हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ब्राझीलच्या सिएरा राज्यात शुक्रवारी रात्री कोरोना विषाणूची लागण झालेल्या डॉक्टरांना घेऊन जाणारे एक छोटे विमान कोसळले. त्यामधून प्रवास करत असलेल्या सर्व ४ जणांचा मृत्यू झाला आहे. जी -१ या ऑनलाइन न्यूज साइटने अग्निशमन दलाच्या हवाल्याने सांगितले की या आजारी डॉक्टरांना पियाऊ येथील आईसीयूमध्ये नेले जात होते. यामध्ये वैमानिकांबरोबरच रुग्णांवर उपचार करणारे २ डॉक्टरही होते.
ब्राझीलमध्ये २.३ दशलक्षाहून अधिक संसर्गग्रस्त आहेत
सिएरा अग्निशमन विभाग आणि साओ बर्नार्डो नगरपालिकेने या संदर्भात आणखी कोणतीही माहिती दिलेली नाही. ब्राझील जगातील कोरोना विषाणूमुळे सर्वाधिक पीडित असलेल्या देशांपैकी एक आहे. आतापर्यंत या विषाणूमुळे येथे १५.५ हजाराहून अधिक लोकांचा बळी गेलेला आहे. येथे संक्रमित झालेल्यांची एकूण संख्या ही २.३ लाखांवर गेली आहे आणि या दृष्टीने ती जगभरात पाचव्या क्रमांकावर आहे. असेही एक वृत्त आहे की या विषाणूमुळे ब्राझीलमधील आरोग्य यंत्रणा गंभीरपणे कोसळली आहे, अशा परिस्थितीत हा अपघात म्हणजे एक मोठा धक्काच मानला जात आहे. .
देशाच्या आरोग्यमंत्र्यांनी दिला राजीनामा
ब्राझीलसाठी दिलासादायक फक्त एकच गोष्ट ही आहे की आजपर्यंत ८९,६७२ लोकं या आजारातून बरे झालेले आहेत आणि आता तेथे १२८,१७७ सक्रिय प्रकरणे आहेत. यातील ८,३१८ लोकांची प्रकृती ही चिंताजनक असल्याचे समजते. या साथीच्या रोगाचा प्रभावीपणे सामना करण्यास अपयशी ठरल्यामुळे ब्राझीलचे आरोग्यमंत्री नेल्सन टीच यांना राजीनामा द्यावा लागला आहे. एका महिन्यातली ही दुसरी वेळ आहे जेव्हा देशाचे आरोग्यमंत्री बदलले गेले आहेत. यापूर्वी, आरोग्यमंत्री हेन्रिक मंडेटा यांना अध्यक्ष झेरी बोलसोनारो यांनी या पदावरून काढून टाकले होते.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.