हॅलो महाराष्ट्र । आपण हे ऐकले असेल किंवा एखादा व्हिडिओ पहिला असेल, की केंद्र सरकार प्रत्येकाच्या बँक खात्यात ‘प्रधानमंत्री जन सन्मान योजना’ (Pradhan Mantri Jan Samman Yojana 2020) अंतर्गत, 90,000 जमा करत आहे. या बातमीवर अजिबात विश्वास ठेवू नका. ही बातमी पूर्णपणे खोटी आहे. वास्तविक सोशल मीडियावर एक पोस्ट आणि त्यासह एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. केंद्र सरकार सर्वांच्या बँक खात्यात ‘प्रधानमंत्री जन सन्मान योजने’ अंतर्गत 90 हजार रुपये जमा करत असल्याचा दावा ही व्हायरल पोस्ट व व्हिडीओज करत आहेत. जर तुम्हालाही हा प्रकार कळाला असेल तर सावधगिरी बाळगा. अन्यथा आपले चांगलेच नुकसान होऊ शकते.
सरकार पंतप्रधान जन सन्मान योजना चालवित नाही – प्रेस सूचना ब्युरो (पीआयबी) फॅक्ट चेकमध्ये असे म्हटले आहे की, हा दावा पूर्णपणे खोटा आहे. केंद्र सरकारकडून अशी कोणतीही योजना चालविली जात नाही आहे. पीआयबी सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या अशा बातम्यांविषयी वेळोवेळी काळजी घेतो आणि सत्य सांगतो.
योजनेमुळे आपली फसवणूक केली जाऊ शकते – पीआयबी याविषयी म्हणतो की, जर आपल्यालाही हा व्हायरल मेसेज आणि नंबर मिळाल्यास त्यावर विश्वास ठेवू नका. त्या नंबरमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करू नका. अन्यथा, आपला डेटा लिक होईल किंवा आपले बँक खाते देखील रिकामे होऊ शकते.
हा दावा खोटा आहे – व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर लोक पंतप्रधान जन सन्मान योजनेंतर्गत बँक खाती उघडण्याची तयारी दर्शवित आहेत. हा व्हिडिओ आणि पोस्ट व्हायरल होताच भारत सरकार पीआयबी फॅक्ट चेक (PIB Fact Check) ने अधिकृत ट्विटर हँडलने या दाव्याची तपासणी केली आणि सत्य समोर आणले. हा दावा पूर्णपणे खोटा आणि बनावट असल्याचे प्रेस सूचना ब्युरोने म्हटले आहे.
PIB Fact Check सेंटर सरकारच्या पॉलिसी / योजना / विभाग / मंत्रालयांविषयी चुकीच्या माहितीचा प्रसार रोखण्यासाठी कार्य करते. सरकारशी संबंधित कोणतीही बातमी सत्य आहे की खोटी आहे ते जाणून घेण्यासाठी पीआयबी फॅक्ट चेकची मदत घेतली जाऊ शकते. संबंधित बातमी, ट्विट, फेसबुक पोस्ट किंवा यूआरएलची लिंक व्हॉट्सअॅप क्रमांक 918799711259 वर पाठवता येईल किंवा पीआयबी फॅक्ट चेक पाहण्यासाठी [email protected] वर मेल पाठवता येईल.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.