हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । उबर या अॅप-आधारित कार सेवा कंपनीने आता भारतात ऑटो रेंटल्स सेवा सुरू केली, जी मागणीनुसार सात दिवस आणि 24 तास उपलब्ध असेल. कंपनीने एका निवेदनात म्हटले आहे की या सेवेद्वारे प्रवासी अनेक तास ऑटो आणि ड्रायव्हरची बुकिंग करू शकतात तसेच या प्रवासादरम्यान त्यांना अनेक ठिकाणी थांबण्याची मुभा देखील दिली जाईल. ही सेवा सध्या बेंगळुरू, दिल्ली एनसीआर, मुंबई, हैदराबाद, चेन्नई आणि पुणे येथे उपलब्ध असल्याचे कंपनीने म्हटले आहे.
पॅकेजची किंमत काय आहे?
निवेदनात म्हटले गेले आहे की, एक तासासाठी किंवा दहा किलोमीटरच्या पॅकेजेसच्या किंमती 169 रुपयांपासून सुरू होतात आणि जास्तीत जास्त 8 तासांसाठी हे बुक करता येतात. उबर इंडिया आणि दक्षिण आशियातील बाजारपेठ आणि कॅटेगिरीचे प्रमुख नितीश भूषण म्हणाले की, ‘भारतातील हा पहिलाच नाविन्यपूर्ण असा प्रयत्न आहे तसेच ड्रायव्हर्स आणि प्रवाश्यांसाठी तंत्रज्ञानाचा अधिक चांगल्या प्रकारे कसा वापर करता येईल हे याचे एक उत्तम उदाहरण आहे.
यापूर्वी, उबरने इंट्रा-सिटी भाड्याने (Intra-City Rental Service) देण्याची सेवा सुरू केली. या सेवेमध्ये ड्रायव्हरला कुठल्याही ठिकाणी थांबवता येऊ शकेल (Multiple Stops). उबरची ही ऑन-डिमांड सेवा सात दिवस आणि 24 तास उपलब्ध असेल. उबरने ही सुविधा ‘Hourly Rentals’ या नावाने सुरू केली आहे. या सेवेद्वारे ग्राहकांना आपल्या कारची सुविधा पुरविणे हा उबरचा मुख्य उद्देश आहे. यात रायडर्सना अनेक ‘Hourly Package’ निवडण्याचा पर्याय मिळेल. त्याअंतर्गत कोणतीही व्यक्ती ताशी / 10 किमी अंतर 189 रुपये देऊन कार बुक करू शकते. मात्र, या सेवेच्या अंतर्गत कारला जास्तीत जास्त 12 तासांसाठी बुक केले जाऊ शकते.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.