“राज्यपालांनी माफी मागण्याची आवश्यकता नाही”; रामदास आठवले यांची प्रतिक्रिया

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी समर्थ रामदास स्वामी यांच्याशिवाय शिवाजी महाराज यांना कोण विचारेल, असे वादग्रस्त वक्तव्य केले. त्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. राजकीय नेत्यांकडूनही अनेक प्रतिक्रिया उमटल्या. दरम्यान केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी राज्यपालांच्या वक्तव्याचे समर्थन केले आहे. “राज्यपालांनी माफी मागण्याचा विषय नाही. राज्यपालांनी माफी मागण्याची आवश्यकता नाही,” … Read more

शिवछत्रपतींवरील ‘त्या’ विधानावर राज्यपालांनी दिले ‘हे’ स्पष्टीकरण; म्हणाले की….

bhagatsing koshyari

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | समर्थांशिवाय शिवाजीला कोण विचारणार? असे वादग्रस्त वक्तव्य राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी केल्यानंतर सर्वच स्तरातून त्यांच्यावर टीका होत आहे. तसेच त्यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यपालांनी आपल्या विधानावर स्पष्टीकरण दिले आहे. ते जळगाव येथे बोलत होते. कोश्यारी म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज हे राष्ट्राचे प्रेरणास्त्रोत आहेत, मला जेवढे जानकारी आहे … Read more

राज्यपालांची उचलबांगडी करा, अन्यथा त्यांचे धोतर फेडू

bhagatsing koshyari

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | समर्थांशिवाय शिवाजीला कोण विचारणार? असे वादग्रस्त वक्तव्य राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी केल्यानंतर मराठा आरक्षणाचे याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी राज्यपालांवर निशाणा साधला आहे. या बदफैली राज्यपालांची उचलबांगडी करा, अन्यथा धोतर फेडू, असा इशारा त्यांनी दिला आहे. विनोद पाटील म्हणाले, राज्यपालांना छत्रपती शिवरायांबद्दल भावना, संवेदना नसतील, तर त्याविषयी बोलताना नको त्या विषयात … Read more

रोहित पवारांचा राज्यपालांवर निशाणा; म्हणाले की, खोटा इतिहास सांगून….

Rohit pawar koshyari

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | समर्थांशिवाय शिवाजीला कोण विचारणार? असे वादग्रस्त वक्तव्य राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी राज्यपालांचा समाचार घेतला आहे. खोटा इतिहास सांगून थोर महापुरुषांचा खरा इतिहास पुसण्याचे प्रयत्न देशात इतरत्र यशस्वी होत असतीलही, परंतु महाराष्ट्रात असले प्रयत्न कधीही यशस्वी होणार नाहीत, हे सर्वांनीच लक्षात ठेवावं असा इशारा … Read more

6 मार्चला पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्यात; ‘या’ प्रकल्पाचे करणार उद्घाटन

Narendra Modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | सध्या राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांना अटक करण्यात आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप यांच्यात एकमेकांवर टीकास्र्त डागले जात आहे. अशात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महाराष्ट्रात येणार असून 6 मार्च रोजी त्यांच्या हस्ते पुणे येथे मेट्रोच्या प्रकल्पाचे उदघाटन होणार आहे. महाराष्ट्रातील महत्वाचे शहर असलेल्या पुणे शहरातील गरवारे … Read more

अजिंक्य मंडळाचे कार्य आदर्शवत : डॉ. रणजीत पाटील

कराड:-  छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ महाराष्ट्राची नव्हे तर आपल्या देशाची अस्मिता आहे. त्यांनी कायम जनतेच्या सुरक्षेचाच विचार केला. लोकांना नेहमी तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलं. छत्रपतींच्या विचारांचा वारसा जोपासत अजिंक्य मंडळाने नागरिकांच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही बसवून आदर्शवत कार्य केले आहे, असे प्रतिपादन उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. रणजीत पाटील यांनी केले. आगाशिवनगर आझाद कॉलनी येथील अजिंक्य नवरात्र व  … Read more

साताऱ्यात छ. शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास वंशजाच्या हस्ते अभिषेक

सातारा प्रतिनिधी शुभम बोडके साताऱ्यात छत्रपती शिवाजी महाराज जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यास सुरूवात झालेली आहे. पोवई नाका येथे असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास त्यांच्या वंशजांच्या हस्ते महाराजांच्या पुतळ्याला अभिषेक करण्यात आला. तसेच पुतळा परिसर आकर्षक असा सजविण्यात आला आहे. साताऱ्यात छत्रपती शिवाजी महाराज जयंती मोठ्या उत्साहात साजरी होत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज वृषालीराजे … Read more

शिवाजी महाराजांच्या सर्वाधिक उंच पुतळ्याचा डोळ्याचे पारणे फेडणारा अनावरण सोहळा

Shivaji Maharaj

औरंगाबाद – फटाक्यांची प्रचंड आतषबाजी, ढोल ताशांचा गजर, लाईट शोचा लखलखाट आणि हातात भगवे ध्वज घेऊन लाखोंच्या संख्येने उपस्थितीत नागरिकांच्या साक्षीने क्रांती चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या ५२ फूट उंचीच्या पुतळ्याचे शुक्रवारी रात्री अनावरण करण्यात आले. जय भवानी, जय शिवाजीच्या जयघोषणाने यावेळी आसमंत दुमदुमला. शिवरायांचे शिवतेच पाहण्यासाठी क्रांती चौकात जमलेल्या विक्रमी अलोट गर्दीच्या डोळ्याचे पारणे फिटले. … Read more

शिवजयंतीमुळे शहरातील वाहतूक मार्गात बदल

औरंगाबाद – शिवजयंतीमुळे क्रांती चौक परिसरातील चार प्रमुख मार्ग बंद करण्यात येणार असून, पर्यायी तीन रस्त्याने वाहतूक वळवण्यात येणार असल्याचे वाहतूक विभागाचे सहाय्यक आयुक्त सुरेश वानखेडे यांनी सांगितले. 18 फेब्रुवारीच्या रात्री 9 ते 12 तसेच 19 फेब्रुवारीच्या सकाळी 6 ते रात्री 12 वाजेच्या दरम्यान सिल्लेखाना ते क्रांती चौकापर्यंत गोपाल टी ते क्रांती चौक हे रस्ते … Read more

शिवजागर महोत्सवात शिवरायांचा अभिषेक सोहळा; परिसरात भक्तिमय वातावरण

औरंगाबाद – शिवजयंतीनिमित्त क्रांतीचौक येथे शिवसेना आयोजित “शिवजागर महोत्सव” सुरू असून या निमित्ताने 3 दिवसापासून दररोज छत्रपती शिवरायांना अभिषेक सुरू आहे. 350 वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक करण्यात आला होता. त्यावेळी 21 नद्यांचे पाणी व दुधाने अभिषेक करून 16 सुवासिनींनी औक्षण केले होते. त्याच धर्तीवर तीन दिवसापासून “शिवजागर” महोत्सवात परिसरातील 21 नद्यांचे पाणी, दुधाने व … Read more