भारत चीन सीमाभागात तणाव वाढला; युद्ध होण्याच्या शक्यतेवर रिटायर्ड लेफ्टनंट जनरल म्हणतात

0
43
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

वृत्तसंस्था । भारत आणि चीनच्या सीमेवर या महिन्यात मोठ्या प्रमाणात तणाव दिसून येतो आहे. भारताने लडाख च्या सीमेवर रस्तेबांधणी सुरु केल्यापासून चीनने सीमेवरील आपले सैन्य वाढविल्यामुळे भारतानेही आपले सैन्य वाढविले आहे. यावर गेले काही दिवस माध्यमातून तेथील हालचालींच्या बातम्या येत आहेत. गलबान घाटाच्या सीमावादावरून युद्ध होण्याच्या शक्यताही वर्तविण्यात येत आहेत. या परिस्थितीत आता रिटायर्ड लेफ्टनंट जनरल एसएल नरसिम्हन यांनी एका मुलाखतीत ‘भारत आणि चीनला एकमत सीमा नाही त्यामुळे सीमेवर पेट्रोलिंग होते तेव्हा या गोष्टी होत राहतात.’ असे सांगितले आहे. त्यामुळे युद्धाच्या शक्यता वगैरे काही नाही आहेत असे दिसून येते आहे.

यापूर्वीही अनेकदा अशा गोष्टी झाल्या आहेत त्यामुळे आणि भारतीय सैन्य या गोष्टी हाताळण्यासाठी चांगलेच सक्षम आहे. असे ते म्हणाले आहेत. ते नॅशनल सिक्युरिटी ऍडव्हायजरी बोर्ड चे सभासद, तसेच समकालीन चीन अभ्यासकेंद्राचे, महासंचालक आहेत. ज्यापद्धतीने एका बाजूला इमारती बांधणे सुरु आहे. त्याचप्रमाणे या बाजूलाही सर्व यंत्रणा सज्ज आहे. बरेचजण लिहीत आहेत की मोठ्या प्रमाणात चीनी सैन्य सीमेवर आले आहे. ते थोडे अधिकच मसाला लावून सांगितले जात आहे. तसे पाहता काळजी करण्याचे काही कारण नाही.

 

गेल्या काही दिवसांपासून अनेक बातम्या येत आहेत. दररोज भारत-चीन सीमेवरील हालचाली भडक करून सांगितल्या जात आहेत. भारतीय सैन्य या सगळ्याला सामोरे जाण्यासही सज्ज आहे. चीन आणि भारताच्या उच्च स्तरीय कमांडर्स ची भेट झाली आहे. आणखी बैठका होण्याची शक्यता आहे. त्यामुळे युद्धाच्या शक्यता इतक्यात सांगता येत नाही. कुणीही काळजी करण्याचे काही कारण नाही. असे त्यांनी सांगितले आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’. 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here