हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आई आपल्या मुलांवर जीवापाड प्रेम करत असते. प्रसंगी आपला जीव धोक्यात घालून ती आपल्या मुलांचा जीव वाचावीत असते. सर्व प्राणिमात्रांमध्ये हेच प्रेम असते. अनेकदा सिनेमांमध्ये प्राणी आपल्या आप्तजनांच्या मृत्यूचा बदला घेताना दाखविले जातात. असेच काहीसे भासावे अशी एक घटना बुलढाणा जिल्ह्यात घडली आहे. आपल्या पिलांच्या मृत्यूने क्रोधीत झालेल्या अस्वलाच्या मादीने शिवारात हल्ला करून दोघांचा जीव घेतल्याची घटना घडली आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील सोनाळा वनक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या आलेवाडी शिवारात ही घटना घडली आहे. जंगलात गेलेल्या दोन माणसांवर या मादीने हल्ला केला आहे. या हल्ल्यात या दोन्ही व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. या घटनास्थळापासून काही अंतरावर अस्वलाच्या दोन पिलांवर कुऱ्हाडीने वार करून ठार केल्याचे आढळून आले आहे. यावरून या पिलांच्या आईने बदला घेण्यासाठी हा हल्ला केला असेल असा अंदाज लावला जात आहे. अशोक मोतीराम गवते वय वर्षे ५२ आणि माना बंडू गवते वय वर्षे ४२ असे या दोन मृत व्यक्तींचे नाव आहे.
या हल्ल्यात दोन्ही इसमांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर एका व्यक्तीचा चेहरा पूर्णतः बिघडला असल्याचे समोर आले आहे. जवळच अस्वलाच्या ८ महिन्याच्या २० पिलांचा मृतदेह सापडला आहे. याप्रकरणी आकोट व्याघ्र प्रकल्पामध्ये वन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अस्वलांच्या पिलांची हत्या करून त्यांच्या नखांची तस्करी केली जाते कदाचित यामुळेच या पिलांची हत्या केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.