हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। ११ दिवसांनंतर मुख्यमंत्री शिवराज यांनी आपल्या मंत्र्यांना खातेवाटप केले आहे. अपेक्षेप्रमाणे कॅबिनेट वाटपात ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या लोकांकडे खास लक्ष दिले आहे. कॅबिनेट मध्ये जागा न मिळाल्यामुळे काही लोक आधीपासूनच नाराज होते. खातेवाटपानंतर आमदार आणि माजी मंत्री अजय विश्नोई यांनी पुन्हा बंडखोरी केली आहे. त्यांनी पक्षाला सल्ला दिला आहे. ते भाजपाचे वरिष्ठ नेते आहेत. विश्नोई भाजपाचे पाटन चे आमदार आहेत. त्यांनी ट्विटर वर लिहिले आहे, ‘या हाताने द्या, त्या हाताने घ्या, याचे मध्यप्रदेश च्या राजकारणातील हे उत्तम उदाहरण आहे. आज ना सरकार बनवायचे होते ना पाडायचे, तर मग हे का केले गेले?’
इस हाथ दे-उस हाथ ले, का शानदार उदाहरण प्रस्तुत हुआ है, म.प्र. की वर्तमान राजनीति में। आज जब सरकार ना तो बनाना थी और न गिराना।
फिर यह क्यों किया गया?
आप भाजपा को कहां ले जाना चाहते हैं?जनता को बताए ना बताए भाजपा को यह बताना होगा। या फिर हमें संस्कारों का उल्टा पाठ पढ़ाना होगा।
— Ajay Vishnoi (@AjayVishnoiBJP) July 13, 2020
त्यांनी म्हंटले आहे, ‘आपण भाजपा ला कुठे घेऊन जाऊ पाहत आहात? जनतेला सांगा किंवा सांगू नका तुम्हाला भाजपा ला हे सांगावे लागेल. अन्यथा आपल्याला संस्कारांचा उलटा पाढा शिकवायला लागेल.’ भाजपात ही अनेक बदल झाले आहेत असेही ते म्हणाले आहेत. त्यांना कॅबिनेट मध्ये जागा मिळण्याची अपेक्षा होती. मात्र सिंधीयांच्या समर्थकांमुळे त्यांच्यासारख्या काही वरिष्ठ नेत्यांचा पत्ता कट करण्यात आला आहे. त्यानंतरच विश्नोई यांनी हे मत व्यक्त केले आहे.
पहले मंत्रियों की संख्या और अब विभागों का बंटवारा। मुझे डर है कही भाजपा का आम कार्यकर्ता हमारे नेता की इतनी बेइज्जती से नाराज न हो जाय। नुकसान हो जाएगा।
— Ajay Vishnoi (@AjayVishnoiBJP) July 8, 2020
काही दिवसांपूर्वी त्यांनी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांना पत्र देखील लिहिले होते. तर खातेवाटपाच्या मोठ्या वादानंतर ७ जुलै रोजी विश्नोई यांनी एक ट्विट केले होते. त्यांनी ‘आधी मंत्र्यांची संख्या आणि आता खातेवाटप, मला भीती आहे, भाजपाचा सामान्य कार्यकर्ता भाजपाच्या या अपमानामुळे नाराज होईल. याने नुकसान होईल. अजय विश्नोई यांच्या ट्विटवर मध्यप्रदेश काँग्रेस ने देखील रिट्विट केले आहे. लिहिले आहे की, ‘मलाई वाटली आहे. आता लवकर लवकर खा, कारण वेळ खूप कमी आहे.’
मलाई बट गई,
—अब जल्दी-जल्दी खाओ, क्योंकि समय बहुत कम है।— MP Congress (@INCMP) July 13, 2020
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.