भारत-श्रीलंका सीरिजचे वेळापत्रक जाहीर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – भारताची एक टीम इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे तर दुसरी एक टीम श्रीलंकेच्या दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यामध्ये श्रीलंका वनडे आणि टी-20 सीरिज खेळणार आहे. बीसीसीआयकडून या दौऱ्याच्या तारखांची अधिकृत घोषणा करण्यात आली नसली तरी या स्पर्धेचे अधिकृत प्रसारणकर्ते असलेल्या टेन स्पोर्ट्सने वेळापत्रकाची घोषणा केली आहे. त्यांनी केलेल्या ट्विटनुसार 13 जुलैपासून भारत-श्रीलंका सीरिजला सुरुवात होणार आहे. तर शेवटची मॅच 25 जुलैला खेळवण्यात येणार आहे. या दौऱ्याची सुरुवात वनडे सीरिजपासून होणार आहे. वनडे मॅच 13 जुलै, 16 जुलै आणि 18 जुलैला होणार आहेत. तर टी-20 स्पर्धा 21 जुलै, 23 जुलै आणि 25 जुलै रोजी होणार आहेत. कोरोना व्हायरसमुळे सीरिजचे सगळे सामने एकाच स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आहे.

कोलंबोच्या प्रेमदासा स्टेडियममध्ये वनडे आणि टी-20 सीरिज होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या सिरीजदरम्यान भारताचे बहुतेक वरिष्ठ खेळाडू इंग्लंडमध्ये असणार आहेत. यामुळे या दौऱ्यात युवा खेळाडूंना संधी देण्यात येणार आहे. तसेच या संघाचे नेतृत्व शिखर धवनकडे देण्यात येणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तसेच या सिरीजमध्ये दुखापतीमुळे श्रेयस अय्यरच्या खेळण्याबाबत साशंकता निर्माण झाली आहे. तसेच या सीरिजसाठी पृथ्वी शॉ, देवदत्त पडिक्कल आणि नितीश राणा या खेळाडूंनाही निवडले जाऊ शकते. यावर्षी टी-20 वर्ल्ड कप होणार असल्यामुळे नव्या खेळाडूंना आपला खेळ दाखवण्याची हि नामी संधी आहे.

https://twitter.com/SonySportsIndia/status/1401840439875964928

श्रीलंकेत आतापर्यंत भारत-श्रीलंका यांच्यामध्ये आतापर्यंत 61 सामने झाले आहेत. यामध्ये भारताने 28 तर श्रीलंकेने 7 मॅच जिंकल्या आहेत. टी-20 मध्ये मात्र टीम इंडियाचे वर्चस्व राहिले आहे. श्रीलंकेत झालेल्या 5 टी-20 पैकी 4 सामने भारताने जिंकले आहेत, तर श्रीलंकेला फक्त एका सामन्यात विजय मिळवता आला आहे. गेल्या काही वर्षांपासून श्रीलंकेची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील कामगिरी खराब झाली आहे. नुकत्याच झालेल्या बांगलादेशविरुद्धच्या वनडे सीरिजमध्ये श्रीलंकेचा 2-1 ने पराभव झाला होता.तसेच खेळाडू आणि बोर्ड यांच्यात या करारावरून वाद सुरू आहेत.