सतेज पाटलांना हरवलंय; पुतण्याला हरवणं कठीण नाही – प्रमोद सावंत

कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व जागांवर महायुतीचेच उमेदवार निवडून येतील असा विश्वास गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी व्यक्त केला. गेल्या पाच वर्षात फडणवीस सरकारने केलेल्या कामांमुळे महाराष्ट्रात महायुतीला पुन्हा सत्ता मिळणार आहे.

आमचं ठरलय, आता फक्त दक्षिण उरलंय; सतेज पाटील अमल महाडिकांना धूळ चारणार ??

कोल्हापूरचे काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांनी आमच ठरलय, आता दक्षिण उरलय अशी नवी घोषणा केली आहे. यामुळं कोल्हापूर दक्षिणेतील वातावरण गुरुवारपासून ढवळून निघालं आहे.

पूरग्रस्तांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर ‘जन आक्रोश मोर्चा’

कोल्हापूर प्रतिनिधी | कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यामध्ये आलेल्या महापुराने शेतीसह छोटे मोठे उद्योग – व्यवसाय अशा विविध घटकांचे कोट्यवधीचे नुकसान झाले आहे. नागरिकांना महापुराच्या विळख्यातून लवकर सावरण्याची गरज आहे. महापुरामुळे फटका बसलेल्या नागरीकांचा आक्रोश सुरू आहे. हा आक्रोश शासनापर्यंत पोहोचवण्यासाठी आज शेकडो शेतकऱ्यांनी कोल्हापूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढला आला होता. ऑगस्ट महिन्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यात अतिवृष्टी … Read more

आमचं ठरलयं ! सतेज पाटील ‘या’ पक्षाकडून लढवणार विधानसभा

कोल्हापूर प्रतिनिधी | महाराष्ट्रात लोकसभा निवडणूक गाजली ती ‘आमचं ठरलय वार फिरलय’ या वाक्याने. महाराष्ट्रातील महत्वाचा आणि राजकीय दृष्ट्या संवेदनशील असणारा कोल्हापूर लोकसभा मतदारसंघ यावेळी शिवसेनेने जिंकला. मात्र हि निवडणूक शिवसेना-राष्ट्रवादी अशी नरंगता धनंजय महाडिक विरुद्ध सतेज पाटील अशी निवडणूक रंगली होती. यात सतेज पाटील यांनी बाजी मारली आहे. मात्र सतेज पाटील विधानसभा कोणत्या पक्षाकडून लढवणार … Read more

पाचगावचा पाणी प्रश्‍न मंत्रिपदाच्या कालावधीत का सोडवला नाही? महाडिक यांचा सतेज पाटील यांना सवाल

कोल्हापूर प्रतिनिधी | बारा वर्षे आमदारकी आणि तीन वर्षे मंत्रिपद भोगलेल्यांना पाचगाव आणि परिसराचा पाणी प्रश्‍न सोडवता आला नाही. निवडणूक जवळ आली की आपल्याला जनतेची फार काळजी आहे असे भासविण्याचा त्यांचा कावा आहे, असे पत्रक आमदार अमल महाडिक यांनी प्रसिद्धीस दिले आहे. पत्रकात म्हटले आहे की, आमदार म्हणून निवडून आल्यानंतर आपण लोकांच्या समस्या सोडविण्यास प्राधान्य … Read more

सांगलीच्या जागेवरून जयसिंगपूर मध्ये नेत्यांचे खलबते, स्वाभिमानीकडून विशाल पाटील यांना आॅफर

सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे कॉंग्रेसने उमेदवारी न दिल्यास बंडखोरीचा इशारा देणाऱ्या विशाल पाटील यांना सांगली लोकसभा स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून लढवावी, असा प्रस्ताव संघटनेने मंगळवारी दिला. दरम्यान, आमदार सतेज पाटील, कर्नाटकचे आमदार गणेश हुक्किरे यांनी शिरोळ व जयसिंगपूरमध्ये बसून खासदार राजू शेट्टी व विशाल पाटील यांच्याशी चर्चा करुन तिढा सोडविण्याचा प्रयत्न केला. सांगलीच्या जागेवरुन सांगलीसह … Read more

पाटील महाडिक वाद मिटवण्यासाठी पवार करणार मध्यस्थी..

Untitled design

कोल्हापूर प्रतिनिधी शरद पवार हे राजकारणातले वाद मिटवण्यात अग्रेसर राजकारणी आहेत. आता पर्यंत अनेक नाराजांची त्यांनी मनधरणी केलेली आहे. महाराष्ट्रातल्या पुतण्यांना आपल्या गोटात ओढायाचं कौशल्य देखील पवारांकडे आहे. ५० वर्षांचा राजकारणाचा अनुभव असलेल्या पवार यांना आजही राजकारणात मध्यस्थी करण्यासाठी अनेक जिल्ह्यात दौरे करावे लागतात. लोकसभा निवडणूकीला उधाण आले असताना राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार सोमवारी कोल्हापूर … Read more

तीन राज्यांचे राज्यपाल राहिलेल्या डी.वाय. पाटील यांचा काँग्रेसला रामराम, राष्ट्रवादीत प्रवेश

Dr D Y Patil

कोल्हापूर | काँग्रेसचे ज्येष्ठ नेते डॉ. डी. वाय. पाटील यांनी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. राष्ट्रवादीचे प्रवक्ते अंकुश काकडे यांच्या उपस्थितीत पाटील यांनी आज कोल्हापूर येथे काँग्रेसला रामराम ठोकला आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्यत्व स्विकारले. आगामी लोकसभा – विधानसभा निवडणुकांच्या तोंडावरील पाटील यांचा राष्ट्रवादी प्रवेश चांगलाच चर्चाचा विषय बनला असून पाटील यांच्या … Read more

कोल्हापूरला खंडपीठ झालंच पाहिजे, आमदारांची मागणी

High Court Demand at Kolhapur

मुंबई | कोल्हापूर येथे मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ झालेच पाहिजे, अशी मागणी करत कोल्हापूरच्या आमदारांनी विधानभवना बाहेर जोरदार निदर्शने केली. कोल्हापुरात मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ व्हावे, अशी तेथील जनतेची मागणी आहे. कोल्हापूर, सांगली, सातारा आणि सिंधुदुर्ग येथील हजारो खटले उच्च न्यायालयात प्रलंबित आहेत. न्यायासाठी येथील जनतेला नाहक मुंबईला खेटे घालावे लागतात. कोल्हापूर खंडपीठासाठी वकील, पक्षकार, … Read more