खासगी जागेवरील पे-अँड पार्कबाबत धोरण ठरवा-पालकमंत्री सतेज पाटील

कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर शहरातील खासगी जागांवर पे-अँड पार्क करण्यासाठी शहर वाहतूक नियंत्रण शाखेने धोरण ठरवावे, अशी सूचना पालकमंत्री बंटी ऊर्फ सतेज पाटील यांनी आज दिली. शासकीय विश्रामगृहातील राजर्षी छत्रपती शाहू सभागृहात आज शहर वाहतूक नियंत्रणाबाबत बैठक झाली. या बैठकीला महापौर निलोफर आजरेकर, उप महापौर संजय मोहिते, स्थायी समिती सभापती संदीप कवाळे महापालिका आयुक्त … Read more

पानसरे हत्याप्रकरणाच्या तपासात मागील सरकार कमी पडल- गृहराज्यमंत्री सतेज पाटील

कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर गेल्या पाच वर्षात कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणात हायकोर्टाला हस्तक्षेप करावा लागला… हा तपास कसा चाललाय त्यात व्यवस्थितपणा आहे का ? या प्रत्येक गोष्टीवर हायकोर्ट मॉनिटरिंग होतं म्हणजे शासन कमी पडल आहे हे स्पष्ट दिसतंय अस सतेज पाटील यांनी म्हटलं आहे. ते कोल्हापूरात बोलत होते. पानसरे यांच्या मारेकऱ्यांना पकडणं आणि … Read more

कॉ.पानसरेंच्या खून प्रकरणात लक्ष घालण्याचे पालकमंत्री सतेज पाटलांनी कुटुंबियांना दिलं आश्वासन

कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर कॉ. पानसरे यांच्या खुनास ५ वर्षे उलटली तरी तपास समाधानकारक झालेला नाही. गुन्हेगार फरार आहेत. गुन्ह्याचे वाहन व शस्त्रे यांचा शोध लागलेला नाही. या पार्श्वभूमीवर श्रमिक प्रतिष्ठान व आयटक कामगार संघटनेच्या एका शिष्टमंडळाने मा. पालकमंत्री व गृह राज्यमंत्री श्री. सतेज पाटील यांची भेट घेतली. मेघा पानसरे यांनी त्यांना तपासाच्या सद्यस्थिती … Read more

गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांच्या जबाबदारीत आणखी वाढ

कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा कोल्हापूर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष सतेज पाटील यांच्याकडील जबाबदारीत आज आणखी वाढ झाली आहे. कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून काम पाहणाऱ्या सतेज पाटील यांच्याकडे आता सातारा, सिंधुदुर्ग व रत्नागिरी या तीन जिल्ह्यातील संपर्कमंत्री पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीने आज जिल्हानिहाय पालकमंत्री व संपर्कमंत्री यांची … Read more

कोल्हापूर जिल्ह्यात मंत्र्यांच्या उपस्थितीत लोकशाही दिनाला मोठा प्रतिसाद

कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ आणि सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या उपस्थितीत आज झालेल्या लोकशाही दिनाला मोठा प्रतिसाद मिळाला. सुमारे ९ हजार निवेदने दाखल झाली. संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी तातडीने प्रश्न सोडवावेत. होणार नसतील तर तसे त्यांना पत्राव्दारे कळवावे, असे निर्देश पालकमंत्री सतेज पाटील यांनी आज दिले. नागरिकांना ‘हे माझे सरकार आहे,’असं वाटलं पाहिजे. नागरिकांना हेलपाटे मारायला लागू नयेत अशा पध्दतीने अधिकाऱ्यांनी त्यांची कामे करावीत, अशा सूचना  हसन मुश्रीफ यांनी आज दिल्या.

उल्लेखनीय कामगिरीसाठी कोल्हापूर पोलिसांचा गृहराज्यमंत्री सतेज पाटलांच्या हस्ते सत्कार

आपल्या जिवाची बाजी लावून राजस्थानमधील कुख्यात बिष्णोई गँगच्या म्होरक्यांना जेरबंद करण्याची कौतुकास्पद कामगिरी कोल्हापूर पोलीसांनी केली आहे. त्यांच्या या कारवाईमुळे कोल्हापूर पोलीस दलाची मान राज्यभरात उंचावली आहे. या कारवाईत सहभागी असणाऱ्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना आपण स्वतः एक महिन्याचा पगार देणार असल्याची घोषणा गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी केली. बिष्णोई गँगवर केलेल्या कारवाईबद्दल पोलीस मुख्यालयात आयोजित विशेष सत्कार समारंभात ते बोलत होते.

कोल्हापुरात शिवभोजन योजनेला सुरुवात; मंत्री सतेज पाटीलांनी शिवथाळीचा घेतला आस्वाद

राज्य सरकारच्यावतीने दहा रुपयात शिवथाळी हा उपक्रम राज्यात सुरू करण्यात आला आहे. या उपक्रमाची सुरुवात कोल्हापुरात देखील झाली आहे. कोल्हापूर शहरात चार ठिकाणी हा उपक्रम आजपासून सुरू झाला आहे. गोर गरीब आणि गरजू नागरिकांना दहा रुपयात शिव थाळी देण्यात आलेली आहे. कोल्हापूरचे पालकमंत्री राज्याचे गृहराज्यमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील यांच्या हस्ते या उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आलं .

भाजपा सरकारच्या काळातील वरिष्ठ नेत्यांच्या फोन टॅपिंग प्रकरणाची चौकशी सुरू – गृहराज्यमंत्री सतेज पाटील

भाजपा सरकारच्या काळात वरिष्ठ नेत्यांच्या फोन टॅपिंग प्रकरणाची गंभीर दखल राज्य सरकारनं घेतली आहे. गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी या घटनेची चौकशी सुरू केल्याचं सांगितलं आहे. फोन टॅपिंग संदर्भात एक नियमावली आहे. ही नियमावली तोडून काही घडलं आहे का किंवा कुणाच्या परवानगीने हे झालंय का याची चौकशी राज्य सरकारने सुरू केली असल्याचं गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी सांगितलं आहे. कोल्हापुरात पत्रकारांशी बोलताना त्यांनी हे सांगितलं.

राज्यातील कायदा, सुव्यवस्था अबाधित राखण्याकडे प्रामुख्याने लक्ष देणार – गृहराज्यमंत्री सतेज पाटील

कोल्हापूरचे विधान परिषदेचे काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांची गृहराज्यमंत्री पदी वर्णी लागल्यानंतर पहिली प्रतिक्रिया त्यांनी माध्यमांसमोर दिली आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या गेल्या टर्ममध्ये मी चार वर्षे मंत्री म्हणून होतो त्याचा अनुभव पाठीशी असल्याने आता गृहराज्यमंत्री म्हणून काम करणं अधिक सोपं होणार आहे.

सतेज पाटलांना मंत्रिपद मिळाल्यानं पी एन पाटील गटाने लावला नाराजीचा सूर

महाविकासआघाडीच्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर सुरू झालेलं नाराजी नाट्य कोल्हापुरात देखील पाहायला मिळालं. काँग्रेसचे आमदार सतेज पाटील आणि पी एन पाटील यांच्यामध्ये मंत्रिपदासाठी चांगलीच रस्सीखेच पाहायला मिळाली. अखेर पक्षांने मंत्रिपदाची माळ सतेज पाटील यांच्या गळ्यात टाकली. यामुळं पीएन समर्थक नाराज आहेत.