते लागतात पण डॉ. बाबासाहेब आंबेडकर चालत नाहीत. मुस्लिमांची मते लागतात, पण एमआयएम पक्ष चालत नाही, ही यांची नीती आहे. एमआयएम हि भाजपची बी टीम नाही तर ती झेंडाही होऊ शकत नाही. आमचे तीन शत्रू आहेत. पहिला काँग्रेस,दुसरा एमआयएम आणि तिसरा कम्युनिस्ट,” अशी टीका दानवे यांनी केली.
रावसाहेब दानवे यांनी आज शिवसेनेसह राष्ट्रवादी आणि काँग्रेसवर माध्यमांशी संवाद साधताना टीका केली. यावेळी दानवे म्हणाले की, वास्तविक आम्ही मतांचे व जातीचे राजकारण कधीच करत नाही. उलट काँग्रेस, राष्ट्रवादीकडूनच केले जाते. कारण काँग्रेस आणि राष्ट्रवादीला दलितांची मत जास्त लागतात. पण त्या मतदारांच्या जातीतील नेते, पक्ष चालत नाहीत. काँग्रेस, राष्ट्रवादीला निवडणुकीच्यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर चालत नाहीत. मुस्लिमांची मतं लागतात, पण एमआयएम पक्ष चालत नाही, ही यांची नीती आहे.
वास्तविक खरी गोष्ट लक्षात घेतली तर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना दोन वेळा पराभूत करण्यासाठी काँग्रेसनेच उमेदवार उभा केला होता. तसेच शिवसेनेमध्ये आता दाखवण्यासाठीही हिंदुत्व राहिलं नाही. शिवसेनेचे हिंदुत्व ते फिके पडले आहे. वारंवार ते हिंदुत्वाचा उल्लेख करतायत, पण आता त्यांच्याकडे तसे काही राहिलेले नाही. तुम्ही हिंदुत्वाचे आहात तर जेलमध्ये असलेल्या नवाब मलिकांना पाठींबा देतात. फिक्या पडलेल्या शिवसेनेला रंग देण्याचा शिवसेनेचा प्रकार आहे. पण भाजपवर याचा काहीही परिणाम होणार नाही, असे दानवे यांनी म्हंटले.