हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । उत्तर प्रदेशातील कानपुर जिल्ह्यातून नुकतेच हैराण करून सोडणारे एक प्रकरण समोर आले आहे. इथे लग्नासाठी जात असलेल्या व्यक्तीला आपला नवरा असल्याचे सांगत एका युवतीने मोठा कालवा केला. त्या युवतीने सांगितले त्या व्यक्तीने आधीच तिच्याशी लग्न केलेले आहे. इतकेच नाही तर तिने त्यांच्या लग्नाचे फोटोही दाखवले. त्यादरम्यानच कोणीतरी पोलिसांना या घटनेची माहिती दिली. पोलिसांनी ताबडतोब घटनास्थळी धाव घेत संबंधित व्यक्तीला ताब्यात घेतले.
हे प्रकरण कानपुर देहात मधील लालजी पूरवा या गावातील आहे. या गावातील रहिवासी असलेला आरोपी युवक हा श्रीनगर येथे सीआरपीएफ मध्ये तैनात आहे. त्याचे लग्न पुखरिया मध्ये राहणाऱ्या एका युवती बरोबर ठरले होते. मंगळवारी वरात निघणार होती. रात्री उशिरा वारातीच्या विधी चालू असतानाच कानपूर नगरच्या शिवराजपुरी येथील रहिवासी असलेली एक युवती तिथे दाखल झाली. आणि त्या व्यक्तीला आपला नवरा असल्याचे सांगून एकच गोंधळ उडवून दिला. त्या युवतीने सांगितले कि त्यांचे आधीच लग्न झालेले आहे, असे सांगून तिने आपल्या लग्नाचे फोटोही दाखविले.
याच दरम्यान मुलाच्या नातेवाईकांनी तिला समजावण्याचा खूप प्रयत्नही केला पण तिने काहीही ऐकले नाही आणि याची माहिती पोलिसांना दिली. पोलीस घटना स्थळी दाखल झाल्यानंतर तिने पोलिसांना आपले लग्नाचे फोटो आणि त्यांचे मेसेजस दाखवून आपले त्याच्या बरोबर लग्न झाले असल्याचे सांगितले. यानंतर पोलिसांनी त्या नवरदेवाला ताब्यात घेतले आणि त्याला अटक केली. या घटने नंतर वरात काही निघाली नाही. त्यानंतर मुलाकडे नातेवाईकांच्या मदतीने सदर घटनेची माहिती वधूकडील लोकांना कळवली त्यानंतर त्यांनी हे लग्न करण्यास नकार दिला.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.