अहमदनगर प्रतिनिधी | विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी कॉंग्रेसने खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या नेतृत्वात शिवस्वराज्य यात्रा काढली आहे. या यात्रेत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते भाजप सरकारला लक्ष्य करताना दिसून येत आहे. यात्रेच्या माध्यमातून जनतेच्यावतीने सरकारला काही प्रश्न विचारण्यात येत आहे. मात्र याच शिवस्वराज्य यात्रेच्या मंचावर संभाजी ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्षांनी साखर कारखान्यांच्या थकीत बीलावरून अमोल कोल्हे आणि अजित पवार यांच्यासमोर ‘शिवस्वराज्य यात्रे’चे वाभाडे काढल्याने वेगळीच चर्चा रंगू लागली आहे.
शरद पवारांचे जवळचा नातेवाईक आणि राष्ट्रवादी आमदार असणारा ‘हा’ नेता करणार भाजपमध्ये प्रवेश
संभाजी ब्रिगेडचे अहमदनगर जिल्हाध्यक्ष टिळक भोस यांनी हे सवाल माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शिरूरचे खा. अमोल कोल्हे यांना विचारले. अमोल कोल्हे हे छत्रपती शिवाजी महाराजांचा दाखला देत भाषण करत असतात. रयतेच्या भाजीच्या देठालाही हात लावू नका असा आदेश शिवछत्रपती सैन्याला देतात. मात्र राष्ट्रवादी पक्षाच्या नेत्यांचे असलेले साखर कारखाने गोरगरीब शेतकऱ्यांची बीलं देत नाहीत. हीच का मग तुमची ‘शिवस्वराज्य यात्रा’? असा प्रश्न टिळक भोस यांनी कोल्हे आणि पवारांना विचारला आहे.
विमानातून घिरट्या घालून काहीच होणार नाही ; प्रकार आंबेडकरांचा फडणवीसांना टोला
श्रीगोंदा तालुक्यात मात्र शेतकऱ्यांच्या उसाचे बील राष्ट्रवादीचे आमदार राहुल जगताप पाटील( चेरमन कुकडी सहकारी साखर कारखाना) हे देत नाहीत. यावरून टिळक भोस यांनी अजित पवार आणि अमोल कोल्हे यांना प्रश्न विचारले. विशेष म्हणजे टिळक भोस हे शिवस्वराज्य यात्रेत अजित पवार आणि अमोल कोल्हेंच्या मांडीला मांडी लावून मंचावर बसले होते.
चार दिवस कोठे होतात असा सवाल करत मंत्री देशमुख, महाजनांना पूरग्रस्तांनी घेरले
गिरीश महाजनांच्या पूर पर्यटनाचा विरोधांसोबत नेटकऱ्यांनी घेतला खरपूसर समाचार
श्रावणी पदार्थ : अशी बनवा कारल्याची भाजी की नखाणाऱ्याला देखील खावी वाटेल
सेना भाजप युती रवी राणांच्या विजयाचा ठरणार मुख्य अडथळा
विधानसभा निडणूक डोळ्यासमोर ठेवून धनंजय मुंडे हे पंकजा मुंडेंवरआरोप करत आहेत : सुरेश धस