हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशात वन नेशन वन कार्ड ही सिस्टम लागू झाल्यानंतर आता लोकांना रेशनकार्ड मिळणे अधिक महत्वाचे झाले आहे. हे केवळ स्वस्त रेशन घेण्यासाठीच वापरले जात नाही तर ते ओळखपत्र म्हणून देखील काम करते. ही योजना लागू झाल्यानंतर कोणत्याही राज्यातील व्यक्ती संपूर्ण देशात कोठेही स्वस्त दरात रेशन विकत घेऊ शकते. व्यक्तीकडे असलेले रेशनकार्ड हे आधार आणि पॅनकार्ड इतकेच महत्वाचे असते. आपल्याकडे जर अजूनही रेशन कार्ड नसल्यास घाबरून जाण्याची काहीच गरज नाही. आता आपण घरबसल्या आपल्या स्मार्टफोनद्वारे ऑनलाइन रेशनकार्डसाठी अर्ज करू शकता. यासाठी सर्व राज्यांनी त्यांच्या वतीने एक वेबसाइट तयार केली आहे. आपण ज्या राज्यात रहाता तेथील वेबसाइटवर जा आणि रेशन कार्डसाठी अर्ज करा.
3 प्रकारचे रेशन कार्ड आहेत
गरीबी रेषेवरील (एपीएल)
गरीबी रेषेखालील (बीपीएल)
अंत्योदय कुटुंबांसाठी. अत्यंत गरीब लोकांना अंत्योदय प्रकारात ठेवले जाते. या श्रेणीचा निर्णय एखाद्या व्यक्तीच्या वार्षिक उत्पन्नाच्या आधारे घेतला जातो. याशिवाय वेगवेगळ्या रेशन कार्डवर स्वस्त दरात उपलब्ध असलेल्या वस्तू आणि त्यांचे प्रमाणही बदलते. हे ग्रामीण आणि शहरी क्षेत्रावर अवलंबून बदलू शकते.
पात्रता अटी
एखाद्या व्यक्तीला रेशनकार्ड मिळण्यासाठी भारताचा नागरिक असणे बंधनकारक आहे.
व्यक्तीकडे इतर कोणत्याही राज्याचे रेशनकार्ड असू नये.
ज्याच्या नावावर रेशनकार्ड तयार केले जात आहे, त्याचे वय 18 वर्षांपेक्षा अधिक असावे.
18 वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलांचा पालकांच्या रेशन कार्डमध्ये समावेश केला जातो.
एका कुटुंबाच्या कुटुंब प्रमुखांच्या नावावर रेशन कार्ड असते.
रेशनकार्डमध्ये ज्या सदस्यांचा समावेश करण्यात येत आहे त्या कुटुंबातील प्रमुखांशी घनिष्ठ संबंध असणे आवश्यक आहे.
त्यापूर्वी कुटुंबातील कोणत्याही सदस्याचे कोणत्याही दुसऱ्या रेशनकार्डमध्ये नाव असू नये.
यूपी सरकार विधवांना वर्षाकाठी 6000 रुपये देते, यासाठी ऑनलाईन अर्ज करू शकतात.
आपण अर्ज कसा करू शकता ?
रेशन कार्ड मिळविण्यासाठी पहिले आपल्या राज्याच्या अधिकृत वेबसाइटवर जा.
यानंतर रेशन कार्डसाठी ऑनलाईन अर्ज करण्याच्या लिंकवर क्लिक करा.
आधार कार्ड, मतदार ओळखपत्र, पासपोर्ट, आरोग्य कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स इत्यादी रेशन कार्ड बनविण्यासाठीचा आयडी प्रूफ म्हणून देता येईल.
रेशनकार्डसाठीच्या अर्जाची फी 05 ते. 45 रुपये आहे. अर्ज भरल्यानंतर फी भरा आणि अर्ज सबमिट करा.
फील्ड व्हेरिफिकेशननंतर, जर तुमचा अर्ज योग्य आढळला तर तुमचे रेशन कार्ड तयार होईल.
ही कागदपत्रे आवश्यक आहेत
आधार कार्ड, मतदार ओळखपत्र, पासपोर्ट, कोणत्याही शासनाने दिलेले आय कार्ड, हेल्थ कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स हे रेशन कार्ड बनवण्यासाठी आयडी प्रूफ म्हणून देता येईल. याशिवाय पॅन कार्ड, पासपोर्ट आकाराचा फोटो, उत्पन्नाचा दाखला, विजेचे बिल, गॅस कनेक्शन बुक, टेलिफोन बिल, बँक स्टेटमेंट किंवा पासबुक, भाडे कराराची कागदपत्रेही पत्त्याचा पुरावा म्हणून दिली जातील.
नाममात्र फीची तरतूद
रेशन कार्ड तयार करण्यासाठी अर्जदाराला नाममात्र फी देखील भरावी लागते. यासाठी, अर्जदारास त्यांचे राज्य आणि प्रदेश शोधणे आवश्यक आहे. उदाहरणार्थ दिल्लीमध्ये हे शुल्क 5 ते 45 रुपये पर्यंत आहे. अर्ज सबमिट झाल्यानंतर तो फील्ड व्हेरिफिकेशनसाठी पाठविला जातो. अधिकारी भरलेल्या माहितीची तपासणी करुन त्याची पुष्टी करतात. सहसा ही चाचणी अर्ज केल्याच्या 30 दिवसांच्या आत पूर्ण केली जाते. यानंतर, पुढील प्रक्रिया होते. सर्व तपशील व्हेरिफिकेशननंतर रेशन कार्ड तयार केले जाते. जर काही तपशील चुकीचे असल्याचे आढळले तर अर्जदार कायदेशीर कारवाईच्या अधीन देखील येऊ शकतो.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.