जगावरील संकटाला दूर करण्यासाठी शिवपंचायतन महायज्ञ उपक्रमातुन प्रयत्न : शिवेंद्रराजे भोसले

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके सातारा शहरातील राजवाडा येथील गांधी मैदान परिसरात आज वेदमूर्ती विवेक शास्त्री गोडबोले यांच्या मार्गदर्शनाखाली शिवपंचायतन महायज्ञ करण्यात आला. या महायज्ञाच्या पूजनासाठी भाजप  आमदार शिवेंद्रराजे भोसले त्यांच्या पत्नी वेदांतीकाराजे भोसले यांच्यासह उपस्थिती लावली होती. यावेळी आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, आज वाढदिवसाच्या निमित्ताने जो शिवपंचायतन महायज्ञ … Read more

अजिंक्यतारा केसरी-2022 शर्यत : मुंबईच्या बैलगाडीस दोन तोळे सोने, चांदीची गदा

सातारा | देगाव येथे झालेल्या बैलगाडा शर्यतीत मुंबईच्या गिरी / म्हेत्रे बैलगाडीने विजेतेपद मिळवत दोन तोळे सोने व चांदीची गदा पटकावली. या शर्यतीत तब्बल 120 च्या वर बैलगाडा चालक व मालकांनी हजेरी लावली. जिल्हा बँकेच्या संचालिका सौ. कांचन साळुंखे यांच्या पुढाकाराने ही स्पर्धा घेण्यात आली होती. दरम्यान, एका महिलेने बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्याची ही पहिलीच … Read more

“मला काही हौस नाही, मी जमिनीवरचा माणूस”; उदयनराजेंच्या टीकेला शिवेंद्रराजे भोसलेंचे प्रत्युत्तर

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके सातारा नगरपालिकेची निवडणुकीमुले राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. दरम्यान भाजपचे खासदार छ. उदयनराजे भोसले यांनी आज शिवेंद्रराजे भोसले यांनी केलेल्या टीकेवर पलटवार केला. त्यानंतर आता आमदार शिवेंद्रराजेंनीही प्रत्युत्तर दिले आहे. “मला काही हौस नाही मी जमिनीवरचा माणूस आहे. आणि मला जमिनीवरच राहण्याची इच्छा आहे,” असे शिवेंद्रराजे भोसले यांनी म्हंटले आहे. … Read more

“माझ्यावर टीका केल्याशिवाय त्यांना झोपच लागत नाही”; उदयनराजे भोसले यांचा शिवेंद्रराजेंवर पलटवार

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके साताऱ्यात काही दिवसावर सातारा नगरपालिकेची निवडणुकीचा बिगूल वाजणार आहे. त्या अगोदरच दोन्ही राजेंकडून एकमेकांवर हल्लाबोल केला जात आहे. दरम्यान भाजपचे खासदार छ. उदयनराजे भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित “चला हवा येऊ द्या” कार्यक्रमात बाईकवरून हवेतून एंन्ट्री केली होती. त्यावर आ. शिवेंद्रराजे भोसले यांनी खोचक टीका केली. त्याच्या टीकेला उदयनराजे भोसले यांनी … Read more

उदयनराजे यांचे स्टंट म्हणजे वाऱ्यावरची वरात : आ. शिवेंद्रसिंहराजे

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके खा.उदयनराजे भोसले यांनी गाडीवर बसून हवेतून येण्याचा केलेला स्टंट म्हणजे वाऱ्यावरची वरात असल्याची टीका आ. शिवेंद्रराजे भोसले यांनी केली आहे. खा. उदयनराजे यांची सर्व कामे ही नुसती वाऱ्यावरची असतात. त्यामुळे ते असले स्टंट ते करू शकतात. आपल्याला मात्र असलं काही हवेतल जमणार नसल्याची खोचक टीका देखील साताऱ्यातील एका कार्यक्रमात केली. … Read more

साताऱ्यात दोन्ही राजेंना राजघराण्यातूनच पालिका निवडणुकीत आव्हान? : वृषालीराजेंचे संकेत

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके खासदार उदयनराजे आणि आमदार शिवेंद्रराजे भोसले यांना राजघराण्यातील सदस्यांचे मोठे आवाहन उभे ? वृषालीराजे भोसले यांनी दिले आहे. सातारा नगर पालिका निवडणुक लढवण्याचे संकेत दिल्याने शिवजयंतीदिनी राजकीय चर्चांना उधाण आले. तसेच दोघांना तिसरा पर्याय मिळणार की कसे हे पुढील काही दिवसात समजणार असल्याचे राजकीय जाणकरांकडून सांगितले जात आहे. साताऱ्यात छत्रपती … Read more

…अन्यथा सुजलान कंपनी बंद पाडू; शिवेंद्रराजे भोसले यांचा इशारा

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके सातारा येथील सुजलान कंपनीच्या वतीने स्थानिक युवकांवर असुविधा देत अन्याय केला जात आहे. या संदर्भात आज भाजपचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी कंपनीच्या प्रशासनावर निशाणा साधला. त्यांनी सातारा येथे पत्रकार परिषद घेत यावेळी सुजलान कंपनीत होणारा स्थानिक मुलांवरील अन्याय बंद करा, अन्यथा कंपनी कंपनीतील सर्व गोष्टीसह कंपनी बंद पाडू, असा इशारा … Read more