हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| सध्या सोशल मीडियावर एक फोटो चांगलाच वायरल झाला आहे. दोन चिमुरड्या मुलांनी एका छोटाश्या कुत्र्याच्या पिल्लाला जवळ घेत उपचार केले आहेत. ज्याप्रमाणे पाळीव प्राण्याचे मोठ्या लोकांशी नाते असते त्याच प्रमाणे लहान मुलांशी सुद्धा प्रेमळ नाते असते. पाळीव प्राणी असे असतात कि , त्यांना जेवढे आपण प्रेम , माया देऊ त्याच पद्धतीने ते आपल्याला जवळ करतात आणि आपल्यावर तितकेच प्रेम करतात. ते जरी मुके प्राणी असले तरी त्याच्या प्रेमात मात्र कधी कमतरता नसते.
ज्या घरात लहान मुले आहेत त्या घरातील पाळीव प्राण्याची दोस्ती हि सर्वात जास्त मुलांशी असते. मांजर. कुत्रा यासारखे प्राणी असतात तर त्याचे सर्वात जास्त जमते ते लहान मुलांशी. एकाद्या मित्रा प्रमाणे लहान मुले आपल्या आजूबाजूला असलेल्या मांजर कुत्रा यांची काळजी घेत असतात. एक दिवस जरी दिसले नाही तर त्याचे मन अस्वस्थ असते. असाच काहीसा फोटो सोशल मीडियावर वायरल झाला आहे. दोन चिमुरड्या मुलांसोबत एक जखमी कुत्रा त्या फोटोत आहे. आणि ती मुले त्याची काळजी घेत आहेत.
https://twitter.com/Imamofpeace/status/1292389872301350913?s=20
या फोटोमध्ये असलेल्या कुत्र्याच्या अंगावर वेगवेगळे पट्टे लावले आहेत. अगदी निरागस होऊन ती मुले त्याची काळजी घेत आहेत. हा फोटो एका यूजर ने ट्विटर वर शेअर केला होता. त्याला आतापर्यंत ५ हजार पेक्षा जास्त लोकांनी शेअर केला आहे. तसेच ३६ हजार लोकांनी त्या फोटो ला लाइक केले आहे. भारतीय दोन राजे असे कॅपेंशन या फोटो ला दिले आहे.
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 7972630753 हा संपर्क क्रमांक Hello News या नावाने सेव्ह करा. तुमचे नाव आणि जिल्हा आम्हाला इथे कळवा.
ब्रेकिंग बातम्यासाठी : www.hellomaharashtra.in