हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जगातील सर्वात तरुण पंतप्रधान सना मारिन यांनी स्वत: ला क्वारंटाइन केले आहे.फिनलँडच्या पंतप्रधान मरीन यांनी आपल्या घरी काम करणारी व्यक्ती दुसर्या कोरोना बाधित व्यक्तीच्या संपर्कात आल्यानंतर हे पाऊल उचलले आहे.
पंतप्रधान कार्यालयाकडून प्रसिद्ध झालेल्या निवेदनानुसार पंतप्रधान मरीन यांची चाचणी निगेटिव्ह आली आहे.त्यांना संसर्ग होण्याची चिन्हे नाहीत.डिसेंबरमध्ये चर्चेत आल्यापासून ३४ वर्षांची सना हि जगातील सर्वात तरुण पंतप्रधान बनली आहे.
संसर्गग्रस्त व्यक्तीला क्वारंटाइन ठेवले असून तो पंतप्रधान व त्यांच्या कुटूंबाच्या संपर्कात आलेला नाही.पंतप्रधानांनी हे पाऊल सुरक्षेच्या दृष्टीने उचलले आहे.सना मरीन डिसेंबरमध्ये पंतप्रधान झाल्यापासूनच कोरोना विषाणू त्यांच्यासाठी एक आव्हान म्हणून बनू लागले आहे.उर्वरित युरोपच्या तुलनेत फिनलँडमध्ये मृत्यूचे प्रमाण लक्षणीयरित्या कमी आहे.बातमीनुसार सनाने आवश्यक असलेली सर्व पावले वेळेतच उचलली.
खोल समुद्रात लपले आहे कोरोनावरचे औषध? पहा काय म्हणतायत अभ्यासक#coronavirus #coronaupdatesindia #HelloMaharashtrahttps://t.co/AmNrAG3QGs
— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) April 15, 2020
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.