हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत घट झाल्यामुळे देशांतर्गत बाजारात सोन्याची खरेदी करणे आता स्वस्त झाले आहे. अवघ्या दोन दिवसांत दिल्ली स्पॉट मार्केटमधील सोन्याच्या किंमती 2132 रुपयांनी कमी झाल्या आहेत. त्याच वेळी चांदीचे दरही या काळात 4000 रुपयांपेक्षा कमी झाले आहेत. तज्ज्ञांचे असे म्हणणे आहे की, सोन्याच्या किंमतीतील घसरणीचा कालावधी आंतरराष्ट्रीय स्तरावर सुरू आहे. कंपन्यांच्या तिमाही निकालाबद्दल आनंद व्यक्त करताना अमेरिकन सेंट्रल बँक फेडरल रिझर्व्ह यांनी सांगितले की, आगामी काळात वाढीबाबत चिंता आहे. पण कंपन्यांचे निकाल चकित करणारे असू शकतील. यामुळे भारतीय बाजारपेठेत गुरुवारी सोन्या-चांदीच्या किंमती खाली आल्या.
सोन्याचे नवीन दर
एचडीएफसी सिक्युरिटीजच्या मते गुरुवारी दिल्लीतील सराफा बाजारात 99.9 टक्के शुद्धतेच्या सोन्याचा भाव घसरून 52,819 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला आहे, जो आधी प्रति 10 ग्रॅम 54,311 रुपये इतका होता. या काळात प्रति 10 ग्रॅमच्या किमतींमध्ये 1,492 रुपयांनी घट झाली आहे. त्याचबरोबर मुंबईतील 99.9 टक्के शुद्धतेच्या सोन्याची किंमत प्रति दहा ग्रॅम 52528 रुपयांवर आली आहे.
चांदीचे नवीन दर
गुरुवारी सोन्याप्रमाणे चांदीच्या किंमतीही खाली आल्या आहेत. दिल्लीत एक किलो चांदीची किंमत 69,400 रुपयांवरून 67,924 रुपयांवर आली आहे. या कालावधीत किंमतींमध्ये 1,476 रुपयांची घट झाली आहे. त्याचबरोबर मुंबईत चांदीचे दर 66448.00 रुपयांवर आले आहेत.
आता पुढे काय होईल ?
तज्ञांचे असे म्हणणे आहे की सोन्याच्या किंमतीतील तेजीचा टप्पा आता थांबू शकतो. बँक ऑफ अमेरिका या मोठ्या रेटिंग एजन्सीने केलेल्या सर्वेक्षणात फंड मॅनेजर म्हणाले की, कोरोना लसीचा वेग वेगाने सुरू असल्याने येत्या काही दिवसांत सोन्याच्या किंमती मोठ्या प्रमाणात घसरतील. अशी अपेक्षा आहे की हे 2021 च्या पहिल्या तिमाहीत होईल.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.